मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Sensex Today: जगात मंदीची चर्चा असताना भारतीय शेअर बाजार फॉर्मात; सेन्सेक्सचा नवा रेकॉर्ड

Sensex Today: जगात मंदीची चर्चा असताना भारतीय शेअर बाजार फॉर्मात; सेन्सेक्सचा नवा रेकॉर्ड

Nov 30, 2022, 04:31 PM IST

  • Sensex New Record: भारतीय शेअर बाजारात तेजी कायम असून सेन्सेक्सनं आज नवा उच्चांक गाठला आहे.

Sensex

Sensex New Record: भारतीय शेअर बाजारात तेजी कायम असून सेन्सेक्सनं आज नवा उच्चांक गाठला आहे.

  • Sensex New Record: भारतीय शेअर बाजारात तेजी कायम असून सेन्सेक्सनं आज नवा उच्चांक गाठला आहे.

Sensex New Record: अमेरिकेसह काही युरोपीय देशांत मंदीचं सावट असताना व अनेक मोठ्या कंपन्या नोकरकपात करत असताना भारतात मात्र सगळं आलबेल असल्याचं चित्र आहे. शेअर बाजारातही त्याचं प्रतिबिंब पडत आहे. भारतीय शेअर बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी कायम असून सेन्सेक्सनं आज नवा उच्चांक गाठला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

Smartphone Under 20000: रिअलमीपासून ते वनप्लसपर्यंत; मे महिन्यात २० हजारांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च झालेले स्मार्टफोन!

आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी, म्हणजेच बुधवारी सेन्सेक्स ४०० हून अधिक अंकांनी वाढला असून ६३,१०० अंकांवर पोहोचला आहे. सेन्सेक्सनं ६३ हजारचा टप्पा ओलांडण्याची ही पहिलीच वेळ आहे. निफ्टीमध्येही आज दिवसभरात चांगली वाढ झाली. निफ्टी १४० अकांनी वाढून १८,७५८ वर बंद झाला.

मेटल, एफएमसीजी, रिअल इस्टेट आणि ऑटो सेक्टरमधील कंपन्यांनी आज चमकदार कामगिरी केली. या कंपन्यांचे शेअर अंदाजे १ टक्क्यांनी वाढले. बहुतेक सर्व क्षेत्राची कामगिरी उत्तम होत असताना सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे समभाग आज एक टक्क्यांनी घसरलेले दिसले.

बीएसईमधील टॉप ३० कंपन्यांपैकी महिंद्रा अँड महिंद्राचा शेअर सर्वाधिक भाव खाऊन गेला. या शेअरमध्ये ४ टक्क्यांहून अधिक वाढ झाली. याशिवाय अल्ट्राटेक, पॉवरग्रीड, एचयूएल, टायटन, टाटा स्टील, एशियन पेंट, एअरटेल, ॲक्सिस बँक, एल अँड टी, एचडीएफसी, कोटक बँक, एनटीपीसी या कंपन्यांच्या समभागातही मोठ्या प्रमाणात तेजी दिसून आली. विकल्या गेलेल्या समभागांमध्ये इंडसइंड बँक, एसबीआय, आयटीसी, सनफार्मा, बजाज फिनसर्व्ह यांचा समावेश होता.

गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला!

विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी नोव्हेंबरमध्ये आतापर्यंत ३२,३४४ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्यांचा कल पूर्णपणे खरेदीकडं राहिला. आकडेवारीनुसार विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी सोमवारी ९३५.८८ कोटी रुपये किमतीचे शेअर्स खरेदी केले.

पुढील बातम्या