मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Anand Mahindra : शर्टाची घडी करण्याचे महिलांचे कसब पाहून थक्क झाले आनंद महिंद्रा, म्हणाले…

Anand Mahindra : शर्टाची घडी करण्याचे महिलांचे कसब पाहून थक्क झाले आनंद महिंद्रा, म्हणाले…

Apr 12, 2023, 03:55 PM IST

  • Anand Mahindra Viral Tweet : महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे अध्यक्ष आनंद महिंद्रा सोशल मिडियावर खूप अॅक्टिव्ह असतात. गेल्या काही दिवसांपासून त्यांची एक पोस्ट नेटिझन्सचे लक्ष वेधून घेत आहे. 

Anand Mahindra HT

Anand Mahindra Viral Tweet : महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे अध्यक्ष आनंद महिंद्रा सोशल मिडियावर खूप अॅक्टिव्ह असतात. गेल्या काही दिवसांपासून त्यांची एक पोस्ट नेटिझन्सचे लक्ष वेधून घेत आहे.

  • Anand Mahindra Viral Tweet : महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे अध्यक्ष आनंद महिंद्रा सोशल मिडियावर खूप अॅक्टिव्ह असतात. गेल्या काही दिवसांपासून त्यांची एक पोस्ट नेटिझन्सचे लक्ष वेधून घेत आहे. 

Anand Mahindra Tweet : महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे अध्यक्ष आनंद महिंद्रा सोशल मिडियावर खूप अॅक्टिव्ह असतात. गेल्या काही दिवसांपासून त्यांची एक पोस्ट नेटिझन्सचे लक्ष वेधून घेत आहे. त्यांनी नुकतेच ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात एक महिला केवळ तीन स्टेप्समध्ये अत्यंत सुबकपणे शर्टाची घडी करताना दिसत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

आनंद महिंद्रांनी जो व्हिडिओ शेअर केला आहे त्यात एक महिला ३ सोप्या स्टेप्स फाॅलो करत शर्टाची घडी करताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, शर्टाच्या वर तीन कार्ड्स ठेवण्यात आले आहेत. त्या ठिकाणाहून शर्ट्स सोप्प्या पद्धतीने फोल्ड केला आणि व्यवस्थित ठेवून दिला.

आनंद महिंद्रा यांना हा व्हिडिओ खूप आवडला. त्यांनी व्हिडिओ शेअर करताना लिहिले आहे की, मी अशा छोट्या गोष्टींपासून खूप लवकर इंम्प्रेस होतो. मी जग बदलू शकत नाही. पण महिलेनी केलेली ही गोष्ट अत्यंत रचनात्मक आणि जबरदस्त डोकॅलिटीचा भाग आहे. संसारात वेळ वाचवणारी प्रत्येक गोष्ट प्रगतीच्या पथावर नेणारी आहे.

आनंद महिंद्रा यांनी ही पोस्ट ५ एप्रिलला ट्विटरवर शेअर केली होती. यानंतर या व्हिडिओला आतापर्यंत १ दशलक्षांपेक्षा अधिक वेळा यूजर्सनी पाहिले आहे. त्यावर कमेंट्सही केल्या आहेत.

एका यूजरने लिहिले की, 'या व्हिडिओमध्ये पाहताना हे खूप सोपे वाटू शकते. पण प्रत्येकासाठी हे करणं सोपं नसतं.' दुसर्‍या यूजरने मजेशीर कमेंट केली, "मी माझ्या पोलो टी-शर्टवर प्रयत्न केला आणि बदल्यात आईची फ्लाइंग सँडल मिळाली. कोणीतरी बरोबरच म्हटले आहे की, त्याचे काम दुसऱ्याने शेअर केले तर त्याला लाठ्या-काठ्या मारल्या जातील.

विभाग

पुढील बातम्या