मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Sensex Nifty: शेअर बाजारानं पकडला 'बुलेट'चा वेग! सेन्सेक्स, निफ्टीचा नवा उच्चांक

Sensex Nifty: शेअर बाजारानं पकडला 'बुलेट'चा वेग! सेन्सेक्स, निफ्टीचा नवा उच्चांक

Nov 28, 2022, 05:32 PM IST

    • आज सोमवारी, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स निफ्टीची सुरुवात निराशाजनक झाली. पण दिवसाच्या मध्यावधीत एकापेक्षा एक नवे उच्चांक प्रस्थापित केले.
sensex closed in green HT

आज सोमवारी, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स निफ्टीची सुरुवात निराशाजनक झाली. पण दिवसाच्या मध्यावधीत एकापेक्षा एक नवे उच्चांक प्रस्थापित केले.

    • आज सोमवारी, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स निफ्टीची सुरुवात निराशाजनक झाली. पण दिवसाच्या मध्यावधीत एकापेक्षा एक नवे उच्चांक प्रस्थापित केले.

Sensex-Nifty : आज सोमवारी, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स निफ्टीची सुरुवात थोडीशी निराशाजनक झाली होती. दुपारी दीड वाजता, इंट्राडे दरम्यान सेन्सेक्समध्ये ३५७ अंश वाढीसह ६२,६५१ च्या पातळीवर होता. निफ्टी ८५ अंश वाढीसह १८५९८ अंशपातळीवर होता. आज निफ्टीने १८६११ च्या उच्चांकी पातळीला स्पर्श केला. तर सेन्सेक्सनेही निर्देशांकात नवा विक्रम प्रस्थापित केला.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

दिवसअखेर सेन्सेक्सने २११.१६ अंश वाढीसह ६२६०४.८० च्या अंश पातळीला स्पर्श केला. तर निफ्टीतही 50 अंश वाढीसह अंदाजे १८५६२.७५ अंश पातळीवर स्थिरावला.

स्टाॅक मार्केट १२ : ४४ वा. सेन्सेक्सने आता नव्या उच्चांकी पातळीला स्पर्श केला आहे. आज सेन्सेक्स ६२,६९० च्या पातळीला स्पर्श केला. गेल्या आठवड्यांपेक्षा हा नवा उच्चांक सेन्सेक्स निफ्टीने गाठला आहे. दुपारी दीडच्या सुमारास सेन्सेक्स ३५७ अंश वाढीसह ६२,६५१ च्या पातळीवर होता. तर निफ्टी ८५ अंश वाढीसह १८,५९८ च्या पातळीवर होता. आज निफ्टीनेही १८६११ च्या उच्चांकी पातळीला स्पर्श केला आहे.

११ वाजता : शेअर बाजाराची सुरुवात आज थोडीशी नरमाईत झाली. मात्र दिवसअखेर त्यात वाढ झाली. सेन्सेक्सने आज नवा उच्चांक प्रस्थापित केला. सकाळी ११ वाजता सेन्सेक्स १८६ अंशवाढीसह ६२,४८० अंश पातळीवर होता. तर निफ्टी ४५ अंश वाढीसह १८,५५ह७ अंशांवर होता.

सकाळी ९.१५ मिनिटे : सकाळी ९ वाजता आठवड्याच्या पहिल्याच सत्रामध्ये निर्देशांकाची वाढ ही नकारात्मक झाली. सेन्सेक्स २७७ अंश घसरणीसह ६२,०१६ च्या अंश पातळीवर खुला झाला. तर नॅशनल स्टाॅक एक्सचेंजच्या निफ्टीमध्ये ८२ अंश घसरणीसह १८, ४३० अंशांवर खुला झाला.

गेल्या आठवड्यात सेन्सेक्समध्ये ६३० अंश म्हणजे एक टक्का वाढ झाली. शुक्रवारी आठवड्याच्या शेवटच्या सत्रात ६२,२९३.६४ अंशांवर बंद झाला. या आठवड्यातील हा सर्वकालीन उच्चांक आहे. नॅशनल स्टाॅक एक्सचेंजच्या निफ्टीही १८,५१२,७५ अंशाच्या नव्या उच्चांकी पातळीवर बंद झाला.

चालू आठवड्यात असा राहिल शेअऱ बाजार

स्वस्तिका इन्व्हेस्टर्सचे प्रमुख संतोष मीणा यांच्या मते चालू आठवड्यातील जीडीपीचे दुसऱ्या तिमाहीतील आकडे जाहीर होणार आहेत. याशिवाय वाहन विक्रीचे आकडेही येतील. जागतिक पातळीवरील अमेरिकेतील महागाई, डाॅलर इंडेक्स, बाॅन्ड बाजारातील आकडेवारीवर बाजाराची नजर असणार आहे. याशिवाय चीनमधून येणाऱ्या बातम्यांवरही शेअर बाजाराची नजर असणार आहे.

 

विभाग

पुढील बातम्या