मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Mutual fund : या ५ स्माॅल कॅप फंडांनी एका वर्षात दिले १७ टक्क्यांपेक्षा अधिक रिटर्न्स, एफडीपेक्षाही मिळाला दुप्पट परतावा

Mutual fund : या ५ स्माॅल कॅप फंडांनी एका वर्षात दिले १७ टक्क्यांपेक्षा अधिक रिटर्न्स, एफडीपेक्षाही मिळाला दुप्पट परतावा

May 06, 2023, 06:41 PM IST

    • Mutual fund : स्मॉल कॅप फंड साधारणपणे लार्ज आणि मिड कॅप फंडांपेक्षा जास्त जोखमीचे असतात. परंतु उच्च परतावा मिळण्याची शक्यता येथे सर्वाधिक असते.
mutual funds HT

Mutual fund : स्मॉल कॅप फंड साधारणपणे लार्ज आणि मिड कॅप फंडांपेक्षा जास्त जोखमीचे असतात. परंतु उच्च परतावा मिळण्याची शक्यता येथे सर्वाधिक असते.

    • Mutual fund : स्मॉल कॅप फंड साधारणपणे लार्ज आणि मिड कॅप फंडांपेक्षा जास्त जोखमीचे असतात. परंतु उच्च परतावा मिळण्याची शक्यता येथे सर्वाधिक असते.

Mutual fund : स्मॉल कॅप फंड सामान्यतः लार्ज आणि मिड कॅप फंडांपेक्षा धोकादायक मानले जातात. मात्र, त्यात उच्च परतावा मिळण्याची शक्यता अधिक असते, अॅम्फीच्या आकडेवारीनुसार, काही स्मॉल-कॅप फंडांनी एका वर्षात मुदत ठेवींपेक्षा दुप्पट परतावा दिला आहे. ५ मे २०२३ च्या डेटानुसार, असे ५ स्मॉल कॅप फंड आहेत ज्यांनी एका वर्षात डायरेक्ट प्लॅन अंतर्गत १७ % पेक्षा जास्त आणि नियमित योजनेअंतर्गत १५% पेक्षा जास्त परतावा दिला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

एचडीएफसी स्मॉल कॅप फंड

एचडीएफसी स्मॉल कॅप फंडाच्या डायरेक्ट प्लॅनने २२.४१% परतावा दिला आहे. नियमित योजनेने एका वर्षात २१.२१% परतावा दिला आहे. ही योजना एस अँड पी बीएसई २५० स्माॅल कॅप टोटल रिटर्न इंडेक्सचा मागोवा घेते, ज्याने एका वर्षात ८.५८% परतावा दिला आहे.

टाटा स्मॉल कॅप फंड

टाटा स्मॉल कॅप फंडाच्या डायरेक्ट प्लॅनने २१.३४% परतावा दिला आहे तर नियमित योजनेने एका वर्षात १९.०५% परतावा दिला आहे. ही योजना निफ्टी स्माॅल कॅप २५० एकूण परतावा निर्देशांकाचा मागोवा घेते. या फंडाने एका वर्षात ५.०१% परतावा दिला आहे.

फ्रँकलिन इंडिया स्मॉल कंपनीज फंड

फ्रँकलिन इंडिया स्मॉलर कंपनीज फंडाच्या डायरेक्ट प्लॅनने १७.५४% परतावा दिला आहे तर नियमित योजनेने एका वर्षात १६.५७% परतावा दिला आहे. ही योजना निफ्टी स्माॅल कॅप २५० अंतर्गत एकूण परतावा निर्देशांकाचा मागोवा घेते, या फंडाने एका वर्षात ५.०१% परतावा दिला आहे. 

निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप फंड

निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप फंडाच्या डायरेक्ट प्लॅनने १७.२०% परतावा दिला आहे तर नियमित योजनेने एका वर्षात १६.१५% परतावा दिला आहे. या योजनेने एका वर्षात ५.०१% परतावा दिला आहे.

क्वांट स्मॉल कॅप फंड

टाटा स्मॉल कॅप फंडाच्या डायरेक्ट प्लॅनने १७.२८% परतावा दिला आहे तर नियमित योजनेने एका वर्षात १५.६०% परतावा दिला आहे. या योजनेने एका वर्षात ५.०१% परतावा दिला आहे.

विभाग

पुढील बातम्या