Pune Fire : पिंपरी-चिंचवडमध्ये अग्नितांडव! नऊ गॅस टाक्यांचा भीषण स्फोट; आगीत ४ बस भस्मसात, नागरिक भयभीत
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Fire : पिंपरी-चिंचवडमध्ये अग्नितांडव! नऊ गॅस टाक्यांचा भीषण स्फोट; आगीत ४ बस भस्मसात, नागरिक भयभीत

Pune Fire : पिंपरी-चिंचवडमध्ये अग्नितांडव! नऊ गॅस टाक्यांचा भीषण स्फोट; आगीत ४ बस भस्मसात, नागरिक भयभीत

Updated Oct 09, 2023 08:06 AM IST

Pune Fire : पुण्यातील पिंपरी-चिंचवड येथे ताठवडे परिसरात रविवारी रात्री भीषण स्फोट झाले. तब्बल ९ गॅस टाक्यांमध्ये झालेल्या स्फोटात तब्बल ४ बस भस्मसात झाल्या.

Pune Fire
Pune Fire

पुणे: पुण्यातील पिंपरी-चिंचवड येथे ताथवडे परिसरात रविवारी रात्री ११.३०च्या सुमारास भीषण स्फोट झाले. अचानक झालेल्या या स्फोटांमुळे नागरिक दहशतीत आहे. येथील जेएसपीएम विद्यालयाच्या परिसरात तब्बल ९ गॅस टक्यांच्या स्फोट झाला असून यामुळे तीन ते चार स्कूल बस आगीत भस्मसात झाल्या. सुदैवाने या अग्नितांडवात जीवितहानी झाली नाही. अचानक झालेल्या स्फोटामुळे नागरी भयभीत झाले होते. धुरांचे लोट आणि ज्वाळा दूर अंतरावरून दिसत होत्या. या घटनेचे व्हिडिओ व्हायरल होत आहे. दरम्यान, ही घटना गॅसचोरी करतांना घडली असल्याची माहिती पुढे आली आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये ताथवडे परिसरात रविवारी रात्री नऊ गॅस टाक्यांचा स्फोट झाला. एका मागोमाग तब्बल तीन ते चार स्फोट झाल्याने नागरिकांत दहशतीचे वातावरण होते. हे स्फोट मोठे होते, की दूरपर्यंत याचे हादरे जाणवले. ज्या ठिकाणी स्फोट झाले, त्याच्या बाजूलाच शाळा, हॉस्टेल आणि रहिवाशीही राहत होते. येथे स्कूलबस असल्याने येथील चार ते पाच बस आगीत भस्मसात झाल्या. सुदैवाने रविवार असल्याने मोठी दुर्घटना टळली.

pune news
pune news

या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने आगीवर नियंत्रण मिळवले. येथील गॅसच्या टाक्यावरील कुलिंग ऑपरेशनसाठी तब्बल तास भर लागला.

Israel- Palestine : इस्रायल-हमास दरम्यानच्या रक्तरंजित संघर्षात आत्तापर्यंत १००० ठार

पिंपरी- चिंचवडमधील ताथवडे येथे जेएसपीएम विद्यालयाच्या परिसरात अचानक तीन ते चार स्कूल बसला आग लागल्याने मोठे स्फोट घडले आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. विद्यार्थी आणि नागरिक या स्फोटांच्या आवाजामुळे रस्त्यावर सैरावैरा धावत सुटले. धुरांचे लूट आणि ज्वाळा काही किलोमीटरवरून दिसत होत्या, याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. स्कूलबस या गॅसवरील असल्याने मोठा स्फोट झाल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताथवडे येथील जेएसपीएम महाविद्यालयाच्या परिसरात स्कूलबस उभ्या होत्या. या गाड्या गॅसवर आहेत. रविवारी रात्री अचानक तीन ते चार बसला आग लागून तीन ते चार स्फोट झाले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर