मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Adani Enterprises FPO : अदानी एन्टप्रायझेसचा एफपीओ आज बाजारात; गुंतवणूक करावी का? तज्ज्ञ म्हणतात…

Adani Enterprises FPO : अदानी एन्टप्रायझेसचा एफपीओ आज बाजारात; गुंतवणूक करावी का? तज्ज्ञ म्हणतात…

Jan 27, 2023, 11:43 AM IST

  • Adani Enterprises FPO today : अदानी समूहातील कंपन्यांच्या बाजारमूल्यावरून उलटसुलट चर्चा सुरू असतानाच आज अदानी एन्टरप्राइझेसचा एफपीओ बाजारात येत आहे.

Gautam Adani

Adani Enterprises FPO today : अदानी समूहातील कंपन्यांच्या बाजारमूल्यावरून उलटसुलट चर्चा सुरू असतानाच आज अदानी एन्टरप्राइझेसचा एफपीओ बाजारात येत आहे.

  • Adani Enterprises FPO today : अदानी समूहातील कंपन्यांच्या बाजारमूल्यावरून उलटसुलट चर्चा सुरू असतानाच आज अदानी एन्टरप्राइझेसचा एफपीओ बाजारात येत आहे.

Adani Enterprises FPO today : अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअरच्या खऱ्या मूल्यावरू उलटसुलट चर्चा सुरू असतानाच आज अदानी एन्टरप्रायझेसचा एफपीओ (फॉलो-ऑन पब्लिक ऑफर) बाजारात येत आहे. ३१ जानेवारी २०२३ पर्यंत गुंतवणूकदार या एफपीओसाठी बोली लावू शकणार आहेत. 

ट्रेंडिंग न्यूज

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

Smartphone Under 20000: रिअलमीपासून ते वनप्लसपर्यंत; मे महिन्यात २० हजारांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च झालेले स्मार्टफोन!

अदानी ग्रुप कंपनीने फॉलो-ऑन ऑफरमधून २० हजार कोटी रुपये उभारण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. FPO मधून उभारण्यात येणारी रक्कम अदानी एन्टरप्रायझेस लिमिटेड आणि तिच्या उपकंपन्यांवरील कर्ज फेडण्यासाठी व अन्य भांडवली खर्चासाठी वापरली जाणार आहे, असं कंपनीनं आधीच स्पष्ट केलं आहे. अदानी एन्टरप्रायझेसच्या एफपीओचा प्राइस बँड ३,११२ रुपये ते ३,२७६ रुपये प्रति शेअर असा निश्चित करण्यात आला आहे. अदानी एन्टरप्रायझेसच्या शेअरची किंमत सध्या ३,४०५ रुपये आहे. म्हणजेच एफपीओ सुमारे ५ टक्के सवलतीच्या दरात उपलब्ध आहे.

ग्रे मार्केट काय म्हणते?

अदानी एन्टरप्रायझेसच्या एफपीओच्या बाबतीत ग्रे मार्केटची प्रतिक्रिया फारच थंड आहे. बाजार विश्लेषकांच्या मते, अदानी एन्टरप्रायझेस FPO चा ग्रे मार्केट प्रीमियम (GMP) आज 45 रुपये आहे. बुधवारी हाच भाव १०० प्रति शेअर होता. तो तब्बल ५५ रुपयांनी खाली आला आहे.

गुंतवणूक करावी का?

व्हेंचुरा सिक्युरिटीजनं, अदानीच्या एफपीओला सबस्क्राइब टॅग दिला आहे. आर्थिक वर्ष २०२५ पर्यंत अदानी एन्टरप्राइझेसचा EBITDA आणि निव्वळ नफा अनुक्रमे २२.९ टक्के ८.३ टक्क्यांपर्यंत वाढणे अपेक्षित आहे. अदानी एन्टरप्रायझेसचा शेअर ५,९९९९ रुपयांपर्यंत वाढेल असा अंदाज व्हेंचुरा सिक्युरिटीजनं वर्तवला आहे. पुढील २४ महिन्यांत ६४.८ टक्के संभाव्य वाढ अपेक्षित असून ३,६४९ या किंमतीपर्यंत शेअर घेता येईल, असं व्हेचुरानं म्हटलं आहे.

 

(टीप: संबंधित वृत्त हे कंपनीच्या शेअर बाजारातील माहितीवर आधारीत आहे. हा कुठल्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. त्यामुळं गुंतवणुकीचा निर्णय आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करूनच घ्यावा.)

पुढील बातम्या