LIC Investment : एलआयसीच्या 'या' जबरदस्त योजनेत गुंतवणुकीसाठी उरला फक्त एक दिवस
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  LIC Investment : एलआयसीच्या 'या' जबरदस्त योजनेत गुंतवणुकीसाठी उरला फक्त एक दिवस

LIC Investment : एलआयसीच्या 'या' जबरदस्त योजनेत गुंतवणुकीसाठी उरला फक्त एक दिवस

Updated Sep 29, 2023 06:31 PM IST

Investment in LIC Dhan Vriddhi scheme : एलआयसीनं तीन महिन्यांपूर्वी आणलेल्या जबरदस्त योजनेत गुंतवणूक करण्यासाठी केवळ एक दिवस उरला आहेत.

Life Insurance Corporation of India
Life Insurance Corporation of India

LIC Dhan Vriddhi scheme : बाजारात गुंतवणुकीचे अनेक पर्याय असले तरी एलआयसीवर भारतीय नागरिकांचा विश्वास अद्यापही कायम आहे. एलआयसीमध्ये लोक डोळे झाकून गुंतवणूक करतात. ही गुंतवणूक वाया जाणार नाही असा त्यांचा विश्वास असतो. एलआयसी देखील अशा गुंतवणूकदारांसाठी वेळोवेळी वेगवेगळ्या योजना सादर करत असते. अशीच एक योजना एलआयसीनं अलीकडंच आणली आहे.

एलआयसी धनवृद्धी योजना (LIC Dhan Vriddhi) असं या योजनेचं नाव आहे. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी आता शेवटची संधी आहे. ही योजना ३० सप्टेंबरला संपणार आहे.

एलआयसीनं आपल्या अधिकृत X हँडलद्वारे (अर्थात ट्विटर) ही माहिती दिली आहे. ही सुरक्षा आणि बचत असा दुहेरी लाभ देणारी ही नॉन-लिंक आणि एकल प्रीमियम योजना आहे.

कशी आहे LIC धन वृद्धी योजना?

पॉलिसीच्या वैध कालावधीत विमाधारक व्यक्तीचा अकाली मृत्यू झाल्यास या योजनेतून कुटुंबाला आर्थिक सहाय्य दिलं जातं. याशिवाय, पॉलिसी मॅच्युअर झाल्यानंतर हयात असलेल्या विमाधारकाला एकरकमी रक्कम दिली जाते. ही योजना २३ जून २०२३ रोजी सुरू करण्यात आली होती.

विम्याची रक्कम दहापट मिळण्याची शक्यता

या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकाला दोन पर्याय मिळतात. त्यातील कोणत्याही एका पर्यायाची निवड करता येते. पहिला पर्याय हा १.२५ पट विम्याची रक्कम मिळण्याचा असेल. तर, दुसऱ्या पर्यायात तुम्हाला विम्याची रक्कम गुंतवणुकीच्या दहा पट मिळू शकते. मृत्यूनंतर ग्राहकाला ही विमा रक्कम मिळू शकते. LIC धन वृद्धी योजनेअंतर्गत १०, १५ किंवा १८ वर्षांच्या कालावधीसाठी गुंतवणूक करता येते.

टॅक्सचीही बचत

एलआयसीतील प्रत्येक गुंतवणुकीवर करसवलत मिळते. LIC धन वृद्धी योजना देखील यास अपवाद नाही. या योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना इन्कम टॅक्स कायद्याच्या कलम ८० सी अंतर्गत १.५ लाख रुपयांची सूट मिळते. या योजनेत गुंतवणूक करायची असल्यास योग्य एजंट किंवा थेट एलआयसीच्या जवळच्या कार्यालयात जाऊन गुंतवणूक करता येऊ शकते.

Whats_app_banner