मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Petrol Diesel Price: पेट्रोल डिझेलच्या किंमती बदलल्या, जाणून घ्या आजचे ताजे दर

Petrol Diesel Price: पेट्रोल डिझेलच्या किंमती बदलल्या, जाणून घ्या आजचे ताजे दर

Jan 04, 2024, 06:02 PM IST

    • Petrol Diesel Price Today: तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या ताज्या किंमती जाणून घ्या.  
petrol diesel HT

Petrol Diesel Price Today: तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या ताज्या किंमती जाणून घ्या.

    • Petrol Diesel Price Today: तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या ताज्या किंमती जाणून घ्या.  

देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जाहीर करण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय स्तरावर इंधनाच्या दरात किंचित वाढ झाल्याचे दिसून आले आहे. कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतींनुसार भारतात इंधनाची किंमत ठरवली जाते. देशातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या आजच्या दरामुळे वाहनधारकाला तात्पुरता दिलासा मिळाला. दरम्यान, कोणत्या शहरात इंधनाचे दर किती आहेत, हे जाणून घेऊयात.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

शहरपेट्रोल (प्रतिलीटर)डिझेल (प्रतिलीटर)
दिल्ली९६.२६ रुपये८९.६२ रुपये
लखनौ९६.६८ रुपये८९.७६ रुपये
जयपूर१०८ रुपये९३.७२ रुपये
नोएडा ९६,५९ रुपये८९.७६ रुपये
गाझियाबाद९६,५८ रुपये८९.७५ रुपये

 

घरबसल्या जाणून घ्या पेट्रोल आणि डिझेलची किंमत

घरबसल्या देखील पेट्रोल आणि डिझेलची किंमत कळू शकते. ग्राहकांना फोनवर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींची माहिती मिळेल. इंडियन ऑइलचे ग्राहकांनी पेट्रोल आणि डिझेलचा भाव जाणून घेण्यासाठी RSP आणि शहर कोड लिहून ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवा. बीपीसीएल ग्राहकाने RSP आणि शहर कोड लिहून ९२२३११२२२२ या क्रमांकावर पाठवा. एचपीसीएल ग्राहकांनी HPPprice आणि शहर कोड लिहून ९२२२२०११२२ या क्रमांकावर पाठवावा लागेल. ग्राहकांना एसएमएसद्वारे सर्व माहिती मिळेल.

प्रत्येक शहरात दर वेगवेगळे का?

प्रत्येक शहरात पेट्रोलचे दर वेगवेगळे असण्यामागे कर एकमेव कारण आहे. राज्य सरकारे वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या दराने कर वसूल करतात. त्याचबरोबर महानगरपालिका आणि नगरपालिकांनाही प्रत्येक शहरानुसार कर आहे. हे शहरानुसार बदलतात, ज्यांना स्थानिक संस्था कर देखील म्हणतात.

विभाग

पुढील बातम्या