मराठी बातम्या  /  बिझनेस  /  multibagger stock : अवघ्या ७५ दिवसांत पैसे दुप्पट! सोनं विकणाऱ्या कंपनीनं गुंतवणूकदारांचं नशीब चमकवलं

multibagger stock : अवघ्या ७५ दिवसांत पैसे दुप्पट! सोनं विकणाऱ्या कंपनीनं गुंतवणूकदारांचं नशीब चमकवलं

Sep 27, 2023, 04:31 PM IST

  • Senco Gold Share price : अवघ्या अडीच महिन्यांपूर्वी शेअर बाजारात दाखल झालेल्या सेन्को गोल्ड कंपनीनं गुंतवणूकदारांना सुखद धक्का दिला आहे.

Senco Gold

Senco Gold Share price : अवघ्या अडीच महिन्यांपूर्वी शेअर बाजारात दाखल झालेल्या सेन्को गोल्ड कंपनीनं गुंतवणूकदारांना सुखद धक्का दिला आहे.

  • Senco Gold Share price : अवघ्या अडीच महिन्यांपूर्वी शेअर बाजारात दाखल झालेल्या सेन्को गोल्ड कंपनीनं गुंतवणूकदारांना सुखद धक्का दिला आहे.

Senco Gold Share price : अवघ्या अडीच महिन्यांपूर्वी शेअर बाजारात सूचीबद्ध झालेल्या सेन्को गोल्ड या कंपनीच्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीब चमकवलं आहे. कंपनीच्या शेअरनं झपाझप वाटचाल करत अवघ्या ७५ दिवसांत गुंतवणूकदारांना दामदुप्पट नफा मिळवून दिला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

सेन्को गोल्ड या कंपनीचा आयपीओ जुलै महिन्यात आला होता. सूचीबद्ध झाल्यापासून एखाद्या दिवसाचा अपवाद वगळता कंपनीचा शेअर सातत्यानं वधारत गेला आहे. आज या शेअरमध्ये तब्बल १४.४० टक्क्यांची, अर्थात ७६.७० रुपयांची वाढ नोंदवली. एनएसईवर या शेअरनं ६०० रुपयांचा टप्पा पार केला.

सेन्को गोल्डचा शेअर एनएसईवर आज ५३३.४० रुपयांवर खुला झाला. त्यानंतर वाढत-वाढत एका क्षणी हा शेअर ६२६ रुपयांवर पोहोचला. कंपनीचा हा ५२ आठवड्यांचा उच्चांक होता. बाजार बंद झाला तेव्हा हा शेअर ६०९.३० रुपयांवर स्थिरावला. काल, मंगळवारी सेन्को गोल्डचा शेअर ५३२.३५ रुपयांवर बंद झाला होता.

IPO ची किंमत काय होती?

सेन्को गोल्डचा आयपीओ ४ जुलै ते ६ जुलै दरम्यान खुला झाला होता. कंपनीच्या आयपीओची किंमत ३०१ ते ३१७ रुपये होती. कंपनीच्या आयपीओची लॉट साइज ४७ शेअर्स अशी होती. त्यामुळं गुंतवणूकदारांना किमान १४,८९९ रुपये गुंतवणं गरजेचं होतं. बीएसई व एनएसई दोन्ही शेअर बाजारात हा आयपीओ सूचीबद्ध झाला. आयपीओद्वारे संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या माध्यमातून कंपनीनं १२१.५० कोटी रुपये उभे केले होते.

सेन्को गोल्ड बीएसईवर ४३१ आणि एनएसईवर ४३० रुपये प्रति शेअर दरानं सूचीबद्ध झाला होता. लिस्टिंगच्या दिवशीच या शेअरनं गुंतवणूकदारांना १०० रुपयांपेक्षा जास्त नफा मिळवून दिला होता.

विभाग

पुढील बातम्या