मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Petrol Diesel price today : खनिज तेलाच्या किंमतींमध्ये किंचित घट, या शहरांमध्ये किंमतीत वाढ

Petrol Diesel price today : खनिज तेलाच्या किंमतींमध्ये किंचित घट, या शहरांमध्ये किंमतीत वाढ

Mar 14, 2023, 08:31 AM IST

    • Petrol Diesel price today 14 March 2023 : खनिज तेलाच्या किमतीत आज किंचित घट झाली आहे. पण या दर बदलाचा देशातील प्रमुख शहरातींल पेट्रोल आणि डिझेलच्या दरावर कोणताही परिणाम झालेला नाही.
petrol diesel price HT

Petrol Diesel price today 14 March 2023 : खनिज तेलाच्या किमतीत आज किंचित घट झाली आहे. पण या दर बदलाचा देशातील प्रमुख शहरातींल पेट्रोल आणि डिझेलच्या दरावर कोणताही परिणाम झालेला नाही.

    • Petrol Diesel price today 14 March 2023 : खनिज तेलाच्या किमतीत आज किंचित घट झाली आहे. पण या दर बदलाचा देशातील प्रमुख शहरातींल पेट्रोल आणि डिझेलच्या दरावर कोणताही परिणाम झालेला नाही.

Petrol Diesel price today 14 March 2023 : आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाच्या किंमतींमध्ये सतत घसरण होत आहे. नोएडा, गुरुग्राम आणि पटनासहित अनेक शहरांमध्ये पेट्रोल डिझेलच्या दरात बदल झालेले दिसत आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण पाहायला मिळत आहे. कच्च्या तेलाच्या किमती ०.३६ टक्क्यांनी घसरल्या आहेत. दरम्यान, देशातील तेल कंपन्यांनी आज म्हणजेच १४ मार्च २०२३ रोजी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत. अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होताना दिसत आहेत.

देशाची राजधानी आणि इतर प्रमुख शहरांमध्ये इंधनाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही, मात्र काही शहरांमध्ये त्याचे दर घसरले असून काही ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या आहेत. नोएडामध्ये पेट्रोल ९६.५९ रुपये प्रतिलिटर विकले जात असून त्यात ६ पैशांची घट झाली आहे. तर डिझेल ८९.७६ रुपये प्रति लिटर आहे.

देशातील प्रमुख महानगरांतील पेट्रोल डिझेलच्या किंमती

देशातील चार प्रमुख महानगरांतील पेट्रोल डिझेलच्या दरातही फारसा बदल झालेला नाही. दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोल १०६.०३ रुपये आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल १०२.७३ रुपये आणि डिझेल ९४.३३ रुपये प्रति लिटर आहे.मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९२.२७ रुपये प्रति लिटर आहे.

एसएमएसवर जाणून घ्या दर

पेट्रोल आणि डिझेलची किंमत एसएमएसद्वारेही कळू शकते. इंडियन ऑइलच्या वेबसाइटवर जाऊन तुम्हाला RSP आणि तुमचा शहर कोड लिहावा लागेल आणि तो 9224992249 या क्रमांकावर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे, जो तुम्हाला IOCL च्या वेबसाइटवरून मिळेल.

विभाग

पुढील बातम्या