मराठी बातम्या  /  बिझनेस  /  PF Account balance : इंटरनेटशिवाय घरबसल्या चेक करा तुमचा पीएफ बॅलेन्स, जाणून घ्या प्रोसेस

PF Account balance : इंटरनेटशिवाय घरबसल्या चेक करा तुमचा पीएफ बॅलेन्स, जाणून घ्या प्रोसेस

Apr 26, 2023, 03:39 PM IST

    • PF Account balance : तुम्ही तुमच्या पीएफ खात्यातील शिल्लक अगदी सहज घरबसल्या सहज तपासू शकतात. तुमच्याकडे इंटरनेट नसले तरी तुम्ही पीएफची शिल्लक तपासता येते. त्यासाठी ही पद्धत फायद्याची ठरते.
EPF balance HT

PF Account balance : तुम्ही तुमच्या पीएफ खात्यातील शिल्लक अगदी सहज घरबसल्या सहज तपासू शकतात. तुमच्याकडे इंटरनेट नसले तरी तुम्ही पीएफची शिल्लक तपासता येते. त्यासाठी ही पद्धत फायद्याची ठरते.

    • PF Account balance : तुम्ही तुमच्या पीएफ खात्यातील शिल्लक अगदी सहज घरबसल्या सहज तपासू शकतात. तुमच्याकडे इंटरनेट नसले तरी तुम्ही पीएफची शिल्लक तपासता येते. त्यासाठी ही पद्धत फायद्याची ठरते.

PF Account balance : खाजगी कर्मचाऱ्यांच्या पगारातून दरमहा निवृत्ती वेतन कापले जाते. कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी आपला पीएफ बॅलन्स चेक करत राहिले पाहिजे. पीएफ बॅलन्स आँनलाईन पद्धतीने चेक करण्याचे अनेक पर्याय आहेत. पण जर तुमच्याकडे इंटरनेट नसेल आणि तुम्हाला पीएफ बॅलन्स चेक करायचा असेल तर त्याासाठी तुम्हाला तो करता येईल.

ट्रेंडिंग न्यूज

TCS CEO Salary : भारतातील सर्वात मोठी IT कंपनी TCS च्या सीईओचा दर महिन्याचा पगार माहितीय का? वाचून व्हाल थक्क!

Business Ideas : उद्योग क्षेत्रात ‘जो दिखता है वोही बिकता है...’ हेच सूत्र चालतं…

Akshaya Tritiya Investment : फक्त सोनेच नाही, अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ही गुंतवणूकही ठरते शुभ

Bank News : 'या' बँकेत तुमचं खातं असेल, पण बँक बॅलन्स नसेल तर एक महिन्यानंतर खातं थेट बंद होणार

केवळ मिस्ड काॅल करेल हे काम

जर काही कारणास्तव इंटरनेट नसेल तर तुम्ही फक्त मिस कॉल देऊन तुमचा पीएफ शिल्लक तपासू शकतात. ही सुविधा पूर्णपणे मोफत आहे. यासाठी तुमच्याकडे यूएएन आणि नोंदणीकृत मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे. तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून ९९६६०४४४२५ या क्रमांकावर मिस्डकाॅल द्यावा लागेल. दोन रिंग्ज वाजल्यावर काॅल आपोआप डिस्कनेक्ट होईल. यानंतर, तुम्हाला तुमच्या पीएफ खात्यातील शिल्लक रकमेची संपूर्ण माहिती एसएमएसद्वारे मिळेल.

SMS वर तपासा पीएफ बॅलन्स

तुम्ही इंटरनेटशिवाय एसएमएसद्वारे तुमची पीएफ शिल्लक देखील तपासू शकतात. पीएफ बॅलन्स तपासण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे. यासाठी तुमच्याकडे UAN (युनिव्हर्सल अकाउंट नंबर) आणि नोंदणीकृत मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे. तुम्हाला नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून एसएमएस पाठवावा लागेल.

या एसएमएसमध्ये तुम्हाला EPFOHO UAN ENG टाइप करावे लागेल. या एसएमएसमध्ये ENG ही कोड भाषा आहे. एखाद्या व्यक्तीला त्याच्या आवडीप्रमाणेही भाषा कोड यात निवडता येतो. उदाहरणार्थ, तुम्हाला हिंदीसाठी HIN किंवा मराठीसाठी MAR टाइप करावे लागेल. हा एसएमएस तुम्हाला ७७३८२९९८९९ या क्रमांकावर पाठवावा आहे. यानंतर, तुम्हाला तुमच्या पीएफ रकमेबद्दल संपूर्ण तपशीलांसह माहिती मिळेल.

विभाग

पुढील बातम्या