मराठी बातम्या  /  बिझनेस  /  EV plant in Pune : पुण्यात 'महिंद्रा'ची १० हजार कोटींची गुंतवणूक, ईव्ही प्लांट उभारणार

EV plant in Pune : पुण्यात 'महिंद्रा'ची १० हजार कोटींची गुंतवणूक, ईव्ही प्लांट उभारणार

Dec 14, 2022, 04:15 PM IST

  • Mahindra EV plant in Pune :  ईलेक्ट्रीक व्हेईकल्सच्या उत्पादनासाठी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने पुढाकार घेतला आहे. कंपनी पुण्यात ईव्ही उत्पादनासाठी नवा प्रकल्प साकारणार असून, त्यासाठी १० हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे.

Mahindra XUV 700_HT auto

Mahindra EV plant in Pune : ईलेक्ट्रीक व्हेईकल्सच्या उत्पादनासाठी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने पुढाकार घेतला आहे. कंपनी पुण्यात ईव्ही उत्पादनासाठी नवा प्रकल्प साकारणार असून, त्यासाठी १० हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे.

  • Mahindra EV plant in Pune :  ईलेक्ट्रीक व्हेईकल्सच्या उत्पादनासाठी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने पुढाकार घेतला आहे. कंपनी पुण्यात ईव्ही उत्पादनासाठी नवा प्रकल्प साकारणार असून, त्यासाठी १० हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे.

EV plant in Pune : ईलेक्ट्रीक व्हेईकल्सच्या उत्पादनासाठी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने पुढाकार घेतला आहे. कंपनी पुण्यात ईव्ही उत्पादनासाठी नवा प्रकल्प साकारणार असून, त्यासाठी १० हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. राज्य शासनाच्या ईलेक्ट्रिक वाहनांसाठी औद्योगिक प्रोत्साहन योजनेतून गुंतवणूक करण्यास कंपनीला मान्यता मिळाली आहे.. पुढील सात ते आठ वर्षे ही गुंतवणूक करण्यात येईल असे कंपनीने सांगितले.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

या घोषणेबद्दल बोलताना महिंद्रा अँड महिंद्राच्या आॅटो आणि फार्म सेक्टरचे कार्यकारी संचालक राजेश जेजुरीकर म्हणाले की, “आम्ही पुण्यात आमचा ईव्ही उत्पादन कारखाना स्थापन करण्यात येणार आहे. ७० वर्षांहून अधिक काळ आमच्या ‘होम’ राज्यात ही गुंतवणूक करण्यास उत्सुक आहोत. महाराष्ट्र सरकारकडून आम्हाला तात्काळ मंजूरी मिळाली आहे. या प्रकल्प उभारणीमुळे केंद्र सरकारच्या ईज आॅफ डुइिंग बिझनेसला महाराष्ट्रात प्रोत्साहन मिळण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.

महिंद्राच्या आगामी ईलेक्ट्रिक वेहिकल्ससाठी कंपनी पुढील ७ ते ८ वर्षे गुंतवणूक केली जाईल. यात उत्पादन सुविधा, विकास यांचा समावेश आहे.या वर्षाच्या सुरुवातीला महिंद्रा अँड महिंद्राने ब्रिटीश इंटरनॅशनल इन्व्हेस्टमेंटमधून १९२५ कोटी रुपये एका नवीन ४ व्हील पॅसेंजर इलेक्ट्रिक व्हेईकल कंपनीमध्ये उभारले होते.

दरम्यान, आपला नवीन बीई ब्रँड ईव्हीसाठी १५ ऑगस्ट रोजी युके येथील ऑक्सफर्डशायर येथे सादर केला. नवीन बीई कारमुळे महिंद्राच्या इलेक्ट्रिक मोबिलिटी प्लॅनमधील एका नवीन अध्यायाची सुरुवात झाली आहे. कंपनीने नव्याने विकसित केलेल्या INGLO EV प्लॅटफॉर्मवर आधारित असतील. नवीन ईव्ही आर्किटेक्चरमुळे भविष्यातील बीई ब्रँड अंतर्गत इलेक्ट्रिक एसयुव्ही तसेच 'एक्सयुव्ही अंतर्गत असतील. दरम्यान, आगामी महिंद्रा एक्सयुव्ही.ई८ एसयुव्ही ही एक्सयुव्ही ७०० ची इलेक्ट्रिक आवृत्ती असणार आहे. XUV.e8 SUV मूलत:एक्सयुव्ही ७०० ची इलेक्ट्रिक आवृत्ती असेल.

 

पुढील बातम्या