मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Petrol Diesel Price: येत्या काळात पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढणार? काय सांगतो मूडीजचा अहवाल?

Petrol Diesel Price: येत्या काळात पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढणार? काय सांगतो मूडीजचा अहवाल?

Oct 09, 2023, 10:46 AM IST

    • Petrol Diesel Price Today: आगामी निवडणुकांमुळे कच्या तेलाच्या दरात वाढ होऊनही इंधनाच्या किंमती स्थिर राहतील, असे मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसच्या अहवालात म्हटले आहे.
Petrol diesel HT

Petrol Diesel Price Today: आगामी निवडणुकांमुळे कच्या तेलाच्या दरात वाढ होऊनही इंधनाच्या किंमती स्थिर राहतील, असे मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसच्या अहवालात म्हटले आहे.

    • Petrol Diesel Price Today: आगामी निवडणुकांमुळे कच्या तेलाच्या दरात वाढ होऊनही इंधनाच्या किंमती स्थिर राहतील, असे मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसच्या अहवालात म्हटले आहे.

Loksabha Election: भारतात दिर्घकाळापासून पेट्रोल- डिझेलच्या दरात कोणतीही कपात झालेली नाही. दरम्यान, कच्च्या तेलाच्या दरात अनेकवेळा चढ-उतार पाहायला मिळाले. मात्र, त्यानंतरही देशांतर्गत बाजारात इंधनाचे दर स्थिर आहेत. आगामी निवडणुकांमुळे कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होऊनही पेट्रोल आणि डिझेलचे दरात वाढ होणार नाही, असे मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसच्या अहवालात म्हटले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या तिन्ही इंधन विक्रेत्या कंपन्यांनी गेल्या १८ महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती स्थिर ठेवल्या आहेत. या कंपन्यांचे जवळपास ९० टक्के बाजारावर नियंत्रण आहे. दरम्यान, गेल्यावर्षी कच्चा तेलाच्या किंमती वाढल्यानंतरही इंधनाचे दर स्थिर ठेवण्यात आले. ज्यामुळे कंपन्यांना २०२२-२३ च्या पहिल्या सहामाहीत मोठा तोटा सहन करावा लागला. ऑगस्टपासून आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमती वाढल्या आहेत. यामुळे कंपन्यांच्या नफ्यात घसरण पाहायला मिळत आहे.

मूडीजच्या अहवालानुसार, ‘२०२४ मध्ये होणाऱ्या निवडणुकांमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ होणार नाहीत. कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्यानंतर आयओसी, बीपीसीएल आणि एचपीसीएलच्या नफ्यात घट होईल.’

पेट्रोल- डिझेलचे आजचे दर

आयओसीएलनुसार, सोमवारी (०९-१०-२०२३) देशाची राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत ९६.७२ रुपये आणि एक लिटर डिझेलची किंमत ८९. ६२ रुपये कायम आहे. यासोबतच देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये प्रतिलिटर आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रतिलिटरवर स्थिर आहे. याशिवाय, चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर १०२.६३ रुपये प्रतिलिटर आणि डिझेलचा दर ९४.२४ रुपये प्रतिलीटर आहे. तर, कोलकातामध्ये पेट्रोल १०६.०३ रुपये प्रतिलिटर आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रतिलिटरने विकले जात आहे.

विभाग

पुढील बातम्या