मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Amazon summons : जबरदस्तीची नोकरकपात भोवली, अॅमेझाॅनला कामगार मंत्रालयाकडून मिळाली नोटीस

Amazon summons : जबरदस्तीची नोकरकपात भोवली, अॅमेझाॅनला कामगार मंत्रालयाकडून मिळाली नोटीस

Nov 23, 2022, 08:29 PM IST

    • कर्मचारी कपातीसंदर्भात आॅनलाईन कंपनी अॅमेझाॅनला कामगार मंत्रालयाकडून नोटीस मिळाली आहे. कंपनी टाळेबंदीबाबत जबरदस्ती करत असल्याचे यात म्हटले आहे. 
amazon HT

कर्मचारी कपातीसंदर्भात आॅनलाईन कंपनी अॅमेझाॅनला कामगार मंत्रालयाकडून नोटीस मिळाली आहे. कंपनी टाळेबंदीबाबत जबरदस्ती करत असल्याचे यात म्हटले आहे.

    • कर्मचारी कपातीसंदर्भात आॅनलाईन कंपनी अॅमेझाॅनला कामगार मंत्रालयाकडून नोटीस मिळाली आहे. कंपनी टाळेबंदीबाबत जबरदस्ती करत असल्याचे यात म्हटले आहे. 

Amazon summons : जगभरातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात केली जात आहे, गेल्या आठवड्यात ई काॅमर्स क्षेत्रातील कंपनी अॅमेझाॅननेही १० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्याची घोषणा केली. कंपनीने गेल्याच आठवड्यात कर्मचाऱ्यांना टर्मिनेशन लेटर पाठवण्यास सुरुवात केली. पण कंपनी आम्हाला जबरदस्तीने कामावरुन काढून टाकत आहे, अशी तक्रार कंपनीतील कर्मचाऱ्यांनी केल्यानंतर, ही टाळेबंदी कंपनीला चांगलीच भोवली आहे.यावर केंद्रीय कामगार मंत्रालयाने अ्ॅमेझाॅनला थेट नोटीस बजावी आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Smartphone Under 20000: रिअलमीपासून ते वनप्लसपर्यंत; मे महिन्यात २० हजारांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च झालेले स्मार्टफोन!

Business Ideas : ‘असतील शिते तर जमतील भुते...’ पैशाची किमया अन् मित्रांचे कोंडाळे!

Penny stock turns multibagger : दीड रुपयाचा शेअर ५५ रुपयांवर पोहोचला! गुंतवणूकदारांनी किती कमावले माहित्येय?

Multibagger Stock : शेअर असावा तर असा! दोन वर्षांत तब्बल १६० टक्क्यांनी वाढला, तुमच्याकडं आहे का?

उपलब्ध माहितीनुसार, केंद्रीय कामगार मंत्रालयाने अॅमेझॉन इंडियाला बुधवारी बेंगळुरू येथील उपमुख्य कामगार आयुक्तांसमोर हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे. या प्रकरणातील सर्व दस्तावेज घेऊन अधिकृत प्रतिनिधींद्वारे निश्चित केलेल्या तारखेला आणि वेळेवर उपस्थित राहण्यास सांगितले आहे.

ही बातमी देखील वाचा : amazon 

डेव्हलपमेंट एम्प्लॉईज युनियन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एम्प्लॉईज सिनेट (एनआयटीईएस) ने केलेल्या तक्रारीनंतर केंद्रीय कामगार मंत्रालयाने हे पाऊल उचलले आहे. कामगार मंत्रालयाने अॅमेझॉनवर कामगार कायद्यांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांना लिहिलेल्या पत्रात एनआयटीईएसने दावा केलाय की अॅमेझाॅनने कर्मचाऱ्यांना कंपनीतून जबरदस्तीने काढून टाकण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांना टर्मिनेशनची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. एवढ्या कमी कालावधीमध्ये दुसरी नोकरी शोधणे कठीण असल्याने कर्मचाऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न एैरणीवर आला आहे.

विभाग

पुढील बातम्या