मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Trident Techlabs : ३५ रुपयांचा चिटुकला शेअर पहिल्याच दिवशी पोहोचला ९८ वर, आता खरी परीक्षा

Trident Techlabs : ३५ रुपयांचा चिटुकला शेअर पहिल्याच दिवशी पोहोचला ९८ वर, आता खरी परीक्षा

Dec 29, 2023, 05:26 PM IST

  • Trident Techlabs IPO Listing : ट्रायडन्ट टेकलॅब्स या कंपनीचा आयपीओ आज शेअर बाजारात सूचीबद्ध झाला. कशी आहे या शेअरची कामगिरी? वाचा…

IPO Listing News

Trident Techlabs IPO Listing : ट्रायडन्ट टेकलॅब्स या कंपनीचा आयपीओ आज शेअर बाजारात सूचीबद्ध झाला. कशी आहे या शेअरची कामगिरी? वाचा…

  • Trident Techlabs IPO Listing : ट्रायडन्ट टेकलॅब्स या कंपनीचा आयपीओ आज शेअर बाजारात सूचीबद्ध झाला. कशी आहे या शेअरची कामगिरी? वाचा…

Trident Techlabs IPO Listing News : ट्रायडन्ट टेकलॅब्स या छोट्या कंपनीच्या शेअरनं पहिल्याच दिवशी बाजारात धम्माल उडवून दिली आहे. आयपीओमध्ये अवघ्या ३५ रुपयांना इश्यू करण्यात आलेला हा शेअर तब्बल १८० टक्के नफ्यासह ९८.१५ रुपयाला सूचीबद्ध झाला आहे. त्यामुळं गुंतवणूकदारांना कागदावर मोठा नफा दिसत आहे. तो पदरात पाडून घ्यायची की आणखी वाट बघायची, असा पेच आता गुंतवणूकदारांना पडला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

Smartphone Under 20000: रिअलमीपासून ते वनप्लसपर्यंत; मे महिन्यात २० हजारांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च झालेले स्मार्टफोन!

Business Ideas : ‘असतील शिते तर जमतील भुते...’ पैशाची किमया अन् मित्रांचे कोंडाळे!

ट्रायडन्ट टेकलॅब्सची स्थापना २००० मध्ये झाली होती. ही कंपनी एरोस्पेस, संरक्षण, ऑटोमोटिव्ह, दूरसंचार, सेमीकंडक्टर आणि उर्जा वितरण क्षेत्रातील उद्योगांना तंत्रज्ञान आधारित सेवा पुरवते. कंपनीचा आयपीओ २१ डिसेंबर ते २६ डिसेंबर दरम्यान सबस्क्रिप्शनसाठी खुला होता. तो ३५ रुपयांवर इश्यू झाला.

Small Saving Scheme : पीपीएफ, सुकन्या सारख्या अल्पबचत योजनांवरील व्याजदर वाढण्याची शक्यता

ट्रायडन्ट टेकलॅब्सच्या शेअरनं दुप्पट नफा मिळवून दिल्यानंतर काही गुंतवणूकदारांनी नफा पदरात पाडून घ्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळं लिस्टिंगनंतर पहिल्याच दिवशी शेअरला लोअर सर्किट लागलं आहे. हा शेअर घसरून ९३.२५ रुपयांवर पोहोचला आहे.

आयपीओवर लागली होती ७६३ पट बोली

ट्रायडन्ट टेकलॅब्सच्या आयपीओमध्ये लोकांनी मोठी गुंतवणूक केली होती. कंपनीचा आयपीओ एकूण ७६३.३० पट सबस्क्राइब झाला. किरकोळ गुंतवणूकदार श्रेणीत हा आयपीओ १०५९.४३ पट सबस्क्राइब झाला. बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या श्रेणीत तो ८५४.३७ पट सबस्क्राइब झाला होता, तर क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्स (QIB) श्रेणीमध्ये ११७.९१ पट सबस्क्रिप्शन मिळाले होते.

विभाग

पुढील बातम्या