मराठी बातम्या  /  बिझनेस  /  George Soros : अमेरिकेचं सरकार पाडायला निघाला होता एक वेटर, आता वाढवलं 'अदानी'चं टेन्शन

George Soros : अमेरिकेचं सरकार पाडायला निघाला होता एक वेटर, आता वाढवलं 'अदानी'चं टेन्शन

Aug 31, 2023, 06:02 PM IST

  • George Soros : ओसीसीआरपी संस्थेनं अदानी समूहावर आरोप केल्यानंतर चर्चेत आलेले जॉर्ज सोरोस आहेत कोण? 

Gautam Adani - George Soros

George Soros : ओसीसीआरपी संस्थेनं अदानी समूहावर आरोप केल्यानंतर चर्चेत आलेले जॉर्ज सोरोस आहेत कोण?

  • George Soros : ओसीसीआरपी संस्थेनं अदानी समूहावर आरोप केल्यानंतर चर्चेत आलेले जॉर्ज सोरोस आहेत कोण? 

George Soros : हिंडनबर्गनंतर आठ महिन्यांनी आणखी एका रिपोर्टनं अदानी समूहाला गोत्यात आणलं आहे. ऑर्गनाइज्ड क्राइम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट (OCCRP) अर्थात ओसीसीआरपी या संस्थेचा हा रिपोर्ट आहे. या रिपोर्टमधून अदानी समूहावर अफरातफरीचे आरोप केल्यानंतर ९३ वर्षीय जॉर्ज सोरोस हे नाव अचानक चर्चेत आलं आहे. कोण आहेत हे जॉर्ज सोरोस?

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

जॉर्ज सोरोस ही साधी आसामी नसून अमेरिकेतील एक अब्जाधीश आहेत. अदानी समूहावर आरोप करणाऱ्या ओसीसीआरपी संस्थेला हेच सोरोस महाशय अर्थपुरवठा करतात. मोदी सरकारचे ते कडवट टीकाकार आहेत. अर्थात त्यांची ओळख एवढ्यापुरतीच मर्यादित नाही.

India Mumbai Meet Live Updates : नरेंद्र मोदी अदानी समूहाला का वाचवतायत?; राहुल गांधी यांचा सवाल

१९४० च्या दशकात हंगेरीमध्ये ज्यू वंशीयांची कत्तल होत असताना एका ८ वर्षांच्या ज्यू मुलानं स्वत:चं बनावट ओळखपत्र बनवलं. ओळख लपवणं हा त्यामागचा उद्देश होता. काही वर्षांनी तो लंडनला पोहोचला. लंडनमध्ये त्यानं रेल्वे स्टेशनवर कुली आणि हॉटेलमध्ये वेटर म्हणूनही काम केले. अनेक वर्षे पोटासाठी संघर्ष करावा लागलेला हा मुलगा आज जगातील आघाडीच्या अब्जाधीशांपैकी एक आहे. हा मुलगा दुसरा-तिसरा कोणी नसून अदानी समूहाला टेन्शन देणारे जॉर्ज सोरोस आहेत.

सोरोस यांची संपत्ती किती?

ब्लूमबर्गच्या माहितीनुसार, जॉर्ज सोरोस यांची एकूण संपत्ती ७.१६ अब्ज डॉलर आहे. जगातील अब्जाधीशांच्या यादीत सध्या ते ३२९ व्या क्रमांकावर आहेत. तर, फोर्ब्सच्या आकडेवारीनुसार, सोरोस यांची संपत्ती ६.७ अब्ज डॉलर आहे.

संघर्षमय बालपण

हंगेरीतील बुडापेस्ट इथं एका ज्यू कुटुंबात जन्मलेल्या सोरोस यांचं बालपण प्रचंड संघर्षात व भीतीच्या छायेत गेलं. त्या काळी जर्मनीचा हुकूमशहा हिटलर ज्यूंच्या मरणावर टपलेलाच असे. हिटलरनं आरंभलेल्या क्रूर हत्याकांडात हंगेरीतील ५ लाख ज्यूंना प्राण गमवावे लागले होते. अशा वातावरणात सोरोस यांनी आपली ओळख लपवत बालपण घालवलं. १९४५ मध्ये दुसरं महायुद्ध संपल्यानंतर हंगेरीमध्ये कम्युनिस्ट सरकार स्थापन झालं आणि त्यानंतर सोरोस यांच्या कुटुंबानं देश सोडण्याचा निर्णय घेतला. १९४७ मध्ये ते कुटुंबासह लंडनला गेले. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिक्षण घेण्याचं स्वप्न साकार करण्यासाठी सोरोस यांनी छोट्या नोकऱ्या करण्यास सुरुवात केली. या काळात त्यांनी रेल्वे पोर्टर आणि नाईट क्लबमध्ये वेटर म्हणूनही काम केलं.

१९५६ मध्ये सोरोस यांनी वित्त आणि गुंतवणुकीच्या क्षेत्रात पाय ठेवला. त्यासाठी ते अमेरिकेला गेले. त्यांनी १९७३ मध्ये 'सोरोस फंड मॅनेजमेंट' नावानं एक कंपनी स्थापन केली. त्यानंतर त्यांनी कधीच मागं वळून पाहिलं नाही. अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूक करून पैसे कमवायला सुरुवात केली आणि अल्पावधीतच करन्सी ट्रेडर म्हणून ओळख मिळवली. १९८० च्या दशकापर्यंत सोरोस यांची ओळख एक दिग्गज उद्योजक अशी झाली.

OCCRP Report : हा तर हिंडनबर्गचं भूत पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न; अदानी समूहाची तिखट प्रतिक्रिया

बँक ऑफ इंग्लंडची दिवाळखोरी पथ्यावर

१९९२ मध्ये चलन मूल्यांकनामुळं जॉर्ज सोरोस यांनी भरपूर कमाई केली. या दरम्यान बँक ऑफ इंग्लंडचा डबघाईला आली आणि सोरोस यांनी १ अब्ज डॉलरपेक्षा जास्त कमाई केली. करन्सी मार्केटमध्ये ही तोपर्यंतची सर्वात मोठी कमाई होती. सोरोस यांनी मलेशिया आणि थायलंडच्या चलनांवर शॉर्ट पोझिशन घेऊनही पैसे कमावले.

सोरोस, राजकारण आणि वाद

सोरोस यांनी १९९३ मध्ये ओपन सोसायटी फाउंडेशन सुरू केलं. समाजसेवेच्या उद्देशानं फाऊंडेशनची सुरुवात करण्यात आली होती. मात्र, या संघटनेच्या माध्यमातून राजकीय अजेंडा चालवल्याचा आरोप त्यांच्यावर झाला. १९९९ मध्ये सोरोस यांच्या संस्थेनं भारतात शिरकाव केला आणि २०१६ मध्ये भारत सरकारनं त्या संस्थेकडून देशात येणाऱ्या निधीवर बंदी घातली.

अमेरिकेच्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या सर्वात मोठ्या देणगीदारांपैकी सोरोस एक आहेत. अमेरिकेतील जॉर्ज डब्ल्यू बुश यांचं सरकार पाडण्यासाठी निधी दिल्याचा आरोपही त्यांच्यावर होता. भारताच्या नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधातही ते आगपाखड करताना दिसतात. 'भारत हा लोकशाही देश असला तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकशाहीवादी नाहीत. त्यांनी मोदींच्या विरोधात आक्षेपार्ह भाषाही वापरली होती. त्यामुळं देशातील राजकारणही तापलं होतं. आता सोरोस यांच्या पाठिंब्यावर चालणाऱ्या संस्थेनं अदानी समूहावर आरोप केले आहेत.

विभाग

पुढील बातम्या