मराठी बातम्या  /  बिझनेस  /  SCSS : पोस्ट खात्यात आजी-आजोबांना मिळणार अधिक व्याज, १० लाखांच्या गुंतवणूकीवर इतके मिळणार व्याज

SCSS : पोस्ट खात्यात आजी-आजोबांना मिळणार अधिक व्याज, १० लाखांच्या गुंतवणूकीवर इतके मिळणार व्याज

Jan 05, 2023, 06:41 PM IST

    • SCSS :  सरकारने अलीकडेच त्यांच्या अनेक लहान बचत योजनांचे व्याजदर वाढवले ​​आहेत. आता सिनियर सिटीझन सेव्हिंग स्किम्सवर ७.६० टक्क्यांऐवजी ८ टक्के व्याजदर मिळणार 
Senior citizen HT

SCSS : सरकारने अलीकडेच त्यांच्या अनेक लहान बचत योजनांचे व्याजदर वाढवले ​​आहेत. आता सिनियर सिटीझन सेव्हिंग स्किम्सवर ७.६० टक्क्यांऐवजी ८ टक्के व्याजदर मिळणार

    • SCSS :  सरकारने अलीकडेच त्यांच्या अनेक लहान बचत योजनांचे व्याजदर वाढवले ​​आहेत. आता सिनियर सिटीझन सेव्हिंग स्किम्सवर ७.६० टक्क्यांऐवजी ८ टक्के व्याजदर मिळणार 

SCSS : : ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही पोस्ट ऑफिसच्या उत्तम योजनांपैकी एक आहे. पोस्ट ऑफिस आपल्या ग्राहकांसाठी वेळोवेळी विविध योजना घेऊन येत असते. सामान्य लोकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी या योजना विशेष जारी केल्या जातात. नुकतेच नवीन वर्ष सुरू झाले आहे. या नव्या वर्षात केंद्र सरकारने पोस्ट ऑफिसच्या अनेक छोट्या बचत योजनांचे व्याजदर वाढवले ​​आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

यामध्ये पोस्ट ऑफिस योजनेचे नावही समाविष्ट आहे. हे दर १ जानेवारी २०२३ पासून लागू करण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत आता ग्राहकांना ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवर ७.६० टक्क्यांऐवजी ८.०० टक्के व्याज मिळणार आहे. अशा परिस्थितीत, या योजनेवर पूर्वीच्या ऐवजी ४० बेसिस पॉइंट अधिक व्याजदर मिळणार आहे. या योजनेत तुम्ही एकूण ५ वर्षांसाठी पैसे गुंतवू शकता. या योजनेचे तपशील आणि मिळालेले व्याज जाणून घेऊया-

अशी आहे सिनियर सिटीझन सेव्हिंग स्किम्स

- ही योजना खास ज्येष्ठ नागरिकांसाठी तयार करण्यात आली असून यात फक्त ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक गुंतवणूक करू शकतात.

- या योजनेअंतर्गत तुम्ही पोस्ट ऑफिस किंवा कोणत्याही अधिकृत बँकेत खाते उघडू शकता.

- या योजनेअंतर्गत १ हजार रुपये ते कमाल १५ लाख रुपयांची गुंतवणूक करता येते.

- या योजनेत, सरकार तिमाही आधारावर व्याज देते.

-पोस्ट ऑफिस या योजनेत नाॅमिनीची निवड करता येते.

-तुम्ही हे खाते मॅच्युरिटीनंतर आणखी तीन वर्षांसाठी वाढवता येते.

- खाते उघडल्यानंतर तुम्ही ते १ वर्षाच्या आत बंद केले, तर तुमच्या एकूण ठेवीपैकी १.५% कपात केली जाईल. दुसरीकडे, खाते २ वर्षांच्या आत बंद केल्यास २ टक्के रक्कम कापली जाईल.

१० लाखांच्या गुंतवणूकीवर इतके मिळेल व्याज

जर तुम्ही १० वर्षांसाठी ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत एकूण ५ लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला ८ टक्के चक्रवाढ व्याजदराने एकूण ४ लाख रुपये व्याज मिळेल. या प्रकरणात, तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण 14 लाखांचा परतावा मिळेल. या प्रकरणात, वार्षिक आधारावर, तुम्हाला ८० हजार रुपये व्याज म्हणून मिळतील. त्याच वेळी, प्रत्येक तिमाहीचे एकूण व्याज २० हजार रुपये असेल.

विभाग

पुढील बातम्या