मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Senex Nifty Today : बजेटचे काऊन्टडाऊन सुरु, सेन्सेक्स निफ्टीने केले बाऊन्सबॅक, अदानी शेअर टाॅप गेनर

Senex Nifty Today : बजेटचे काऊन्टडाऊन सुरु, सेन्सेक्स निफ्टीने केले बाऊन्सबॅक, अदानी शेअर टाॅप गेनर

Jan 30, 2023, 05:29 PM IST

    • Senex Nifty Today : सोमवारी आठवड्याच्या सुरुवातीलाच सेन्सेक्समध्ये ५२७ अंशांची जबरदस्त घसरण झाली आहे. तर निफ्टीतही १२५ अंशांच्या गटांगळीसह १७,४६१ अंशांवर सुरुवात झाली. पण आगामी बजेटच्या पार्श्वभूमीवर दिवसअखेर सेन्सेक्समध्ये वाढ झाली. 
sensex nifty HT

Senex Nifty Today : सोमवारी आठवड्याच्या सुरुवातीलाच सेन्सेक्समध्ये ५२७ अंशांची जबरदस्त घसरण झाली आहे. तर निफ्टीतही १२५ अंशांच्या गटांगळीसह १७,४६१ अंशांवर सुरुवात झाली. पण आगामी बजेटच्या पार्श्वभूमीवर दिवसअखेर सेन्सेक्समध्ये वाढ झाली.

    • Senex Nifty Today : सोमवारी आठवड्याच्या सुरुवातीलाच सेन्सेक्समध्ये ५२७ अंशांची जबरदस्त घसरण झाली आहे. तर निफ्टीतही १२५ अंशांच्या गटांगळीसह १७,४६१ अंशांवर सुरुवात झाली. पण आगामी बजेटच्या पार्श्वभूमीवर दिवसअखेर सेन्सेक्समध्ये वाढ झाली. 

Senex Nifty Today : सोमवारी आठवड्याच्या सुरुवातीलाच सेन्सेक्समध्ये ५२७ अंशांची जबरदस्त घसरण झाली आहे. तर निफ्टीतही १२५ अंशांच्या गटांगळीसह १७,४६१ अंशांवर ट्रेड करत आहे. यात अंदाजे ८८५ शेअर्समध्ये वाढ तर तब्बल १३०६ शेअर्समध्ये घसरण झाली आहे. अॅक्सिस बँकस आयसीआयसीआय बँक, लार्सन अँड ट्यूब्रो, हिंदुस्तान युनिलिव्हर, रिलायन्स इंडस्ट्रीज या कंपन्यांच्या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण झाली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

आजच्या सकाळच्या ट्रेडिंग सेशनमध्ये लक्ष हे प्रामुख्याने अदानींच्या शेअर्सवर राहणार आहे. अदानी समुहाचा एफपीओ आज ३० जानेवारीपर्यंत खुला राहणार आहे. सध्या या शेअर्समध्ये तब्बल ७ टक्क्यांची वाढ दिसत आहे. सध्या तरी अदानी एन्टरप्राईजेस, अदानी पोर्ट हे शेअर्स गेनर्सच्या यादीत आहेत. त्याशिवाय बजाज फायनान्स, एनटीपीसी आणि बजाज फिनसर्व्ह या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे.

परकीय गुंतवणूकदारांनी जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात शेअर्स विक्रीचा सपाटा लावला आहे. जानेवारी महिन्यात परकीय गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारपेठेतून अंदाजे १७ हजार कोटी रुपये काढून घेतले आहेत. या एफपीआयने भारतीय बाजारपेठेच्या तुलनेत चीन, हाँगकाॅग या शेअर बाजारात शेअऱ खरेदीचा ओघ कायम ठेवला आहे.

दरम्यान, अदानी आणि हिडनबर्ग यांच्यातील वादामुळे गेल्या आठवड्याच्या शेवटच्या सत्रात शुक्रवारी निर्देशांकात तब्बल ८५० पेक्षा अधिक अंशांची पडझड झाली होती.

सेन्सेक्स निफ्टी क्लोजिग 

सकाळी झालेली पडझड निर्देशांकाने दिवसाच्या सरतेशेवटी पुन्हा भरुन काढली.  आज सकाळी बाजार सुरु झाल्यानंतर अवघ्या दोन तासांच्या कालावधीतच निर्देशांकाने बाऊन्स बॅक केले. दिवसभर सावध पवित्रा घेत हळूहळू वाढीचा वेग कायम ठेवला. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स १६९.५१ अंकांच्या वाढीसह ५९,५००.४१ च्या पातळीवर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी ४४.६० अंकांच्या घसरणीसह १७,६४८.९५ च्या पातळीवर बंद झाला.

आजच्या व्यवहारात अदानी एंटरप्रायझेस, बजाज फायनान्स, अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फिनसर्व्ह आणि एचसीएल टेक्नॉलॉजीज हे निफ्टीमध्ये टाॅप गेनर्सच्या यादीत होते. तर पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन, जेएसडब्ल्यू स्टील, बजाज ऑटो, लार्सन अँड टुब्रो आणि इंडसइंड बँक टाॅप लूजर्स ठरले. बजेटच्या दोन दिवस आधी सेन्सेक्स निफ्टीने घेतलेला हा पवित्रा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. 

विभाग

पुढील बातम्या