मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Adani on tunnel collapse : अदानींच्या कंपनीमुळं उत्तराखंडमधील बोगद्यात अडकले ४१ मजूर? नेमकं सत्य काय?

Adani on tunnel collapse : अदानींच्या कंपनीमुळं उत्तराखंडमधील बोगद्यात अडकले ४१ मजूर? नेमकं सत्य काय?

Nov 27, 2023, 07:11 PM IST

  • Adani group on Silkyara barkot tunnel collapse : उत्तरकाशी येथील बोगद्याच्या दुर्घटनेसाठी अदानी समूह जबाबदार असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर समूहानं तातडीनं खुलासा केला आहे. 

Silkyara barkot tunnel

Adani group on Silkyara barkot tunnel collapse : उत्तरकाशी येथील बोगद्याच्या दुर्घटनेसाठी अदानी समूह जबाबदार असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर समूहानं तातडीनं खुलासा केला आहे.

  • Adani group on Silkyara barkot tunnel collapse : उत्तरकाशी येथील बोगद्याच्या दुर्घटनेसाठी अदानी समूह जबाबदार असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर समूहानं तातडीनं खुलासा केला आहे. 

Uttarkashi Tunnel Collapse news : उत्तराखंड येथील सिलक्यारा-बरकोट बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांना बाहेर काढण्यासाठी सातत्यानं प्रयत्न सुरू आहेत. सैन्याचीही मदत घेण्यात आली आहे. हे सगळं सुरू असताना या अपघातासाठी अदानी ग्रुपला जबाबदार धरत आहेत. संभ्रम निर्माण करणाऱ्या या चर्चेवर अदानी समूहानं खुलासा केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

अदानी समूहानं या संदर्भात निवेदन प्रसिद्ध केलं आहे. 'सिलक्यारा-बरकोट इथं सुरू असलेल्या बोगद्याच्या प्रकल्पाशी आमच्या कोणत्याही कंपनीचा किंवा उपकंपनीचा अजिबात संबंध नाही. 'काही घटक खोडसाळपणे उत्तराखंडमधील दुर्दैवी घटनेशी आमचा संबंध जोडण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी माहिती आम्हास मिळाली आहे. आम्ही याचा आम्ही तीव्र निषेध करतो, असं कंपनीनं म्हटलं आहे.

iPhone SE 4: अ‍ॅप्पलच्या चाहत्यांसाठी खूशखबर; अँड्रॉइडपेक्षाही स्वस्तात येतोय नवा आयफोन!

'अदानी समूहाचा या प्रकल्पाशी दुरान्वये देखील संबंध नाही. या बोगद्याच्या बांधकामात गुंतलेल्या कंपनीमध्ये आमची कोणतीही भागीदारी नाही. बोगद्यात अडकलेल्या कामगारांच्या सुखरूप सुटकेसाठी आम्ही प्रार्थना करतो. त्या कामगारांच्या व त्यांच्या कुटुंबायांच्या पाठीशी आमच्या सदिच्छा आहेत, असं निवेदनात म्हटलं आहे.

मदतकार्याची सध्याची स्थिती काय?

बोगद्यात अडकलेल्या मजुरांपर्यंत पोहोचण्यासाठी वरच्या बाजूनं ड्रिलिंग केलं जात आहे. काल (रविवार, २६ नोव्हेंबर) दुपारपासून सुरू झालेलं हे ड्रिलिंग ३१ मीटरपर्यंत पोहोचलं आहे.

बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचे माजी महासंचालक हरपाल सिंग यांच्या निरीक्षणखाली हे काम सुरू आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ३१ मीटर ड्रिलिंग करण्यात आलं आहे. बोगद्यात अडकलेल्या कामगारांपर्यंत पोहोचण्यासाठी एकूण ८६ मीटर ड्रिलिंग करण्यात येणार असून त्यासाठी चार दिवस लागणार आहेत.

himalayan 450 launch : रॉयल एनफ्लिडचा दणदणीत अवतार 'हिमालयन ४५०' अखेर बाजारात, काय आहे खास? वाचा

यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर बांधण्यात येत असलेल्या सिलक्यारा बोगद्याचा काही भाग १२ नोव्हेंबर २०२३ रोजी कोसळला होता. त्यावेळी तिथं काम करणारे कामगार आतमध्ये अडकले होते. त्यांना वाचवण्यासाठी अनेक यंत्रणांकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. आज या बचावकार्याचा १६ वा दिवस आहे.

विभाग

पुढील बातम्या