मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Musk-Zuckerberg cage Fight : एलाॅन मस्क आणि मार्क झुकर्रबर्ग यांच्यात 'केज फाईट', कमाईचे सर्व होणार रेकाॅर्ड्स ब्रेक

Musk-Zuckerberg cage Fight : एलाॅन मस्क आणि मार्क झुकर्रबर्ग यांच्यात 'केज फाईट', कमाईचे सर्व होणार रेकाॅर्ड्स ब्रेक

Jun 26, 2023, 03:26 PM IST

    • Musk-Zuckerberg cage Fight : जगातील पहिल्या आणि दहाव्या क्रमांकाचे अब्जाधीश एलाॅन मस्क आणि मार्क झुकरबर्ग यांच्यात खरोखरीची फायटिंग होणार आहे. यासाठी झुकरबर्गने जोरदार तयारी केलीये. हे चॅलेंज देणाऱ्या एलाॅन मस्कची तयारी झालीये का, पाहा. 
musk vs zuck cage fight HT

Musk-Zuckerberg cage Fight : जगातील पहिल्या आणि दहाव्या क्रमांकाचे अब्जाधीश एलाॅन मस्क आणि मार्क झुकरबर्ग यांच्यात खरोखरीची फायटिंग होणार आहे. यासाठी झुकरबर्गने जोरदार तयारी केलीये. हे चॅलेंज देणाऱ्या एलाॅन मस्कची तयारी झालीये का, पाहा.

    • Musk-Zuckerberg cage Fight : जगातील पहिल्या आणि दहाव्या क्रमांकाचे अब्जाधीश एलाॅन मस्क आणि मार्क झुकरबर्ग यांच्यात खरोखरीची फायटिंग होणार आहे. यासाठी झुकरबर्गने जोरदार तयारी केलीये. हे चॅलेंज देणाऱ्या एलाॅन मस्कची तयारी झालीये का, पाहा. 

Musk-Zuckerberg cage Fight : फेसबूकची पालक कंपनी मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग आणि टेस्लाचे सीईओ एलाॅन मस्क यांच्यात खरोखरीची फायटिंग (शक्तीप्रदर्शन) होणार आहे. या वृत्ताने संपूर्ण जगाचं लक्ष वेधलंय. झुकरबर्गचे मिक्स्ड मार्शल आर्ट प्रशिक्षक खाई 'द शॅडो' वू यांनी दावा केलाय की, या दोघांमध्ये नेमंक कोण जिंकेल हे अद्याप सांगता येणार नाही.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

वास्तविक ट्विटरचा सीईओ एलाॅन मस्कने स्वत:च झुकरबर्गला प्रत्यक्ष मैदानात येऊन शक्तीप्रदर्शन करण्याचे चॅलेंज दिले होते. हे आव्हान झुकरबर्गने स्विकारले. मस्कच्या ट्विटला उत्तर देताना झुकरबर्गने म्हटले आहे की, Send me location ! म्हणजे मला शक्तिप्रदर्शनाच्या ठिकाणाचे लोकेशन पाठव.

मार्क झुकरबर्ग गेल्या वर्षीपासून वू यांच्याकडून प्रशिक्षण घेत आहे. आता दोन्ही अब्जाधीशांनी खेळात लक्ष केंद्रित केले असून आपल्या एमएमए कौशल्य वाढीकडे लक्ष देत आहेत. वू ने झुकरबर्गचा उल्लेख चांगला माणूस म्हणून केला आहे.

एलाॅन मस्कने झुकरबर्गला दिलं आव्हान

वू ने झुकरबर्गचा उल्लेख खेळाडू वृत्तीचा विद्यार्थी असा केला आहे. शक्तिप्रदर्शनाची सुरुवात सर्वात आधी मस्कने केली होती. त्यानेच झुकरबर्गला 'केज फाईट' साऱखी आमंत्रित केल.

मस्कची तयारी झालीये का ?

ट्विटरवरुन सुरु झालेल्या प्रत्युत्तराच्या फैरींमध्ये झुकरबर्गने केज फाईटिंगसाठी सज्ज असल्याचे सांगितलं. पण मस्कने आधीच मैदानातील हार होण्याची शक्यता स्विकार केलीये. त्यासाठी मस्कने ट्रेनिंग सुरु केलंय. झुकरबर्गला कसं हरवणार या प्रश्नांना उत्तर देताना तो म्हणाला, मी मार्कला हलू देणार नाही. त्यासाठी मी त्याच्याच अंगावर बसेन.

झुकरबर्गची तयारी

झुकरबर्गने यंदा मे महिन्यात जिऊ जित्सु टूर्नामेंट जिंकले होते. या अब्जाधीशाने ४० मिनिटात १०० पुलअप्स, २०० पुशअप्स, ३०० स्क्वॅट्स चॅलेंज पूर्ण केले होते.

मस्क झुकरबर्गच्या केज फाईटिंगमधून किती कोटींची कमाई

आतापर्यंच्या इतिहासात कोणत्याही क्रीडा स्पर्धेने केली नसेल इतकी उलाढाल या दोघांच्या केज फाईटला मिळण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या केज फाईटिंगमधून अंदाजे १.८ अब्ज (१४७५० कोटींहून अधिक रुपये) डाॅलर्सची उलाढाल होण्याची शक्यता आहे.

विभाग

पुढील बातम्या