मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Mutual fund : या फंडावर गुंतवणूकदारांनी दाखवला भक्कम विश्वास, SIP तून ८६० कोटींची गुंतवणूक

Mutual fund : या फंडावर गुंतवणूकदारांनी दाखवला भक्कम विश्वास, SIP तून ८६० कोटींची गुंतवणूक

Apr 12, 2023, 04:40 PM IST

    • Mutual fund : म्युच्युअल फंडातील एक प्रमुख लार्ज कॅप फंडातील कंपनीवर गुंतवणूकदांनी दाखवलेल्या विश्वासामुळे एसआयपीमधून तब्बल ८६० कोटी गुंतवणूकीचा टप्पा पार केला आहे. आज या म्युच्युअल फंडाला १५ वर्षे पूर्ण झाली आहेत.
mutual funds HT

Mutual fund : म्युच्युअल फंडातील एक प्रमुख लार्ज कॅप फंडातील कंपनीवर गुंतवणूकदांनी दाखवलेल्या विश्वासामुळे एसआयपीमधून तब्बल ८६० कोटी गुंतवणूकीचा टप्पा पार केला आहे. आज या म्युच्युअल फंडाला १५ वर्षे पूर्ण झाली आहेत.

    • Mutual fund : म्युच्युअल फंडातील एक प्रमुख लार्ज कॅप फंडातील कंपनीवर गुंतवणूकदांनी दाखवलेल्या विश्वासामुळे एसआयपीमधून तब्बल ८६० कोटी गुंतवणूकीचा टप्पा पार केला आहे. आज या म्युच्युअल फंडाला १५ वर्षे पूर्ण झाली आहेत.

Mutual fund : मिरे अॅसेट Mirae Assets इनव्हेस्टमेंट मॅनेजर्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड (एएमसी) आणि कंपनीच्या प्रमुख फंडापैकी एक असलेल्या मिरे अॅसेट लार्ज कॅप फंड (लार्ज कॅप फंडः लार्ज कॅप समभागांमध्ये प्रामुख्याने गुंतवणूक करणारी मुदतमुक्त समभाग योजनेने आपल्या कारकिर्दीचा १५ वर्षाचा महत्वाचा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

एसआयपीतून ८६० कोटींची गुंतवणूक

भारतात अतिशय वेगाने वाढणाऱ्या फंड घराण्यात मिरे अॅसेट इनव्हेस्टमेंट मॅनेजर्सचा समावेश आहे. वित्तीय मालमत्ता निधी व्यवस्थापनाच्या (एयूएम) बाबतीतसुध्दा मिरे अॅसेटने देशातील आघा़डीच्या दहा फंड घराण्यात स्थान पटकावले आहे. या चमकदार कामगिरीच्या आधारेच म्युच्यूअल फंड उद्योगातील आपली भक्कम स्थिती मिरे अॅसेटने दाखवून दिली आहे. आजच्या घडीला ३१ मार्च २०२३ पर्यंत मिरे अॅसेट एएमसी (अॅसेट अंडर मॅनेजमेंट) तब्बल एक लाख १६ हजार ३११ कोटी रुपयांचे निधी व्यवस्थापन हाताळत आहे. त्यात तब्बल ५६ लाख ९० हजार फोलिओ समाविष्ट असून या फंडात दरमहा एसआयपीच्या रुपाने ८६० कोटींचा निधी गुंतविला जात आहे.

नऊ इक्विटी फंडाचे व्यवस्थापन

एएमसी सध्या नऊ समभाग फंडाचे व्यवस्थापन पाहत आहे. त्यात गुंतवणूकदारांचा ९३ हजार ६१३ कोटी रुपयांचा निधी जमा झालेला आहे. त्याव्यतिरिक्त चार हायब्रिड फंड आणि त्यांचा आठ हजार ७८९ कोटी रुपयांचा निधी, अकरा डेट फंड आणि त्यांचा सहा हजार 633 कोटी रुपयांचा निधी, तीन इंडेक्स, तेरा ईटीएफ आणि आठ फंड ऑफ फंड योजना आणि या सर्वाचा एकत्रित निधी सात हजार २६७ कोटी रुपये आहे.

एएमसीकडे असलेल्या नऊ समभाग फंड योजनांमध्ये सर्वात जुनी आणि निधी संचयात सर्वात मोठ्या असलेल्या मिरे अॅसेट लार्ज कॅप फंडाने चार एप्रिल २०२३ ला तब्बल १५ वर्ष पूर्ण केले आहे. या फंडाकडे तीन एप्रिल २०२३ अखेरीस ३२ हजार ८५० कोटी रुपयांचा निधी आहे. हा फंड प्रामुख्याने विविध क्षेत्रातील (बाजारमूल्याच्या दृष्टीने आघाडीच्या १०० कंपन्या) लार्ज कॅप समभागांमध्ये गुंतवणूक करतो. तसेच या फंडासाठी निफ्टी १०० निर्देशांक हा पायाभूत निर्देशांक आहे. या फंडात ३ एप्रिल 2023 अखेर नऊ लाख 51 हजार 79 गुंतवणूकदारांचे फोलिओ कार्यरत आहेत.

गत १५ वर्षात मिरे अॅसेट लार्ज कॅप फंडाने गुंतवणूकदारांना चक्रवाढ पध्दतीने गुंतवणूक निधीत १४.७ टक्के दराने वृध्दी मिळवून दिलेली आहे. विविधांगी पोर्टफोलिओंसाठी अतिशय सक्षम पध्दतीने समभागांची चोखंदळ निवड आणि अतिशय केंद्रीत पध्दतीने गुंतवणूक योजनेचे नेहमी पालन करणे हे आमचे कसब आहे. फंडाच्या शुभारंभाप्रसंगी केलेल्या दहा हजार रुपये गुंतवणूक निधीचे मूल्य ४ एप्रिल २०२३ ला ७६ हजार ९६० रुपये एवढे झालेले आहे, असे मिरे अॅसेट इनव्हेस्टमेंट मॅनेजर्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडचे सीईओ आणि संचालक स्वरुप मोहंती यांनी सांगितले.

विभाग

पुढील बातम्या