मराठी बातम्या  /  बिझनेस  /  LPG Price : सिलिंडर २०० रुपयांनी स्वस्त; तुमच्या शहरात किती रुपयांना मिळणार? पाहा

LPG Price : सिलिंडर २०० रुपयांनी स्वस्त; तुमच्या शहरात किती रुपयांना मिळणार? पाहा

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Aug 29, 2023 07:07 PM IST

LPG Cylinder Price in Mumbai : घरगुती गॅसच्या किंमतीत केंद्र सरकारनं २०० रुपयांची कपात केल्यानंतर आता तुमच्या शहरात सिलिंडरचा भाव किती असेल जाणून घ्या.

Gas Cylinder Price
Gas Cylinder Price

LPG Cylinder Price in your city : रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी घरगुती गॅस सिलिंडरचे भाव थेट २०० रुपयांनी कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला. त्याचा फायदा जवळपास १० कोटी कुटुंबांना होणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

केंद्र सरकारनं केलेली दर कपात १४.२ किलोच्या सिलिंडरवरील असून उज्ज्वला योजनेतील लाभार्थींना त्याचा फायदा होणार आहे. केंद्राच्या निर्णयानंतर आता देशभरात सिलिंडरचे दर कमी होणार आहेत. मात्र, सध्या देशभरात सिलिंडरची किंमत समान नाही. त्यात एक रुपयांपासून २५ रुपयांपर्यंतचा फरक आहे. त्यामुळं २०० रुपये कमी झाल्यानंतरही नवी किंमत वेगळीच असेल. आजच्या निर्णयानंतर कोणत्या शहरात सिलिंडरचा भाव नेमका किती असेल हे जाणून घ्यावं लागेल.

National Space Day: भारतात ‘या’ दिवशी साजरा होणार राष्ट्रीय अंतराळ दिवस!

कोणत्या शहरात किती दर?

देशाची राजधानी दिल्लीत १४.२ किलोच्या सिलिंडरची किंमत ११०३ रुपये आहे. आजच्या २०० रुपये सबसिडीच्या निर्णयानंतर ही किंमत ९०३ रुपये होईल.

कोलकात्यात एलपीजी सिलिंडरची किंमत सध्या १,१२९ रुपये आहे. आता ती ९२९ रुपये होईल.

मुंबईत सिलिंडरची सध्याची किंमत ११०२.५० रुपये आहे. दर कपातीनंतर हा किंमत ९०२.५० रुपये होईल.

चेन्नई शहरात नवीन एलपीजी सिलिंडरची किंमत १११८.५० रुपयांवरून ९१८.५० रुपयांवर येईल.

उज्ज्वला ग्राहकांना दिलासा

केंद्र सरकार आता उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना एकूण ४०० रुपये अनुदान देणार आहे. या योजनेतील लाभार्थ्यांना २०० रुपयांची सवलत आधीपासूनच मिळते. त्यात आता आणखी २०० रुपयांची वाढ झाली आहे. याशिवाय उज्ज्वला योजनेअंतर्गत केंद्र सरकार आणखी ७५ लाख नवीन एलपीजी कनेक्शन मोफत देणार आहे. सुमारे १० कोटी लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे.

job recruitment : केंद्र सरकारी कंपनीत ४२५ प्रशिक्षणार्थी पदांची भरती, जाणून घ्या अटी व नियम

गॅस सिलिंडरचा नवा दर कुठे पाहाल?

घरगुती किंवा व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरातील बदल तुम्हाला स्वत: जाणून घ्यायचा असल्यास https://iocl.com/prices-of-petroleum-products या लिंकला भेट द्या. इंडियन ऑइलच्या अधिकृत वेबसाइटवर एलपीजीच्या किमतीतील बदल पाहता येतील.

WhatsApp channel