मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Sensex Down : सेन्सेक्सची सुरुवात निराशाजनक, पहिल्या सत्रात तब्बल ६०० अंशांची घसरण

Sensex Down : सेन्सेक्सची सुरुवात निराशाजनक, पहिल्या सत्रात तब्बल ६०० अंशांची घसरण

Dec 20, 2022, 11:03 AM IST

    • Sensex Down :  अमेरिकन शेअर्स बाजारात सलग चौथ्या दिवशी झालेल्या घसरणीचे पडसाद आज भारतीय शेअर बाजारावर दिसून येत आहेत. मंगळवारी पहिल्या सत्रातच सेंन्सेक्समध्ये सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास तब्बल ६०० अंशांची घसरण झाली.
sensex down HT

Sensex Down : अमेरिकन शेअर्स बाजारात सलग चौथ्या दिवशी झालेल्या घसरणीचे पडसाद आज भारतीय शेअर बाजारावर दिसून येत आहेत. मंगळवारी पहिल्या सत्रातच सेंन्सेक्समध्ये सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास तब्बल ६०० अंशांची घसरण झाली.

    • Sensex Down :  अमेरिकन शेअर्स बाजारात सलग चौथ्या दिवशी झालेल्या घसरणीचे पडसाद आज भारतीय शेअर बाजारावर दिसून येत आहेत. मंगळवारी पहिल्या सत्रातच सेंन्सेक्समध्ये सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास तब्बल ६०० अंशांची घसरण झाली.

Sensex Down : अमेरिकन शेअर्स बाजारात सलग चौथ्या दिवशी झालेल्या घसरणीचे पडसाद आज भारतीय शेअर बाजारावर दिसून येत आहेत. मंगळवारी पहिल्या सत्रातच सेंन्सेक्समध्ये सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास तब्बल ६०० अंशांची घसरण झाली. सध्या सेन्सेक्समध्ये ६०० अंशांची म्हणजे ०.९६ टक्के घसरणीसह ६१,२०९.८९ च्या अंशपातळीला ट्रेड करत आहे. तर निफ्टीमध्ये अंदाजे १९३. ९० अंशांची म्हणजेच १.०५ टक्के घसरण नोंदवत तो अंदाजे १८,२२६.०५ अंशांवर ट्रेड करत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

Smartphone Under 20000: रिअलमीपासून ते वनप्लसपर्यंत; मे महिन्यात २० हजारांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च झालेले स्मार्टफोन!

ओपनिंगची स्थिती

शेअर बाजाराची सुरुवात आज घसरणीने झाली. मार्केटची सुरुवात होताच सेन्सेक्स १९७ अंशांच्या घसरणीसह ६१६०८ वर उघडला. सुरुवातीच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे.निफ्टीतही ८० अंशांच्या घसरणीसह १८,३४० अंशांवर तर बॅक निफ्टी २६१ अंशांच्या घसरणीसह ४३१५२ अंशपातळीवर उघडला. निफ्टीने १८३०० ची पातळी कायम राखली आहे.

सर्वच स्टाॅक्समध्ये लाल निशाण

अॅक्सिस बँक, स्टेट बँक आणि बजाज फायनान्स वगळता सेन्सेक्समधील सर्व समभाग लाल रंगात आहेत. मारुती, हिंदुस्थान युनिलिव्हर आणि एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक घसरण झाली आहे.

जागतिक बाजारातील स्थिती

सलग चौथ्या सत्रात अमेरिकन बाजारात घसरण झाली. आठवड्याच्या पहिल्या दिवशी डाऊ जोन्स १६३ अंशांच्या घसरणीसह म्हणजेच ०.४९ टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला. फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर वाढीचा टेक कंपन्यांवर नकारात्मक परिणाम दिसत आहे. मेटा शेअर्स ४ टक्क्यांनी घसरले. टेक-आधारित निर्देशांक नॅसडॅक १.४९ टक्के आणि एस अॅड पी ५०० टक्क्यांनी घसरले. इतर आशियाई बाजारांबद्दल बोलायचे झाल्यास, जपानचा निक्की ०.२० टक्क्यांनी आणि कोरियाचा कोस्पी ०.४५ टक्क्यांनी घसरला आहे.

पुढील बातम्या