मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Sensex Collapse : सेन्सेक्स कोसळला, ८०० अंशांची घसरण, सर्वच स्टाॅक लाल निशाण्यांमध्ये बंद

Sensex Collapse : सेन्सेक्स कोसळला, ८०० अंशांची घसरण, सर्वच स्टाॅक लाल निशाण्यांमध्ये बंद

Mar 10, 2023, 04:34 PM IST

    • Sensex Collaps :  शुक्रवारी आठवड्याच्या शेवटच्या सत्रात सेन्सेक्स ६७१.१५ अंशांनी म्हणजेच १.१२ टक्क्यांनी घसरून ५९,१३५.१३ अंशांवर बंद झाला. निफ्टी १७६.७० अंशांनी म्हणजेच १ टक्क्यांनी घसरून १७,४१२.९० अंशांवर स्थिरावला. 
sensex collaps HT

Sensex Collaps : शुक्रवारी आठवड्याच्या शेवटच्या सत्रात सेन्सेक्स ६७१.१५ अंशांनी म्हणजेच १.१२ टक्क्यांनी घसरून ५९,१३५.१३ अंशांवर बंद झाला. निफ्टी १७६.७० अंशांनी म्हणजेच १ टक्क्यांनी घसरून १७,४१२.९० अंशांवर स्थिरावला.

    • Sensex Collaps :  शुक्रवारी आठवड्याच्या शेवटच्या सत्रात सेन्सेक्स ६७१.१५ अंशांनी म्हणजेच १.१२ टक्क्यांनी घसरून ५९,१३५.१३ अंशांवर बंद झाला. निफ्टी १७६.७० अंशांनी म्हणजेच १ टक्क्यांनी घसरून १७,४१२.९० अंशांवर स्थिरावला. 

Sensex Collapse : आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी भारतीय शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण पाहायला मिळाली. खराब जागतिक संकेतांमुळे बाजारात विक्रीचा दबाव दिसून आला. आजच्या व्यवहारात बँकिंग आणि रिअल्टी समभागांमध्ये विक्री दिसून आली. तर ग्राहकोपयोगी वस्तू आणि आयटी समभागांवर दबाव होता. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स ६७१.१५ अंशांनी म्हणजेच १.१२ टक्क्यांनी घसरून ५९,१३५.१३ अंशांवर बंद झाला. निफ्टी १७६.७० अंशांनी म्हणजेच १ टक्क्यांनी घसरून १७,४१२.९० वर बंद झाला. या घसरणीमुळे आज गुंतवणूकदारांचे १.६ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

शुक्रवारच्या व्यवहारात अदानी एंटरप्रायझेस, एचडीएफसी बँक, अपोलो हॉस्पिटल्स, एसबीआय आणि एचडीएफसी हे निफ्टीमध्ये सर्वाधिक घसरले. तर टाटा मोटर्स, एनटीपीसी, मारुती सुझुकी, ब्रिटानिया इंडस्ट्रीज आणि बीपीसीएल हे निफ्टीमध्ये सर्वाधिक वाढले.

एकाच दिवसात १.६ लाख कोटींचे नुकसान

एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.६ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. आज बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल १० मार्च रोजी २६२.७० लाख कोटी रुपयांवर घसरले आहे, जे त्याच्या आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजेच गुरुवार,९ मार्च रोजी रु. २६४.३०लाख कोटी होते. अशा प्रकारे, बीएसईमध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे १.६ लाख कोटी रुपयांनी कमी झाले आहे.

बाजार खुला होतानाची स्थिती

अमेरिकन शेअऱ बाजारातील घसरणीचा परिणाम आज मुंबई शेअर बाजारावर दिसून आला. सुरुवातीच्या सत्रांमध्ये सेन्सेक्सममध्ये ८०० अंशांची घसरण होऊन तो अंदाजे ५९.०८१.७४ अंश पातळीवर खुला झाला. निफ्टीमध्ये १९५ अंशांची घट नोंदवत १७,३९४.३० अंश पातळीवर खुला झाला. आज शेअर बाजारची सुरुवात कमकूवत झाली.

आज निफ्टी टाॅप लूजर्समध्ये अदानी एंटरप्राईजेस, हिंडाल्को, टेक महिंद्रा, आयसीआयसीआय बँक आणि अँक्सिस बँक सारख्या स्टाॅक्सचा समावेश आहे. निफ्टी टाॅप गेनर्समध्ये टाटा मोटर्स, ब्रिटानिया, बजाज आँटो यांचा समावेश आहे. बँक निफ्टीतही १.६८ टक्के घसरण झाली. निफ्टी आँटो, निफ्टी एफएमसीजीही लाल निशाण्यावर बंद झाले. निफ्टी फायनान्शिअल सर्व्हिसेस १.६९ टक्के, निफ्टी आयटी १.१४ टक्के घसरला आहे.

वास्तविक, गुरुवारी वाॅल स्ट्रीटच्या प्रमुख निर्देशांक डाऊ जोन्स मध्ये ५४३ अंशांची घट नोंदवत ३२२५४ च्या पातळीवर बंद झाला. एस अँड पी ५००मध्ये १.८५ अंशांची घट नोंदवण्यात आली. नॅसडॅक २.०५ टक्के अथवा २३७ अंश घसरुन ११३३८च्या पातळीवर बंद झाला.

अदानी समूहाच्या शेअर्समध्ये दबाव

गेल्या काही दिवसांपासून रिकव्हरीमध्ये असलेल्या अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा एकदा बाऊन्स बॅक होताना दिसत आहे. सुरुवातीच्या सत्रात अदानी ग्रीन आणि अदानी ट्रान्समिशन वगळता ग्रुपमधील सर्व स्टाॅक्समध्ये घट दिसत आहे.

शुक्रवारी सकाळी सुरुवातीलाच सेन्सेक्स कोसळला.बँक, आयटी, मेटल, पीएसयू बँक, भांडवली वस्तूंसह सर्व इंडेक्समध्ये १ ते २ टक्क्यांची घसरण झाली आहे.

विभाग

पुढील बातम्या