मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral Video: तरुणाची धावत्या ट्रेन खाली उडी; तरीही वाचला जीव; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर!

Viral Video: तरुणाची धावत्या ट्रेन खाली उडी; तरीही वाचला जीव; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर!

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Jan 03, 2024 08:30 PM IST

Mumbai Local Train Viral Video: कौटुंबिक वादातून संबंधित तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे प्राथमिक माहिती आहे.

Mumbai Local (representative Image)
Mumbai Local (representative Image) (PTI)

Viral Video: कल्याण रेल्वे स्थानकावर एका २८ वर्षीय तरुणाने रेल्वेखाली उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. सुदैवाने, या तरुणाचा थोडक्यात जीव वाचला. मंगळवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. त्याचवेळी दुसऱ्या ट्रेनमधून जाणाऱ्या एका व्यक्तीने हा व्हिडिओ रेकॉर्ड केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

कुशिक असरुद्दीन (वय, २८) असे रेल्वे खाली उडी घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. असरुद्दीनने मंगळवारी सकाळच्या सुमारास कल्याण रेल्वे स्थानाकातून बदलापूरच्या दिशेने जाणाऱ्या लोकल खाली स्वतःला झोकुन देत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, इतर प्रवाशांनी अलार्म वाजवत रेल्वे थांबवली. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. वेळीच मिळालेल्या प्रतिसादामुळे मोठी दु:खद घटना टळली.

या घटनेनंतर असरुद्दीनला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले. असरुद्दीनच्या आत्महत्येच्या प्रयत्नामागे कौटुंबिक वाद हे मुख्य कारण असल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.

ठाणे: तरुणीची ३१व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या

यापूर्वी गेल्या महिन्यात ठाण्यातील मानपाडा परिसरात एका १९ वर्षीय तरुणीने ३१व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. मृत तरुणी उत्तर प्रदेशातून काम आणि अभ्यासासाठी येथे आली होती, असे सांगण्यात येत आहे. प्राथमिक माहितीनुसार, तरुणी आपल्या गावातून शहरात आल्यामुळे नाराज होती. नैराश्यातून तिने आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलले, अशीही माहिती समोर येत आहे. या प्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.

WhatsApp channel

विभाग