मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Anand Mahindra : तुमच्याकडे काळ्या रंगाची गाडी आहे? मग ही बातमी वाचाच!

Anand Mahindra : तुमच्याकडे काळ्या रंगाची गाडी आहे? मग ही बातमी वाचाच!

Oct 13, 2022, 05:02 PM IST

  • Anand Mahindra on Twitter : काळ्या रंगांच्या गाड्यांचा अपघात होतो अधिक, या वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिकच्या अहवालातील नोंदीचा खरपूस समाचार उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी ट्विटरद्वारे घेतला आहे. 

Anand Mahindra HT

Anand Mahindra on Twitter : काळ्या रंगांच्या गाड्यांचा अपघात होतो अधिक, या वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिकच्या अहवालातील नोंदीचा खरपूस समाचार उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी ट्विटरद्वारे घेतला आहे.

  • Anand Mahindra on Twitter : काळ्या रंगांच्या गाड्यांचा अपघात होतो अधिक, या वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिकच्या अहवालातील नोंदीचा खरपूस समाचार उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी ट्विटरद्वारे घेतला आहे. 

Anand Mahindra on Twitter :  उद्योगपती आनंद महिंद्रा ट्विटरवर कायम ॲक्टिव्ह असतात. ते अनेकदा विनोदी, प्रेरक आणि विचारशील पोस्ट टाकत असतात. त्यांचे ९.८ दशलक्ष ट्विटर फॅन्स आहेत. आपल्या ट्विटरच्या खात्यावर ते नियमित एखादा फोटो अथवा व्हिडिओ शेअऱ करत असतात.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

त्यांनी नुकतेच वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक च्या अहवालाची खिल्ली उडवली आहे. या अहवालाच्या ट्विटर पेजवर काळ्या रंगाच्या गाड्यांचा अपघात होण्याची शक्यता जास्त असते असा दावा केला आहे.या अहवालानुसार,का ळ्या रंगाच्या गाडीला ४७ % अपघाताचा धोका आहे. त्यानंतर राखाडी रंगाच्या गाड्यांना ११ %, चंदेरी रंगाच्या गाड्यांना १० % आणि निळ्या आणि लाल रंगाच्या गाड्यांना ७% अपघाताचा धोका असतो. त्याच्यातुलनेत पांढरे, पिवळे, केशरी आणि सोनेरी रंगाच्या गाड्या क्रॅश होण्याची शक्यता कमी असल्याचे अहवालात म्हटले आहे.

या आकडेवारीला कोणतेही मुलभूत प्रमाणीकरण नाही. किंबहुना यात केवळ स्टॅटिक्सचा वापर केला आहे.त्यामुळे आनंद महिंद्रा यांनी अमेरिकन लेखक मार्क ट्वेन यांच्या एका वाक्याचा दाखला हॅडलवर दिला आहे. ते पुढे म्हणाले की,ही आकडेवारी खोटी आणि अस्पष्ट आहे. कमकूवत युक्तिवादांना बळ देण्यासाठी सांख्यिकीचा वापर यात केला आहे. यासाठी त्यांनी हिंदीत 'कुछ भी' अशी प्रतिक्रिया दिली आहे.

आनंद महिंद्रा यांच्या या ट्विटवर नेटीझन्सनीही भरघोस प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी महिंद्रा यांच्या प्रतिक्रियेला समर्थन दिले आहे. या अहवालाला कोणताही वैज्ञानिक दृष्टीकोन नाही, अशा प्रकारच्या अनेक प्रतिक्रिया नेटीझन्सनी आनंद महिंद्रा यांच्या ट्विटरवर दिल्या आहेत.

विभाग

पुढील बातम्या