himalayan 450 launch : रॉयल एनफ्लिडचा दणदणीत अवतार 'हिमालयन ४५०' अखेर बाजारात, काय आहे खास? वाचा-royal enfield himalayan 450 launched know check price features engine rivals ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  himalayan 450 launch : रॉयल एनफ्लिडचा दणदणीत अवतार 'हिमालयन ४५०' अखेर बाजारात, काय आहे खास? वाचा

himalayan 450 launch : रॉयल एनफ्लिडचा दणदणीत अवतार 'हिमालयन ४५०' अखेर बाजारात, काय आहे खास? वाचा

Nov 25, 2023 02:01 PM IST

Royal Enfield Himalayan 450 : रॉयल एनफिल्डने त्यांची नवीन अॅडव्हेंचर बाईक लॉंच केली आहे. याची वैशिष्टे जाणून घेणार आहोत.

Royal Enfield Himalayan 450
Royal Enfield Himalayan 450

Royal Enfield Himalayan 450 Launched : रॉयल एनफिल्डने हिमालयन 450/452 लॉन्च केली केली. गोव्यातील मोटोवर्स इव्हेंटमध्ये हे लाँचिंग करण्यात आले पडले. रॉयल एनफिल्ड हिमालयन 450/452 ची सुरुवातीची किंमत २.६९ लाख रुपयांपासून सुरू होते आणि टॉप मॉडेल २.८४ लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम किंमत) आहे. कंपनीने सांगितल्याप्रमाणे, या किमती ३१ डिसेंबर २०२३ पर्यंतच वैध आहेत.

हिमालयन 450/452 च्या इंजिनमध्ये खास काय?

रॉयल एनफिल्ड हिमालयनचे इंजिन पॉवर आणि तंत्रज्ञानाने अद्ययावत करण्यात आले आहे. यात नवीन 452 cc लिक्विड-कूल्ड DOHC सिंगल-सिलेंडर इंजिन आहे. जे ८,००० rpm वर ३९.५ hp ची कमाल पॉवर आणि ५,५०० rpm वर ४० NM चा पीक टॉर्क जनरेट करते, जे असिस्ट आणि स्लिपर क्लचसह ६-स्पीड गिअर बॉक्सशी जोडलेले आहे. हे अतिशय प्रगत इंजिन मानले जाते.

रॉयल एनफिल्ड हिमालयन 450 सस्पेंशन आणि ब्रेकिंग

सस्पेन्शनसाठी, यात पुढील बाजूस ४३ मिमी USD फोर्क्स आहेत, तर मागील बाजूस प्री-लोड अॅडजस्टेबल मोनोशॉक देण्यात आला आहे. ब्रेकिंगबद्दल बोलायचे झाले तर समोर ३२० मिमी सिंगल डिस्क आणि मागील बाजूस २७०  मिमी डिस्क आहे आणि या एडव्हेंचर टूरिंग बाइकचे वजन १९६ किलो आहे. तर इंधन टाकीची क्षमता १७-लिटर आहे.

यांच्याशी स्पर्धा होईल

देशांतर्गत बाजारात ही बाईक थेट KTM 390 Adventure शी स्पर्धा करेल याशिवाय येझदी अॅडव्हेंचर, BMW G 310 GS आणि नवीन Triumph Scrambler 400X यांचाही या स्पर्धेत समावेश आहे.

विभाग