मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Suzlon Energy : दोन रुपयांवरून २५ रुपयांवर पोहोचला सुझलॉनचा शेअर, गुंतवणूकदारांची श्रावणातच दिवाळी

Suzlon Energy : दोन रुपयांवरून २५ रुपयांवर पोहोचला सुझलॉनचा शेअर, गुंतवणूकदारांची श्रावणातच दिवाळी

Aug 30, 2023, 01:29 PM IST

  • Suzlon Share Price : ऊर्जा क्षेत्रातील महत्त्वाची कंपनी सुझलॉन एनर्जीचे शेअर प्रचंड तेजीत असून गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत.

Suzlon Share Price

Suzlon Share Price : ऊर्जा क्षेत्रातील महत्त्वाची कंपनी सुझलॉन एनर्जीचे शेअर प्रचंड तेजीत असून गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत.

  • Suzlon Share Price : ऊर्जा क्षेत्रातील महत्त्वाची कंपनी सुझलॉन एनर्जीचे शेअर प्रचंड तेजीत असून गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत.

Multibagger Stock : नुतनीकृत ऊर्जा क्षेत्रातील कंपनी सुझलॉन एनर्जी सध्या भलताच फॉर्मात आहे. मागची काही वर्षे एक आकडी भाव असलेला हा शेअर गेल्या पाच महिन्यांपासून सुस्साट सुटला आहे. मागील तीन दिवसांपासून सतत या शेअरला अप्पर सर्किट लागत आहे. आजही हा शेअर जवळपास ५ टक्क्यांनी वाढून २५.८९ रुपयांवर गेला आहे. त्यामुळं गुंतवणूकदारांची श्रावणातच दिवाळी सुरू झाली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

काल आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी सुझलॉनचे शेअर बीएसईवर २४.६६ रुपयांवर बंद झाले होते. आज त्याचा भाव २५.८५ रुपयांवर आहे. सुझलॉन एनर्जीच्या शेअरनं गेल्या ३ वर्षांत मोठी झेप घेतली आहे. या कालावधीत कंपनीचे शेअर्स तब्बल ११८१ टक्क्यांनी वाढले आहेत.

LPG Price : सिलिंडर २०० रुपयांनी स्वस्त; तुमच्या शहरात किती रुपयांना मिळणार? पाहा

२ रुपयांवरून २५ रुपयांवर

सुझलॉन एनर्जीचा शेअर मुंबई स्टॉक एक्स्चेंज (BSE) वर ३ एप्रिल २०२० रोजी २.०२ रुपयांवर होता. आज, ३० ऑगस्ट २०२३ रोजी हाच शेअर २५.८९ रुपयांवर पोहोचला आहे. या कालावधीत कंपनीच्या शेअरनं गुंतवणूकदारांना ११८१ टक्के परतावा दिला आहे. एखाद्या व्यक्तीने ३ एप्रिल २०२० रोजी सुझलॉनच्या शेअर्समध्ये १ लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल आणि ती आजही कायम असेल तर गुंतवणुकीचं मूल्य १२.८१ लाख रुपये असेल.

पाच महिन्यांत २६५ टक्के वाढ

सुझलॉन एनर्जीच्या शेअर्समध्ये गेल्या ५ महिन्यांपासून मोठी तेजी दिसत आहे. २८ मार्च २०२३ रोजी कंपनीचे शेअर्स BSE वर ७.०८ रुपयांवर ट्रेड करत होते. गेल्या ५ महिन्यांत त्यात २६५ टक्क्यांची वाढ झाली आहे. मागच्या एका महिन्यात कंपनीच्या शेअरचा भाव ३७ टक्क्यांनी वाढला आहे. तर ६ महिन्यांत २१७ टक्क्यांनी वाढला आहे.

किती रुपयांवर जाणार सुझलॉनचा शेअर?

'जेएम फायनान्शियल' या ब्रोकरेज हाऊसच्या अंदाजानुसार या शेअरमध्ये पुढचे काही दिवस तेजी कायम राहील. ही फर्म सुझलॉनच्या शेअरबद्दल आशावादी असून त्यास बाय रेटिंग दिलं आहे. हा शेअर ३० रुपयांपर्यंत जाईल असं ब्रोकरेज हाऊसनं म्हटलं आहे. सुझलॉन एनर्जीच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी ६.६० रुपये आहे.

Lakh vs lac on Cheque : चेकवर काय लिहिता Lakh की Lac? वाचा आरबीआयचा नियम

(डिस्क्लेमर : हे वृत्त कंपनीच्या शेअर बाजारातील कामगिरीवर आधारित आहे. मार्केट एक्स्पर्ट्सची मते त्यांची स्वत:ची आहेत. हिंदुस्तान टाइम्स मराठी त्याच्याशी सहमत असेलच असे नाही. हे वृत्त म्हणजे कुठल्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. वाचकांनी तो निर्णय स्वत:च्या सल्लागाराशी चर्चा करूनच घ्यावा.)

पुढील बातम्या