मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Mutual funds :म्युच्युअल फंड गुंतवणूकीसाठी चक्रवाढ व्याज दराचा असा होतो फायदा, पाहा

Mutual funds :म्युच्युअल फंड गुंतवणूकीसाठी चक्रवाढ व्याज दराचा असा होतो फायदा, पाहा

May 08, 2023, 05:39 PM IST

    • Mutual funds : म्युच्युअल फंड एसआयपी गुंतवणूकदारांना दीर्घ मुदतीसाठी चक्रवाढ लाभ मिळविण्यात मदत करते. त्यामुळे बहुतेक म्युच्युअल फंड एसआयपी गुंतवणूकदार दीर्घकालीन गुंतवणुकीसाला प्राधान्य देतात. त्यामुळे एक गुंतवणूकदार म्हणून तुमचे ध्येय १ कोटी जमा करणे हे असेल तर तुम्ही हा फाॅर्म्युला आजमावू शकतात.
mutual funds HT

Mutual funds : म्युच्युअल फंड एसआयपी गुंतवणूकदारांना दीर्घ मुदतीसाठी चक्रवाढ लाभ मिळविण्यात मदत करते. त्यामुळे बहुतेक म्युच्युअल फंड एसआयपी गुंतवणूकदार दीर्घकालीन गुंतवणुकीसाला प्राधान्य देतात. त्यामुळे एक गुंतवणूकदार म्हणून तुमचे ध्येय १ कोटी जमा करणे हे असेल तर तुम्ही हा फाॅर्म्युला आजमावू शकतात.

    • Mutual funds : म्युच्युअल फंड एसआयपी गुंतवणूकदारांना दीर्घ मुदतीसाठी चक्रवाढ लाभ मिळविण्यात मदत करते. त्यामुळे बहुतेक म्युच्युअल फंड एसआयपी गुंतवणूकदार दीर्घकालीन गुंतवणुकीसाला प्राधान्य देतात. त्यामुळे एक गुंतवणूकदार म्हणून तुमचे ध्येय १ कोटी जमा करणे हे असेल तर तुम्ही हा फाॅर्म्युला आजमावू शकतात.

Mutual funds : सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) द्वारे म्युच्युअल फंडात गुंतवणूक प्रत्येकजण करतो. मात्र, योग्य आणि शिस्तबद्ध पद्धतीने गुंतवणूक केली तर भरपूर फायदा होऊ शकतो आणि दीर्घकाळासाठी चांगला फंडही बनवता येतो. आज आपण अशाच एका अनोख्या फॉर्म्युलाबद्दल बोलणार आहोत, ज्याचा वापर करून म्युच्युअल फंडातून करोडपती होण्याचा मार्ग खुला होतो.

ट्रेंडिंग न्यूज

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

Smartphone Under 20000: रिअलमीपासून ते वनप्लसपर्यंत; मे महिन्यात २० हजारांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च झालेले स्मार्टफोन!

म्युच्युअल फंड

म्युच्युअल फंडातील गुंतवणूक करण्यासाठी १५*१५*१५ चा फाॅर्म्युला अधिक फलदायी ठरतो. या फॉर्म्युल्या अंतर्गत १५ वर्षांसाठी दरमहा १५००० रुपयांची एसआयपी, ज्यात सरासरी १५% चक्रवाढ वार्षिक परतावा मिळतो त्यात गुंतवणूक करणे फायद्याचे ठरते. यातून तुम्हाला १ कोटी रुपये जमा करण्यास मदत मिळते.

एसआयपी कॅल्क्युलेटरनुसार, ३० हजार रुपयांच्या मासिक गुंतवणुकीसह आणि दरवर्षी १०% स्टेप-अपसह केवळ १० वर्षांत १२% च्या चक्रवाढ व्याजदरानुसार १,०१,२२,९७९ रुपयांचा निधी तयार होईल. यामध्ये तुमची गुंतवणूक ५७,३७,४७३ रुपये असेल आणि अंदाजे भांडवली नफा ४३,८५,५०६ रुपये असेल.

महागाई आणि गुंतवणूकीचं गणित

वास्तविक उत्पन्न वाढल्याने महागाईही वाढते. त्यामुळे उत्पन्न वाढीच्या प्रमाणात गुंतवणुकीचे प्रमाणही वाढले पाहिजे. यामुळे चक्रवाढीचा प्रचंड फायदा होईल. म्हणूनच तुमच्या गुंतवणुकीचे दरवर्षी पुनरावलोकन करा आणि एसआयपीची वाढ करा. एसआयपी करताना तुम्ही स्टेप-अपचा पर्यायही घेऊ शकता.

विभाग

पुढील बातम्या