मराठी बातम्या  /  बिझनेस  /  IPO News : ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ घालतोय हा आयपीओ, तुम्ही तयार आहात का?

IPO News : ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ घालतोय हा आयपीओ, तुम्ही तयार आहात का?

Dec 23, 2023, 07:16 PM IST

  • Kay Cee Energy IPO news : आयपीओच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे.

KC Energy IPO

Kay Cee Energy IPO news : आयपीओच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे.

  • Kay Cee Energy IPO news : आयपीओच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे.

Kay Cee Energy IPO News : २०२३ चा डिसेंबर महिना आयपीओ महिना म्हणून ओळखला जाईल असं म्हटल्यास वावगं ठरू नये. या महिन्यात अनेक मोठ्या कंपन्यांचे आयपीओ आले आहेत. तुम्हाला या आयपीओमध्ये गुंतवणुकीची संधी मिळाली नसेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. पुढील आठवड्यात आणखी एका कंपनीचा आयपीओ येत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

Smartphone Under 20000: रिअलमीपासून ते वनप्लसपर्यंत; मे महिन्यात २० हजारांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च झालेले स्मार्टफोन!

Business Ideas : ‘असतील शिते तर जमतील भुते...’ पैशाची किमया अन् मित्रांचे कोंडाळे!

केसी एनर्जी ही कंपनी आयपीओ आणत आहे. पुढच्या आठवड्यात २८ डिसेंबर रोजी हा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होईल आणि २ जानेवारी २०२४ पर्यंत त्यात अप्लाय करता येईल. आयपीओच्या माध्यमातून ही कंपनी १५.९३ कोटी रुपये उभारणार आहे. त्यासाठी प्रति इक्विटी शेअर ५४ रुपये हा दर निश्चित करण्यात आला आहे. केसी एनर्जीचा आयपीओ राष्ट्रीय शेअर बाजारात (NSE) सूचीबद्ध होईल.

LIC share price : दीड वर्षांपासून रडवणारा एलआयसीचा शेअर सुस्साट, सरकारचा महत्त्वाचा निर्णय पथ्यावर

ग्रे मार्केटमध्ये आधीच धुमाकूळ

केसी एनर्जीचा आयपीओ ग्रे मार्केटमध्ये २५ रुपयांच्या प्रीमियमवर उपलब्ध आहे. अप्पर प्राइस बँडनुसार, हा इश्यू ७९ रुपयांना सूचीबद्ध होऊ शकतो. गुंतवणूकदारांना पहिल्याच दिवशी ४७ टक्क्यांपर्यंत नफा मिळू शकतो. कंपनीचे शेअर्स ५ जानेवारीपर्यंत सूचीबद्ध होऊ शकतात.

काय करते ही कंपनी?

केसी एनर्जी अँड एन्फ्रा ही एक इंजिनीअर, खरेदी आणि बांधकाम (EPS) कंपनी आहे. ओव्हरहेड आणि अंडरग्राउंड लाइन्स, सबस्टेशनची बांधकामं, ऑटोमेशन इत्यादीसह वीज वाहक आणि वितरक यंत्रणांच्या प्रकल्पांचे बांधकाम आणि ते कार्यान्वित करण्याच्या सेवा ही कंपनी देते.

BOB BRO : १६ ते २५ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी बँक ऑफ बडोदानं आणली खास योजना

लोकेंद्र जैन आणि शालिनी जैन हे केसी एनर्जीचे प्रवर्तक आहेत. कंपनीमध्ये प्रवर्तकांची वाटा सध्या ९६.१२ टक्के इतका आहे. आयपीओच्या लाँच केल्यानंतर हा वाटा ७०.२५ टक्क्यांपर्यंत कमी होणार आहेत. जीवायआर कॅपिटल अॅडवायजर्स प्रा. लिमिटेड हे आयपीओचे व्यवस्थापक आहेत. तर, बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या इश्यूचे रजिस्ट्रार आहेत.

 

(डिस्क्लेमर : ही केवळ कंपनीच्या शेअरची व कामगिरीची माहिती आहे. हा कुठल्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. गुंतवणूक करण्याआधी आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

विभाग

पुढील बातम्या