मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Amazon Distribution Service : ॲमेझाॅनचा भारतातील फूड डिलिव्हरी व्यवसाय बंद, कर्मचारी कपात होणार

Amazon Distribution Service : ॲमेझाॅनचा भारतातील फूड डिलिव्हरी व्यवसाय बंद, कर्मचारी कपात होणार

Nov 28, 2022, 02:47 PM IST

    • जागतिक मंदीच्या संकेतांनंतर दिग्गज टेक आणि ई काँमर्स कंपनी अॅमेझाँनने भारतातील वितरण सेवा २९ डिसेंबरपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे लाखो लोकांचे रोजगार धोक्यात येणार आहेत.
Amazon HT

जागतिक मंदीच्या संकेतांनंतर दिग्गज टेक आणि ई काँमर्स कंपनी अॅमेझाँनने भारतातील वितरण सेवा २९ डिसेंबरपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे लाखो लोकांचे रोजगार धोक्यात येणार आहेत.

    • जागतिक मंदीच्या संकेतांनंतर दिग्गज टेक आणि ई काँमर्स कंपनी अॅमेझाँनने भारतातील वितरण सेवा २९ डिसेंबरपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे लाखो लोकांचे रोजगार धोक्यात येणार आहेत.

Amazon Distribution Service : जागतिक मंदीच्या संकेतांनंतर दिग्गज टेक आणि ई काँमर्स कंपनी अॅमेझाँनने भारतातील वितरण सेवा २९ डिसेंबरपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे लाखो लोकांचे रोजगार धोक्यात येणार आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

SEBI on KYC : म्युच्युअल फंडातील गुंतवणूकदारांसाठी खूशखबर, सेबीनं शिथील केले 'हे' नियम

EPFO news : भविष्य निर्वाह निधी खात्यातून पैसे काढणे आता आणखी सोपे! फक्त ३ दिवसांत तुमच्या हातात येणार

DHFL Scam : ३४ हजार कोटींचा बँक घोटाळा; CBI कडून DHFL चे माजी संचालक धीरज वाधवानला अटक

highest fd rates : 'या' चार बँका देतायत एफडीवर सर्वाधिक व्याज; तुमची एफडी कुठं आहे?

जागतिक मंदीच्या संकेतांनंतर दिग्गज टेक आणि ई काँमर्स कंपनी अॅमेझाँनने भारतातील वितरण सेवा २९ डिसेंबरपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे लाखो लोकांचे रोजगार धोक्यात येणार आहेत. याआधी कंपनीने भारतातील फूड डिलिव्हरी, एज्यूकेशन सर्व्हिस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

अॅडटेक व्यवसायही बंद

या संदर्भात या ई-कॉमर्स कंपनीने आपल्या रेस्टॉरंट भागीदारांना पत्र पाठवले आहे. या कंपनीने भारतातील आपला एडटेक व्यवसायही पुढील वर्षीपासून बंद करण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे.

"आमच्या काही व्यवसायांचे आम्ही मूल्यांकन केले आणि त्यानुसार येत्या 29 डिसेंबरपासून अॅमेझॉन फूड ही सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा अर्थ असा आहे की या तारखेनंतर तुम्हाला अॅमेझॉन फूडद्वारे ग्राहकांच्या ऑर्डर मिळणार नाहीत. 29 तारखेपूर्वीपर्यंत मात्र तुम्हाला ऑर्डर मिळत राहतील आणि या ऑर्डर्सची पूर्तता तुम्ही व्यवस्थित कराल, अशी आम्ही तुमच्याकडून अपेक्षा करतो,” अशा आशयाचे पत्र अॅमेझॉनने आपल्या रेस्टॉरंट भागीदारांना पाठविले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अॅमेझॉन फूडने मॅकडोनाल्ड आणि डोमिनोज पिझ्झा यांसारख्या क्विक-सर्व्हिस रेस्टॉरंट ब्रँड्ससह सुमारे 3,000 रेस्टॉरंट भागीदारांना सामावून घेतले होते. या फूड व्यवसायात काम करणाऱ्या 25 जणांना कंपनीने आता आपल्या इतर विभागांत घेतले आहे.

कोरोना काळात महत्त्वाची भूमिका

अॅमेझॉनने मे २०२० मध्ये भारतात ऑनलाइन फूड डिलिव्हरी व्यवसाय सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यावेळी देशात कोविडची साथ व टाळेबंदी होती. सुरुवातीला फूड डिलीव्हरीची सेवा बंगळुरूमधील निवडक भागात सुरू करण्यात आली होती. नंतर या सेवेचा विस्तार करण्यात आला होता. मार्च २०२१ मध्ये, सेवा ६२ पिन-कोडमध्ये उपलब्ध होती. ज्यात बंगळुरूमधील काही प्रमुख परिसर समाविष्ट होते. कंपनीने इतर शहरांपर्यंत त्याची मांडणी आणि स्केलिंग करणे शिकले होते.

स्विगी, झोमॅटोशी स्पर्धा

अॅमेझॉनने अन्न वितरणात प्रवेश केल्याने स्विगी आणि झोमॅटो यांच्यासह प्रस्थापित स्थानिक कंपन्यांना स्पर्धा निर्माण झाली होती. कठोर सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करणाऱ्या बंगळुरूमधील सुमारे ३ हजार रेस्टॉरंट्स आणि क्लाउड किचनमधून भारतीय, चायनीज, इटालियन, बिर्याणी, बर्गर आणि मिष्टान्न यांसारखे पदार्थ ग्राहक निवडू शकत होते. बर्गर किंग, बेहरूझ बिर्याणी, फासोस, चाय पॉइंट, फ्रेशमेनू आणि अडिगा यांसारख्या अनेक रेस्टॉरंट्स आणि क्लाउड किचनसह या कंपनीने भागीदारी केली होती. सुरुवातीला कॅलिफोर्निया बुरिटो आणि केव्हेंटर्स यांसारख्या रेस्टॉरंट चेन्सशी आणि रॅडिसन व मॅरियट यांसारख्या पंचतारांकित हॉटेल साखळ्यांसोबतही तिची भागीदारी होती.

अँमेझाॅन अॅकेडमी

अॅमेझॉन येत्या ऑगस्ट २०२३ पासून भारतातील एडटेक व्यवसायही बंद करणार आहे. सध्याच्या शैक्षणिक बॅचमध्ये नोंदणी केलेल्यांना संपूर्ण शुल्क परत करण्याचे आश्वासन कंपनीने दिले आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये संयुक्त प्रवेश परीक्षेची (जेईई) तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची गरज भागविण्यासाठी कंपनीने जानेवारी 2021मध्ये अॅमेझॉन अॅकेडमी सुरू केली होती.

१० हजार कर्मचाऱ्यांची कपात

जगभरातील विस्तारीत झालेला आपला व्यवसाय मर्यादित करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. यानुसार कंपनी अंदाजे १० हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्याची शक्यता आहे. याशिवाय नव्या नोकरभरती संदर्भातही आता नियम कडक केले आहेत.

 

विभाग

पुढील बातम्या