INDIA Mumbai Meet Day 2: Live Updates : मुंबईतील बैठकीत ‘इंडिया’ ची रणनीती ठरली, पुढची बैठक तामिळनाडूत
Live News Updates 31 August 2023 : ‘एक देश, एक निवडणूक’ हा हवेत सोडलेला आणखी एक फुगा: संजय राऊत
Fri, 01 Sep 202311:23 AM IST
इंडियाची मुंबईतील दोन दिवसीय बैठक संपली
इंडिया आघाडीची दोन दिवसापासून सुरू असलेली बैठक संपली आहे. आता पुढची बैठक तामिळनाडूत होणार आहे. आजच्या बैठकीत तीन ठराव करण्यात आले आहेत.
Fri, 01 Sep 202311:15 AM IST
आता भाजपाला निवडणूक जिंकणे अशक्य – राहुल गांधी
राहुल गांधी म्हणाले की, आम्ही सर्व एकत्र आहोत, त्यामुळे याता भाजपला निवडणूक जिंकणे अशक्य आहे. मोदी आणि भाजप भ्रष्टाचाराचं घर आहे. केंद्र सरकार गरिबांचा पैसा उद्योगपतींना देत आहे. चीनने भारताचा भूभाग ताब्यात घेतला आहे, तरीही मोदी यावर गप्प आहेत.
Fri, 01 Sep 202311:01 AM IST
लालू यादवांचा मोदी हटावचा नारा
देशात अल्पसंख्याक सुरक्षित नाही. देशात महागाई वाढली आहे. सर्वसामान्य लोक हैराण झाले आहेत, देशात बेरोजगारी वाढली आहे असा हल्लाबोल लालूप्रसाद यादव यांनी केला.
Fri, 01 Sep 202310:39 AM IST
२८ पक्षांची नव्हे तर १४० कोटी जनतेची आघाडी आहे – केजरीवाल
देशातील मोदी सरकार आतापर्यंतचे सर्वात भ्रष्ट व अहंकारी सरकार आहे. हे केवळ एकाच व्यक्तीसाठी चालवले जात आहे. हा व्यक्ती देशातील पैसा बाहेर नेत आहे. देशात तरुण बेरोजगार होऊन फिरत आहे. इंडिया आघाडी मोदी सरकारचे पतन करणार आहे. आम्ही कोणीच पदासाठी एकत्र आलो नाही. १४० कोटी जनतेच्या भल्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत.
Fri, 01 Sep 202310:34 AM IST
मोदी गरिबांच्या विरोधात तर बड्या उद्योगपतींसाठी काम करतात – मल्लिकार्जून खर्गे
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लीकार्जून खर्गे म्हणाले, आमचा एकच उद्देश आहे. देशातील महागाई कमी झाली पाहिजे, रोजगार निर्मिती झाली पाहिजे. पेट्रोल, डिझेलच्या किमती वाढत आहेत. त्या कमी झाल्या पाहिजे. मोदीची नेहमी १०० रुपये वाढवतात आणि दोन रुपये कमी करतात, असे त्यांचे धोरण आहे. गरिबांच्या विरोधात मोदी काम करतात. उद्योगपतींसाठी मोदी काम करतात, असा आरोपही खर्गे यांनी केला.
Fri, 01 Sep 202310:29 AM IST
संसदेचे विशेष अधिवेशन कोरोना काळात, नोटबंदी व मणिपूरच्या प्रश्नावर का बोलावले नाही - खर्गे
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, संसदेचे विशेष अधिवेशन का बोलावले आहे, याची काहीच माहिती नाही. यापूर्वी मिणूर जळत होते तेव्हा बोलावले नाही. कोरोना काळात व नोटाबंदीच्या काळात स्थलांतरित कामगार रस्त्यात मरून पडत होते, तेव्हा बोलावले नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
Fri, 01 Sep 202310:19 AM IST
येणाऱ्या निवडणुकीत हुकुमशाहीच्या विरोधात लढणार – उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे म्हणाले, देशभरातून आलेल्या नेत्यांचे स्वागत करतो. तिसरी बैठक पार पडली. इंडिया मजबूत होत आहे. इंडियाच्या विरोधी दलात भीती निर्माण झाली आहे. सभेत काही महत्त्वाचे निर्णय झाले. येणाऱ्या निवडणुकीत हुकुमशाहीच्या विरोधात लढणार. भ्रष्टाचाराविरोधात लढणार. मित्रपरिवारवादाच्या विरोधात लढणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.
Fri, 01 Sep 202310:07 AM IST
इंडियाची पत्रकार परिषद सुरू, महत्त्वाचे नेते हजर
इंडियाची पत्रकार परिषद सुरू होत आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे, राहुल गांधी तसेच २८ पक्षांचे नेते एकत्र आले आहेत. या बैठकीत दोन ठराव पारीत करण्यात आले आहे. समन्यव समिती नेमण्यात आली आहे.
Fri, 01 Sep 202307:24 AM IST
INDIA Alliance Meeting : इंडिया आघाडीच्या लोगोचं अनावरण पुढे ढकललं
INDIA Alliance Meeting : मुंबईत होत असलेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत संयुक्त पक्षांच्या लोगो अनावरणाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इंडिया आघाडीच्या पुढच्या बैठकीत लोगोचं अनावरण करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
Fri, 01 Sep 202306:38 AM IST
INDIA Alliance Meeting: ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांची दुसऱ्या दिवशीची बैठक सुरू
INDIA Alliance Meeting in Mumbai -
'इंडिया' आघाडीच्या बैठकीला मुंबईत आज, शुक्रवारी दुसऱ्या दिवशी हॉटेल ग्रँड हयात येथे सुरूवात झाली. यावेळी कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव, जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला, कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, पीडीपी नेत्या, माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती व विविध पक्षांचे इतर वरिष्ठ नेते उपस्थित होते.
'इंडिया' आघाडीच्या बैठकीला मुंबईत आज, शुक्रवारी दुसऱ्या दिवशी हॉटेल ग्रँड हयात येथे सुरूवात झाली. यावेळी कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे, एम के स्टॅलिन, नितीश कुमार, फारुख अब्दुल्लांसह इतर वरिष्ठ नेते उपस्थित होते. #INDIAAlliance pic.twitter.com/4YtUoCHXwj
— Hindustan Times Marathi (@htmarathi) September 1, 2023
Thu, 31 Aug 202311:55 AM IST
Rahul Gandhi : नरेंद्र मोदी हे अदानी समूहाला का वाचवतायत?; राहुल गांधी याचा सवाल
अदानी समूहावर जगातील महत्त्वाच्या वर्तमानपत्रांनीही घोटाळ्याचे आरोप केले आहेत. बेनामी कंपन्यांच्या माध्यमातून अदानी समूहामध्ये होणाऱ्या गुंतवणुकीतील पैसा कोणाचा आहे हा खरा प्रश्न आहे. पंतप्रधान मोदी हे संयुक्त संसदीय समिती मार्फत अदानी समूहाची चौकशी का करत नाहीत, असा प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे.
Thu, 31 Aug 202312:33 PM IST
लालू प्रसाद यादव यांनी घेतलं सिद्धिविनायकाचे दर्शन
आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी आज सिद्धिविनायकाचे दर्शन घेतलं. त्यांच्याबरोबर त्यांचे पुत्र व बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव होते.
Thu, 31 Aug 202310:32 AM IST
Rahul Gandhi : थोड्याच वेळात राहुल गांधी यांची पत्रकार परिषद
काँग्रेस नेते राहुल गांधी हे इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी मुंबईत दाखल झाले असून थोड्याच वेळात त्यांची पत्रकार परिषद होणार आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीबरोबरच अदानी समूहावरील आरोपांच्या मुद्द्यावरही ते भाष्य करण्याची शक्यता आहे.
Thu, 31 Aug 202310:29 AM IST
"जुडेगा भारत, जीतेगा इंडिया", मुंबईत दाखल होताच मेहबूबा मुफ्तींची घोषणा
जम्मू -काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री व पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती या 'इंडिया' आघाडीच्या तिसऱ्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी मुंबईत दाखल झाल्या. यावेळी मेहबूबा मुफ्ती यांनी “जुडेगा भारत, जीतेगा इंडिया” अशी घोषणा दिली.
Thu, 31 Aug 202310:26 AM IST
Aaditya Thackeray : मागच्या ९ वर्षांत लोकशाहीला धक्का, त्याविरुद्ध आमची लढाई - आदित्य ठाकरे
देशाच्या स्वातंत्र्यानंतरची जवळपास ७० वर्षे लोकशाही आणि राज्यघटना टिकून राहील. मात्र मागच्या ९ वर्षांत लोकशाहीला आणि राज्यघटनेला धोका निर्माण झाला आहे. ही लोकशाही आणि राज्यघटना आम्हाला जपायची आहे. ते टिकलं तर आपण सगळे टिकू. हुकूमशाहीच्या मानसिकतेविरुद्ध आमची लढाई आहे, असं प्रतिपादन आदित्य ठाकरे यांनी इंडिया आघाडीच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर केलं आहे.
Thu, 31 Aug 202310:06 AM IST
Video - सोनिया गांधी, राहुल गांधी मुंबईत दाखल
'इंडिया' आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा, खासदार सोनिया गांधी व राहुल गांधी आज मुंबईत दाखल.
Video: मुंबईत सुरू असलेल्या दोन दिवसीय 'इंडिया' आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा, खासदार सोनिया गांधी व राहुल गांधी आज मुंबईत दाखल झाले. (Video: ANI)#INDIAAllianceMeeting
— Hindustan Times Marathi (@htmarathi) August 31, 2023
ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लि कराः https://t.co/8TPQvmnUS9 pic.twitter.com/FgRoipI2Ov
Thu, 31 Aug 202309:49 AM IST
गुवाहाटीला जाण्यासाठी चार्टड प्लेनचा खर्च कोणी केला ? आदित्य ठाकरेंचा सामंतांना सवाल
आदित्य ठाकरे यांनी उदय सामंतांच्या आरोपांना उत्तर दिलं आहे. दसरा मेळाव्यात शिंदेंनी एसटीसाठी १० कोटी रुपये दिले असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे. गुवाहाटीला गेले त्याचा खर्च कोणी केला. त्यासाठीच्या चार्टड प्लेनचा खर्च कोणी केला. स्वत:च्या कार्यक्रमाच्या खर्चावर बोला, तसेच ५० खोके कोणी दिले हे आधी सांगा, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.
Thu, 31 Aug 202309:23 AM IST
Video: ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकांमुळे भाजपच्या मनात भीती- आदित्य ठाकरे
‘इंडिया’ आघाडीच्या बैठकांमुळे भाजपच्या मनात भीती निर्माण झालीय- आदित्य ठाकरे
Video : ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकांमुळे भाजपच्या मनात भीती निर्माण झालीय. त्यामुळे भाजप नेते आम्हाला वारंवार लक्ष्य करत आहेतः शिवसेना नेते, माजी मंत्री आदित्य ठाकरे #INDIAAllianceMeeting #adityathackeray @AUThackeray (Video: ANI) pic.twitter.com/fSmm5v3udq
— Hindustan Times Marathi (@htmarathi) August 31, 2023
Thu, 31 Aug 202309:24 AM IST
Video: अखिलेश यादव मुंबईत दाखल.
समाजवादी पार्टीचे अध्यक्ष, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव मुंबईत दाखल. इंडिया आघाडीच्या बैठकीत सामील होणार.
Video: समाजवादी पक्षाचे अध्यक्ष, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव हे आज मुंबईत दाखल झाले. आज आणि उद्या येथे होत असलेल्या INDIA आघाडीच्या बैठकीत यादव सामील होणार आहेत. #INDIAAllianceMeeting #Mumbai #AkhileshYadav pic.twitter.com/HDeOeb0lRY
— Hindustan Times Marathi (@htmarathi) August 31, 2023
Thu, 31 Aug 202308:10 AM IST
INDIA Meeting Mumbai : राहुल गांधींच्या साखरपुड्यासाठी इंडिया आघाडीची बैठक, भाजपाची खोचक टीका
Ashish Deshmukh on INDIA Meeting : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या साखरपुड्यासाठीच मुंबईत इंडिया आघाडीकडून बैठका घेण्यात येत असल्याची टीका भाजपा नेते आशिष देशमुखांनी केली आहे. तसेच मुंबईत डरपोकांचा घमेंडीया मेळावा होत असून बाळासाहेबांचं द्वेष करणाऱ्यांचं महाराष्ट्रात स्वागत केलं जात आहे, अशी टीका मुंबई भाजपचे प्रदेशाध्यक्ष आशिष शेलारांनी केली आहे.
Thu, 31 Aug 202308:06 AM IST
INDIA Meeting Banner : ग्रॅन्ड हयातबाहेरील इंडिया आघाडीचे बॅनर हटवले
INDIA Meeting Banner : विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या बैठकीपूर्वी मुंबईतील ग्रॅन्ड हयात हॉटेल बाहेर लावण्यात आलेले बॅनर पालिकेकडून हटवण्यात आले आहे. विरोधकांचे बॅनर्स अनधिकृत असल्याचा दावा करत बीएमसीने बॅनर हटवले आहे. त्यामुळं आता यावरून राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे.
Thu, 31 Aug 202307:11 AM IST
Sanjay Nirupam : राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत ही काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा; संजय निरुपम यांचा दावा
Rahul Gandhi for PM : राहुल गांधी हे देशाचे पंतप्रधान व्हावेत ही काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा आहे. मात्र, ते 'इंडिया' आघाडीचे उमेदवार असावेत असं आम्ही म्हणणार नाही. इंडिया आघाडीला यश मिळेल, सरकार बनवण्याची वेळ येईल तेव्हा सर्व नेते मिळून सहमतीचा उमेदवार ठरवतील, असं संजय निरुपम म्हणाले.
Thu, 31 Aug 202303:10 AM IST
Maharashtra Weather : महाराष्ट्रात पुढील पाच दिवस पावसाचे, हवामान खात्याचा अंदाज
Maharashtra Weather News : महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळं हवामान खात्याकडून अनेक जिल्ह्यांना यलो ॲलर्ट देण्यात आला आहे. मुंबई, पुण्यासह मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आयएमडीकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळं आता पावसाच्या प्रतिक्षेत असलेल्या बळीराला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
Thu, 31 Aug 202312:58 AM IST
NDA Meeting : मुंबईत महायुतीची बैठक, शिंदे-फडणवीसांची हजेरी
NDA Meeting Mumbai : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज राज्यातील सत्ताधारी अर्थात राष्ट्रीय लोकशाही आघाडीची बैठक होणार आहे. आगामी विधानसभा तसेच लोकसभा निवडणुकीसाठी शिंदे-फडणवीसांकडून तयारी करण्यात येत आहे.
Thu, 31 Aug 202312:57 AM IST
INDIA Meeting : इंडिया आघाडीची आजपासून मुंबईत बैठक
INDIA Meeting Mumbai : देशातील २६ विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची आजपासून मुंबईत दोनदिवसीय बैठक होणार आहे. त्यासाठी अनेक पक्षांचे नेते मुंबईत दाखल होत आहे. आगामी विधानसभा तसेच लोकसभा निवडणुकीवर इंडिया आघाडीच्या बैठकीत खलबतं होणार आहे.