मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Black Monday : सेन्सेक्स १३०० अंश कोसळला, ६.६ लाख कोटींचा चुराडा, घसरणीमागची ही आहेत नेमकी कारणे

Black Monday : सेन्सेक्स १३०० अंश कोसळला, ६.६ लाख कोटींचा चुराडा, घसरणीमागची ही आहेत नेमकी कारणे

Mar 13, 2023, 05:59 PM IST

    • Black Monday : अदानी समूहाच्या धक्क्यातून भारतीय शेअर बाजार सावरतच होते, तेवढ्यात एसव्हीबी बँकेने आणखीनच एक धक्का दिला. या बातमीनेच घबराट उडालेल्या भारतीय शेअर बाजारात सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी निर्देशांक तब्बल १३०० अंशांनी घसरला. या घसरणीमागची नेमकी कारण काय ते जाणून घेऊया.
Sensex collaps HT

Black Monday : अदानी समूहाच्या धक्क्यातून भारतीय शेअर बाजार सावरतच होते, तेवढ्यात एसव्हीबी बँकेने आणखीनच एक धक्का दिला. या बातमीनेच घबराट उडालेल्या भारतीय शेअर बाजारात सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी निर्देशांक तब्बल १३०० अंशांनी घसरला. या घसरणीमागची नेमकी कारण काय ते जाणून घेऊया.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

आज सोमवारी बाजारबंद होते वेळी सेन्सेक्समध्ये तब्बल ७७३.४७ अंशांची (१.३१ टक्के) घट होऊन ५८,३६१.९२ अंशांवर स्थिरावला. तर निफ्टीतही २२५.८० अंशांची (१.३० टक्के) घट नोंदवत तो दिवसअखेर १७,१८७.१० अंश पातळीवर बंद झाला.

आज सकाळपासूनच सुरुवात दोन्ही निर्देशांकांची निराशाजनक झाली. पहिल्याच सत्रात निर्देशांक अंदाजे ८९.०९ अंशांची (०.१५ टक्के) घसरण नोंदवत तो अंदाजे ५९,१२५.०६ अंश पातळीवर खुला झाला.तर निफ्टीमध्ये ६४.०५ अंशांची वाढ नोंदवत तो अंदाजे १७,४८०.२५ अंश पातळीवर खुला झाला.

गेल्या तीन ट्रेडिंग सत्रांमध्ये गुंतवणूकदारांचे ६.६ कोटी रुपये बुडाले आहेत. एसव्हीबी बँकेचा परिणाम जागतिक पातळीवरही मोठ्या प्रमाणात दिसत आहे. परिणामी, तीन ट्रेडिंग सेशनमध्ये सेन्सेक्समध्ये तब्बल २००० अंशांची घट दिसत आहे.

आज दिवसभरात बँक स्टाॅक्सवर सर्वात वाईट परिणाम दिसून आला. भारतीय बँकांवर नियमकांची कडक चौकट आहे, असे विश्लेषक आणि ब्रोकरेज सांगत आहेत. पण एसव्हीबी बँकेचा परिणाम भारतीय बाजारातही बँक स्टाॅक्सवर प्रामुख्याने दिसून आला.

१. अमेरिकन बँक नियामकाने एसव्हीबी आणि सिग्नेचर बँक प्रकरणात उडी घेतली. तरीही या दोन्ही बँकांनी सेंटिमेंट् खराब केले.

२. वाॅल स्ट्रिटवरील परिणाम आशियाई बाजारातही दिसून आला. गेल्या आठवड्यात डाउ जोन्समध्ये ४.४ टक्के एस अँड पी मध्ये ४.५ टक्के, नॅसडॅकमध्ये ४.७ टक्के,जपान निक्केई इंडेक्समध्ये १.१ टक्के, आॅस्ट्रेलियन एएसएक्स २०० मध्ये ०.५ टक्के घट झाली.

३. जागतिक बाजारातील बँक स्टाॅकमधील नकारात्मक संवेदनांचा परिणाम निफ्टी बँक स्टाॅक्सवर झाला. आज बँक स्टाॅकमध्ये २.३ टक्के घट झाली. इंडसएड बँकेला सर्वाधिक ७ टक्के घट झाली. पीएसयू बँक स्टाॅकेत ५ टक्के घट झाली.

४. एसव्हीबी संकटाच्या पार्श्वभूमीवर ५० बेसिस पॉइंट रेट वाढण्याची शक्यता कमी झाली असली तरी, गुंतवणूकदार फेब्रुवारीच्या ग्राहक किंमत निर्देशांकावर आणि फेब्रुवारीसाठी उत्पादक किंमत निर्देशांकाकडे डोळे लावून बसले आहेत.

विभाग

पुढील बातम्या