मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Mahindra Thar: दहा लाख रुपयापेक्षा कमी किमतीची खिशाला परवडेल अशी 'थार' दाखल

Mahindra Thar: दहा लाख रुपयापेक्षा कमी किमतीची खिशाला परवडेल अशी 'थार' दाखल

Jan 09, 2023, 08:31 PM IST

    • भारतात SUV कार निर्मितीत आघाडीची कंपनी असलेल्या महिंद्रा अँड महिंद्राने आज थारची नवीन श्रेणी बाजारात सादर केली आहे.
Mahindra introduces a new range of the Thar

भारतात SUV कार निर्मितीत आघाडीची कंपनी असलेल्या महिंद्रा अँड महिंद्राने आज थारची नवीन श्रेणी बाजारात सादर केली आहे.

    • भारतात SUV कार निर्मितीत आघाडीची कंपनी असलेल्या महिंद्रा अँड महिंद्राने आज थारची नवीन श्रेणी बाजारात सादर केली आहे.

मुंबई

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

भारतात SUV कार निर्मितीत आघाडीची कंपनी असलेल्या महिंद्रा अँड महिंद्राने आज थारची नवीन श्रेणी बाजारात सादर केली आहे. या नव्या श्रेणीमध्ये रीअर व्हील ड्राइव्ह (Rear Wheel Drive) प्रकार दोन इंजिन पर्यायांमध्ये आणि फोर व्हील ड्राइव्ह (4 Wheel Drive) प्रकार वर्धित क्षमतांमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. रीअर व्हील ड्राइव्ह श्रेणीचे डिझेल प्रकार मॅन्युअल ट्रान्समिशनसह ११७ बीएचपी आणि ३०० Nm टॉर्क (८७.२ kW @३५०० rpm) उत्पन्न करणारे सर्व - नवीन D११७ CRDe इंजिनद्वारे समर्थित आहेत.

नवीन थारची किंमत ९ लाख ९९ हजार रुपयांपासून सुरू होत असून एसयूव्ही खरेदीदारांच्या खिशाला परवडेल अशी आहे. 'शिवाय नवीन थार ही चालकाला ड्रायव्हिंगचा अनोखा अनुभव देणारे वाहन ठरले आहे.

थारच्या 4 Wheel Drive प्रकाराता आता अत्याधुनिक अशी इलेक्ट्रॉनिक ब्रेक लॉकिंग यंत्रणा बसवण्यात आली आहे. याबाबत बोलताना महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचे ऑटोमोटिव्ह सेक्टरचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय नाक्रा म्हणाले, ‘महिंद्रा थार ही एक सक्षम असे एसयूव्ही वाहन आहे. २०२० पासून ब्रँड न्यू नवीन थारने एसयूव्ही प्रेमींचे लक्ष वेधून घेतले असून दररोज ८० हजारहून अधिक वाहनांची विक्री होत आहे. या थारमध्ये महत्त्वाच्या सुधारणा करण्यात आल्या आहे.’

थारच्या नव्या श्रेणीत समाविष्ट केलेले बदल:

रीअर व्हील ड्राइव्ह (RWD): डिझेल: मॅन्युअल ट्रान्समिशनसह ११७ बीएचपी आणि ३०० Nm टॉर्क निर्माण करणारे नवीन D११७ CRDe इंजिन.

गॅसोलीन: mStallion १५०TGDI इंजिन स्वयंचलित ट्रांसमिशन सह १५० बीएचपी आणि ३२० Nm उत्पन्न करते.

-प्रगत ब्रेक लॉकिंग डिफरेंशियल

-आव्हानात्मक भूभागावर सहजतेने चालवता येण्यासाठी 4WD श्रेणी

-दोन नवीन रोमांचक रंग- ब्लेझिंग ब्रॉन्झ आणि एव्हरेस्ट व्हाईट

-नवीन अॅक्सेसरी पॅक - थारचे एक वैशिष्ट्यपूर्ण डिझाइन.

-चार वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये बाह्य आणि अंतर्गत शैली पॅक

· आरामशीर ड्राईव्ह मध्ये आणखी सुधारणा. अधिक आराम आणि सोयीसाठी मागील आर्मरेस्ट कप-होल्डर आणि यूएसबी चार्जिंग पोर्टसह सुसज्ज.

पुढील बातम्या