मराठी बातम्या  /  बिझनेस  /  small savings scheme : अल्पबचत योजनांवरील नवे व्याजदर जाहीर! PPF, NSC वरील व्याज वाढले की घटले? वाचा

small savings scheme : अल्पबचत योजनांवरील नवे व्याजदर जाहीर! PPF, NSC वरील व्याज वाढले की घटले? वाचा

Sep 29, 2023, 07:07 PM IST

  • small savings scheme interest rates : केंद्र सरकारनं अल्प बचत योजनांवरील नवे व्याजदर जाहीर केले आहेत.

small savings scheme interest rates

small savings scheme interest rates : केंद्र सरकारनं अल्प बचत योजनांवरील नवे व्याजदर जाहीर केले आहेत.

  • small savings scheme interest rates : केंद्र सरकारनं अल्प बचत योजनांवरील नवे व्याजदर जाहीर केले आहेत.

small savings scheme interest rates : ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीसाठी केंद्र सरकारनं अल्प बचत योजनांवरील सुधारीत व्याजदर जाहीर केले आहेत. त्यानुसार, पोस्ट ऑफिसमधील पाच वर्षे मुदतीच्या रिकरिंग डिपॉझिटवर (RD) ०.२० टक्के वाढ करण्यात आली आहे. अन्य सर्व अल्पबचत योजनांवरील व्याज पूर्वीप्रमाणेच राहणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

Smartphone Under 20000: रिअलमीपासून ते वनप्लसपर्यंत; मे महिन्यात २० हजारांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च झालेले स्मार्टफोन!

Business Ideas : ‘असतील शिते तर जमतील भुते...’ पैशाची किमया अन् मित्रांचे कोंडाळे!

केंद्र सरकारच्या नव्या निर्णयानुसार पोस्ट ऑफिसमधील पाच वर्षांच्या आरडीवर आता ६.५ टक्क्यांऐवजी ६.७ टक्के व्याज मिळेल. ज्येष्ठ नागरिक बचत योजना, किसान विकास पत्र (KVP) आणि सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF), सुकन्या समृद्धी योजना या लोकप्रिय योजनांवरील व्याजदरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळं ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवर आधीप्रमाणेच ८.२ टक्के, मासिक उत्पन्न खाते योजनेवर ७.४ टक्के, एनएससीवर ७.७ टक्के, पीपीएफवर ७.१ टक्के, किसान विकास पत्रवर ७.५ टक्के आणि सुकन्या समृद्धी योजनेवर ८ टक्के व्याज मिळेल.

सप्टेंबर तिमाहीत किती वाढ?

याआधीच्या जुलै ते सप्टेंबरच्या तिमाहीत लहान बचत योजनांवरील व्याजदर ०.३० टक्क्यांनी वाढवण्यात आला होता. १ ते २ वर्षे मुदतीच्या ठेवी आणि ५ वर्षांच्या आरडीपुरता ही वाढ मर्यादित होती.

एप्रिल ते जूनच्या तिमाहीत झाली होती सर्वाधिक वाढ

एप्रिल ते जूनच्या तिमाहीत व्याजदार ७० बेसिस पॉइंट्सपर्यंत वाढ करण्यात आली होती. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) वरील व्याजदर ७ टक्क्यांवरून थेट ७.७ टक्क्यांवर नेण्यात आला होता. तर, सुकन्या समृद्धीवरील व्याज ७.६ टक्क्यांवरून ८ टक्के करण्यात आलं होतं.

सरकारी गुंतवणुकीवर मिळणाऱ्या उत्पन्नाच्या प्रमाणात केंद्र सरकार अल्पबचत योजनांवरील व्याजदर निश्चित करत असते. हे उत्पन्न अधिक असल्यास व्याजदरात वाढ केली जाते, तसंच उत्पन्न कमी असल्यास व्याजदर कमी केले जातात किंवा 'जैसे थे' ठेवले जातात, असं सर्वसाधारण सूत्र आहे.

पुढील बातम्या