LIC Job 2023: एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेडने शिकाऊ पदांसाठी अर्ज मागवले आहेत. पात्र उमेदवार एलआयसी एचएफएलच्या अधिकृत वेबसाइट Lichousing.com वर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. या भरती अतंर्गत एकूण २५० पदे भरण्यात येणार आहेत. दरम्यान, भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची माहिती जाणून घेऊयात.
एलआयसी हाउसिंग फायनान्स लिमिटेडमध्ये एकूण २५० शिकाऊ पदे भरली जाणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२३ आहे. कोणत्याही शाखेतील पदवीधर या पदासाठी अर्ज करु शकतात. या पदासाठी उमेदवाराचे वय २० ते २५ आहे.
निवड प्रक्रियेत लेखी परीक्षेचा समावेश असेल. प्रवेश परीक्षेत १०० बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील ज्यात बेसिक बँकिंग, गुंतवणूक आणि विमा सोबत परिमाणात्मक/तर्क/डिजिटल/संगणक साक्षरता/इंग्रजी या विषयावर विचारले जातील. प्रवेश परीक्षेच्या निकालावर आधारित निवडलेल्या उमेदवारांना एलआयसी एचएफएल कार्यालयात कागदपत्र पडताळणी आणि वैयक्तिक मुलाखतीसाठी आमंत्रित केले जाईल.
सामान्य श्रेणी आणि ओबीसी प्रवर्गासाठी अर्ज फी ९४४ रुपये आहे. एससी, एसटी आणि महिला उमेदवारांसाठी ७०८ रुपये अर्ज फी ठेवण्यात आली. तसेच पीडब्लूबीडी उमेदवारांना ४७२ रुपये अर्ज फी द्यावी लागेल. अधिक माहितीसाठी एलआयसी एचएफएलची अधिकृत वेबसाइटवर भेट देऊ शकतात.