मराठी बातम्या  /  बिझनेस  /  PPF मधील गुंतवणुकीसाठी दर महिन्याची ५ तारीख महत्त्वाची का असते? वाचा!

PPF मधील गुंतवणुकीसाठी दर महिन्याची ५ तारीख महत्त्वाची का असते? वाचा!

Oct 05, 2023, 02:46 PM IST

  • PPF investment key points : पीपीएफ योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांनी तारखेचा मुद्दा लक्षात घेतल्यास त्यांना मोठा फायदा होऊ शकतो.

PPF Scheme

PPF investment key points : पीपीएफ योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांनी तारखेचा मुद्दा लक्षात घेतल्यास त्यांना मोठा फायदा होऊ शकतो.

  • PPF investment key points : पीपीएफ योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांनी तारखेचा मुद्दा लक्षात घेतल्यास त्यांना मोठा फायदा होऊ शकतो.

PPF investment key points : अल्पबचत योजनांवरील सुधारीत व्याजदर केंद्र सरकारकडून नुकतेच जाहीर करण्यात आले. ऑक्टोबर ते डिसेंबरच्या तिमाहीसाठी हे व्याजदर आहेत. पीपीएफच्या व्याजदरात कोणतेही बदल झालेले नाहीत. असं असलं तरी पीपीएफ योजना सर्वसामान्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. मात्र, या योजनेत गुंतवणूक करताना काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

Smartphone Under 20000: रिअलमीपासून ते वनप्लसपर्यंत; मे महिन्यात २० हजारांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च झालेले स्मार्टफोन!

पीपीएफमधील गुंतवणुकीवर केंद्र सरकारकडून सध्या ७.१ टक्के व्याज दिलं जातं. केंद्र सरकारकडून दरवर्षी मार्च अखेरीस पीपीएफ खात्यात व्याज जमा करतं. मात्र, या व्याजाच्या रकमेची आकडेमोड दर महिन्याला केली जाते. पीपीएफ योजनेतील गुंतवणूकदारांसाठी दर महिन्याची ५ तारीख खास असते. या तारखेपर्यंत खात्यात पैसे जमा केल्यास चालू महिन्याचं व्याज देताना त्या रकमेचा विचार केला जातो. या तारखेनंतर पैसे जमा केल्यास त्या रकमेवर संबंधित महिन्याचं व्याज दिलं जात नाही. पुढच्या महिन्यात त्या रकमेवर व्याज मिळतं. संपूर्ण वर्षाचा हिशेब केल्यास खातेदारांचं मोठं नुकसान होतं. त्यामुळंच महिन्याच्या पाच तारखेच्या आधी पैसे भरल्यास जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो.

आकडेवारीतच बोलायचं झाल्यास…

एखाद्या व्यक्तीला त्याच्या PPF खात्यात १.५ लाख रुपये भरायचे आहेत. हे पैसे त्यानं २० एप्रिल रोजी भरल्यास त्याला त्या दीड लाखांवर संपूर्ण १२ महिन्यांचं व्याज मिळणार नाही. कारण, ही रक्कम संबंधित खातेदारानं ५ तारखेच्या नंतर भरलेली आहे. सध्या पीपीएफवर ७.१ टक्के व्याज आहे. या दरानं ११ महिन्याच्या व्याजाचा हिशेब केल्यास संबंधित व्यक्तीला आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये ९७६२.५० रुपये व्याज मिळेल. मात्र, हेच दीड लाख त्यानं ५ एप्रिलच्या आधी गुंतवले असते तर त्याला संपूर्ण १२ महिन्यांसाठी १०,६५० रुपये व्याज मिळालं असतं. याचा अर्थ त्याचं ८८७.५० रुपयांचं नुकसान झालं.

पीपीएफमध्ये एकरकमी गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांनी जास्तीत जास्त व्याज मिळविण्यासाठी ५ एप्रिलआधीच पैसे भरायला हवेत. एवढंच नव्हे, महिन्याला पैसे भरताना देखील ही तारीख ध्यानात ठेवावी.

पीपीएफ आणि कर लाभ

PPF योजनेतील गुंतवणुकीवर कलम ८० सी अंतर्गत करात सूट मिळते. ही सूट दीड लाखांपर्यंतच्या रकमेवर मिळते. पीपीएफ खाते अवघ्या ५०० रुपयांत उघडता येतं. त्यात एका वर्षात जास्तीत जास्त दीड लाख रुपये गुंतवता येतात.

पुढील बातम्या