मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Amul Vs Nandini milk : दूधासोबत राजकारणही तापलं, अमूल दूध विक्रीला 'या' राज्यात का होतोय विरोध

Amul Vs Nandini milk : दूधासोबत राजकारणही तापलं, अमूल दूध विक्रीला 'या' राज्यात का होतोय विरोध

Apr 12, 2023, 10:15 AM IST

  • Amul Vs Nandini milk : अमूलच्या प्रवेशाची घोषणा झाल्यापासून नंदिनी विरुद्ध अमूल हा या राज्यात सर्वात मोठा निवडणुकीचा मुद्दा बनत आहे.

Amul Vs Nandini milk HT

Amul Vs Nandini milk : अमूलच्या प्रवेशाची घोषणा झाल्यापासून नंदिनी विरुद्ध अमूल हा या राज्यात सर्वात मोठा निवडणुकीचा मुद्दा बनत आहे.

  • Amul Vs Nandini milk : अमूलच्या प्रवेशाची घोषणा झाल्यापासून नंदिनी विरुद्ध अमूल हा या राज्यात सर्वात मोठा निवडणुकीचा मुद्दा बनत आहे.

Amul Vs Nandini milk : १० मे २०२३ रोजी कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, परंतु त्याआधी कर्नाटकातील अमूल ब्रँडचा प्रवेश हा राज्यातील सर्वात मोठा निवडणूक मुद्दा बनला आहे. नंदिनी हा कर्नाटकातील अतिशय लोकप्रिय स्थानिक दूध आणि दुग्धजन्य ब्रँड आहे. मात्र अमूलच्या प्रवेशाची घोषणा झाल्यानंतर काँग्रेस आणि भाजपमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. कर्नाटकातील दूध आणि डेअरी मार्केटवर नंदिनी दूधाचे वर्चस्व आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

अमूलने कर्नाटकमध्ये आॅनलाईन आणि ई काॅमर्स बाजारपेठेद्वारे कर्नाटकमध्ये डेअरी उत्पादने विकण्याची घोषणा केली. पण त्यानंतर नंदिनी आणि अमूल यांच्यात वादाची सुरुवात झाली. कारण कर्नाटकात अमूलच्या प्रवेशामुळे नंदिनी ब्रँडला धक्का बसेल आणि बेंगळुरू बाजारपेठेतील त्याचे वर्चस्व संपुष्टात येईल, अशी भीती कर्नाटकात वाढली आहे.

दूध बाजारातील नंदिनी आणि अमूल यांच्यातील वर्चस्वाच्या लढाईने राजकीय वळण घेतले. काँग्रेसने सत्ताधारी बीजेपीवर नंदिनी ब्रँडला अमूलकडून मिळणाऱ्या आव्हानांना कर्नाटकच्या अस्मितेशी जोडले. त्यामुळे अमूलच्या प्रवेशाचा मुद्दा आता निवडणुकीचा सर्वात मोठा चर्चेचा मुद्दा बनला आहे. पण वास्तविक कर्नाटकात नंदिनीला आव्हान देणे अमूलसाठी इतके सोपे नाही. कारण तिथल्या बाजारात नंदिनी कंपनी ज्या किमतीला तिचं दूध विकते, तिथं अमूलला तिच्यासमोर टिकणं फार कठीण आहे.

कर्नाटक सहकारी दूध उत्पादक महासंघाच्या (केएमएफ) नंदिनी ब्रँड आणि गुजरात सहकारी दूध विपणन महासंघाच्या (जीसीएमएमएफ) अमूल ब्रँडच्या दुधाच्या किमतींची तुलना केल्यास, नंदिनी दूधाने जनमानसात आपले स्थान पक्के केले आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत अमूल दूधाचा टिकाव लागणे सध्यातरी कठीण आहे. कारण नंदिनीच्या टोन्ड दुधाची किंमत फक्त ३९ रुपये प्रति लिटर आहे, त्यात ३ टक्के फॅट आणि ८.५ टक्के एसएनएफ (साॅलिड नाॅट फॅट) असते. त्या तुलनेत अमूलच्या टोन्ड दुधाची किंमत दिल्लीत ५२ रुपये आणि गुजरातमध्ये ५४ रुपये प्रति लिटर आहे.

जर आपण नंदिनीच्या फुल-क्रीम दुधाच्या किमती पाहिल्या तर, अमूलचे फुल-क्रीम दूध, ज्यामध्ये ६% फॅट आणि ९% एसएनएफ आहे. अमूल राजधानी दिल्लीत ६६ रुपये प्रति लिटर आणि गुजरातमध्ये ६४ रुपये प्रति लिटर दराने विकले जाते. तर नंदिनी ९०० मिली फुल क्रीम दुधाचे पॅकेट केवळ ५० रुपयांना आणि ४५० मिली फुल क्रीम दुधाचे पॅकेट २४ रुपयांना विकले जाते. मार्चपर्यंत नंदिनी या दुधाचा एक लिटर पॅक ५० रुपयांना आणि ५०० ​​मिली पॅक २४ रुपयांना विकायची. मात्र खर्च वाढल्यानंतर नंदिनीने पॅकेटचा आकार कमी केला. मात्र किमतीत कोणताही बदल झाला नाही.

म्हणजे अमूलच्या फुल क्रीम दुधाच्या तुलनेत नंदिनीच्या फुल क्रीम दुधाची किंमत खूपच कमी आहे. नंदिनीच्या दह्याची किंमत फक्त ४७ रुपये प्रति किलो आहे तर अमूलच्या दह्याच्या ४५० ग्रॅम पॅकेटची किंमत ३० रुपये आहे, म्हणजेच एक किलो अमूल दह्याची किंमत ६६ रुपये प्रति किलो झाली आहे. किमती पाहता अमूलला नंदिनीशी स्पर्धा करणे शक्य नाही. नंदिनीच्या दुधाची किंमत देशात सर्वात कमी आहे.

राजकारण तापले

कर्नाटक सरकार आपल्या २५ लाख डेअरी शेतकऱ्यांना दुधावर वार्षिक १२०० कोटी रुपयांचे प्रोत्साहन देते. सध्या राज्य सरकार दूध उत्पादकांना प्रतिलिटर ६ रुपये प्रोत्साहनपर अनुदान देते. अमूलच्या प्रवेशामुळे नंदिनीचा बाजारातील हिस्सा कमी होऊ शकतो, अशी चर्चा काॅग्रेससह विरोधकांनी केली आहे. अमूलच्या माध्यमातून नंदिनी ब्रँड नष्ट करण्याचे षडयंत्र असल्याचे सांगत अमूलची एन्ट्री म्हणजे कन्नड अभिमानाला झालेली जखम असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. बेंगळुरूच्या हॉटेल असोसिएशनने सर्व हॉटेलांना फक्त नंदिनी ब्रँड खरेदी करण्यास सांगितले आहे.

विरोधकांच्या हल्ल्यानंतर बॅकफूटवर आलेले कर्नाटक राज्याचे भाजप सरकार आणि मुख्यमंत्री बसलराव बोम्मई यांनी अमूल ब्रँडच्या प्रवेशामुळे नंदिनी ब्रँडला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारली आहे. नंदिनीचे अमूलमध्ये विलीनीकरण होण्याची शक्यताही त्यांनी फेटाळून लावली आहे. अमूलच्या प्रवेशावर राजकारण होता कामा नये, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.. दुसरीकडे, उत्तर कर्नाटकातील बेळगाव आणि हुबळी-धारवाडमध्ये २०१५ पासून अमूलचे दूध विकले जात आहे. आता फक्त ऑनलाइन ई-कॉमर्स मार्गाने बेंगळुरूमध्ये प्रवेश करत असल्याचे अमूलने म्हटले आहे.

विभाग

पुढील बातम्या