मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Prepaid Plan: ४०० रुपयांहून कमी किंमतीचा प्लॅन; १२ ओटीटी प्लेटफॉर्मसह अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंग फ्री

Prepaid Plan: ४०० रुपयांहून कमी किंमतीचा प्लॅन; १२ ओटीटी प्लेटफॉर्मसह अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंग फ्री

Dec 26, 2023, 04:02 PM IST

    • Best prepaid recharge plans under 400: जिओने त्यांच्या ग्राहकांसाठी खास प्लॅन आणला आहे.
Reliance JIO (REUTERS)

Best prepaid recharge plans under ₹400: जिओने त्यांच्या ग्राहकांसाठी खास प्लॅन आणला आहे.

    • Best prepaid recharge plans under 400: जिओने त्यांच्या ग्राहकांसाठी खास प्लॅन आणला आहे.

Jio prepaid plans and unlimited calls: चित्रपट, वेब सिरीज किंवा इतर व्हिडिओ कंटेंट पाहण्यासाठी वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन घ्यावे लागते. परंतु, विविध प्लॅटफॉर्मचे वेगळे सबस्क्रिप्शन घेतल्यास ग्राहकांना अधिक पैसे खर्च करावे लागतात. मात्र, असे काही रिचार्ज प्लॅन आहेत. ज्याद्वारे ग्राहकांना मोफत अनेक ओटीटी सेवांचा लाभ घेता येतो. दरम्यान, रिलायन्स जिओने नवीन वर्षापूर्वी आपल्या ग्राहकांना एक मोठी भेट दिली. ग्राहकांना ४०० रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या रिचार्जमध्ये तब्बल १२ ओटीटी प्लॅटफॉर्म विनामूल्य पाहता येणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

Smartphone Under 20000: रिअलमीपासून ते वनप्लसपर्यंत; मे महिन्यात २० हजारांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च झालेले स्मार्टफोन!

Business Ideas : ‘असतील शिते तर जमतील भुते...’ पैशाची किमया अन् मित्रांचे कोंडाळे!

Penny stock turns multibagger : दीड रुपयाचा शेअर ५५ रुपयांवर पोहोचला! गुंतवणूकदारांनी किती कमावले माहित्येय?

रिलायन्स जिओने त्यांच्या ग्राहकांसाठी नुकतेच जिओ टीव्ही प्रिमियम प्लॅन लॉन्च केले आहेत. ग्राहकांना फक्त एका रिचार्जमध्ये अनेक सेवांचा फायदा घेता येणार आहे, ज्यात अनलिमिटेड 5G डेटा आणि फ्री कॉलिंगसह अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म विनामूल्य पाहता येईल.

रिलायन्स जिओने त्यांच्या ग्राहकांसाठी ३९८ रुपयांचा स्वस्त प्लॅन आणला आहे. या रिचार्जमध्ये ग्राहकांना एक किंवा दोन नव्हेतर १२ ओटीटी प्लॅटफॉर्मची सदस्यता मिळत आहे. या प्लॅनची मर्यादा २८ दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जीबी डेटा मिळते. तसेच प्रीपेड प्लॅनसह ग्राहकांना सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस पाठवण्याचा पर्याय देखील मिळतो.

ओटीटी सेवा आणि अॅपच्या सूचीमध्ये SonyLIV ZEE5, JioCinema Premium, Lionsgate Play आणि Discovery+, Sun NXT, Kanchha Lannka, Pianel Marathi, Chaupal, DocuBay, EPIC ON Hoichoi इत्यादींचा समावेश आहे. या व्यतिरिक्त ग्राहकांना जिओटीव्ही आणि JioCloud अॅपचे सबस्क्रिप्शन मिळते.

जिओचे हे प्लॅन अतिरिक्त डेटासाठी सर्वोत्तम आहेत, किंमत फक्त १५ रुपयांपासून सुरू होते. एवढेच नाही तर, जिओ ग्राहक 5G स्मार्टफोन वापरत असेल आणि जिओच्या 5G सेवा उपलब्ध असलेल्या भागात राहत असेल. तर, त्याला या रिचार्जनंतर अमर्यादित 5G डेटाचाही लाभ मिळतो.

विभाग

पुढील बातम्या