मराठी बातम्या  /  बिझनेस  /  SIP money withdrawal: एसआयपीमधून गुंतवणूकदार पैसे का काढून घेतायत?

SIP money withdrawal: एसआयपीमधून गुंतवणूकदार पैसे का काढून घेतायत?

Nov 01, 2022, 02:36 PM IST

    • सणासुदीच्या दिवसांत खर्च करण्यासाठी आपल्या म्य़ुच्युअल फंडांतून पैसे काढून घेण्याचे प्रमाण गुंतवणूकदारांमध्ये वाढले आहे.काय आहेत कारणे जाणून घ्या. 
SIP HT

सणासुदीच्या दिवसांत खर्च करण्यासाठी आपल्या म्य़ुच्युअल फंडांतून पैसे काढून घेण्याचे प्रमाण गुंतवणूकदारांमध्ये वाढले आहे.काय आहेत कारणे जाणून घ्या.

    • सणासुदीच्या दिवसांत खर्च करण्यासाठी आपल्या म्य़ुच्युअल फंडांतून पैसे काढून घेण्याचे प्रमाण गुंतवणूकदारांमध्ये वाढले आहे.काय आहेत कारणे जाणून घ्या. 

सणासुदीच्या दिवसांत खर्च करण्यासाठी आपल्या म्य़ुच्युअल फंडांतून पैसे काढून घेण्याचे प्रमाण गुंतवणूकदारांमध्ये वाढले आहे. अॅम्फी या म्युच्युअल फंडविषयक संस्थेने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या सप्टेंबरमध्ये गुंतवणूकदारांनी त्यांच्या सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) खात्यांमधून सुमारे ६५७८ कोटी रुपये काढले. गेल्या ११ महिन्यांतील ही सर्वाधिक मोठी रक्कम आहे.

ट्रेंडिंग न्यूज

TCS CEO Salary : भारतातील सर्वात मोठी IT कंपनी TCS च्या सीईओचा दर महिन्याचा पगार माहितीय का? वाचून व्हाल थक्क!

Business Ideas : उद्योग क्षेत्रात ‘जो दिखता है वोही बिकता है...’ हेच सूत्र चालतं…

Akshaya Tritiya Investment : फक्त सोनेच नाही, अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ही गुंतवणूकही ठरते शुभ

Bank News : 'या' बँकेत तुमचं खातं असेल, पण बँक बॅलन्स नसेल तर एक महिन्यानंतर खातं थेट बंद होणार

मागील वर्षीच्या सणासुदीच्या दिवसांमध्येदेखील एसआयपी खात्यांतून गुंतवणूकदारांनी पैसे काढून घेण्याचे प्रमाण उच्च पातळीवर होते. सप्टेंबर २०२१ मध्ये, गुंतवणूकदारांनी ८,६०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची एसआयपी खाती रिडीम केली होती. त्या अगोदरच्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासूनची ती काढली गेलेली सर्वाधिक रक्कम होती. त्याच वेळी, अॅम्फीने निव्वळ एसआयपीची आकडेवारी उघड करण्यास सुरुवात केली होती.

म्युच्युअल फंडांच्या वितरकांच्या मते, सण व उत्सवाचे दिवस सुरू होण्यापूर्वी एसआयपी खात्यांमधून पैसे काढण्याचे प्रमाण वाढते, कारण गुंतवणूकदारांना मुहूर्तावर खरेदी करायची असते आणि त्यांना त्यांत डिस्काउंट मिळवायचे असतात. पुण्यातील म्युच्युअल फंड वितरक धनंजय काळे म्हणाले, “गेल्या महिन्यात एसआयपी योजनांमधून गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात पैसे काढले, त्यामागे नवीन घरांच्या खरेदीसाठी डाऊन पेमेंट करण्याकरीता निधीची गरज हे प्रमुख कारण होते. जसजसे सण जवळ येतात, तसतसे घरे खरेदी करू पाहणारे गुंतवणूकदार डाउन पेमेंटसाठी आपल्या बचत योजना रिडीम करू लागतात. काही गुंतवणूकदारांनी तर त्यांची म्युच्युअल फंड योजना याकरीता रिडीम केल्या आहेत, की त्यांना आयफोन घ्यायचा होता.

आनंदचे एमएफ वितरक निखिल ठक्कर म्हणाले, “रिडीम करण्यामागे सण व उत्सव हे निश्चितच प्रमुख घटक होते, परंतु काही गुंतवणूकदारांना महागाईमुळे वाढलेल्या खर्चाची पूर्तता करण्यासाठी निधीची आवश्यकता होती. परदेशात, विशेषत: कॅनेडियन महाविद्यालयांमध्ये वाढलेली फी भरण्यासाठी अनेक गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंडांमधील पैसे काढून घ्यावे लागले.

क्वांटम म्युच्युअल फंडाचे एमडी आणि सीईओ जिमी पटेल यांच्या मते, एसआयपी खात्यांमधून पैसे काढण्यामागे बाजारातील अस्थिरता हेदेखील एक कारण आहे. ते म्हणाले, “सणांचा हंगाम हे एक कारण आहे. दुसरे कारण म्हणजे काही समभागांची कामगिरी खराब झाली, त्या अनुषंगाने काही गुंतवणूकदारांनी आपल्या गुंतवणुकीची पुनर्रचना केली व त्यामध्ये त्यांनी काही म्युच्युअल फंडातील पैसे काढून घेतले. बाजारातील तेजीचा फायदा घेण्यासाठी सप्टेंबरच्या पहिल्या दोन आठवड्यात गुंतवणूकदारांनी पैसे काढले असावेत.

सप्टेंबरमध्ये रिडेम्प्शनमध्ये वाढ झाल्यामुळे निव्वळ एसआयपीचा प्रवाह एकूण गुंतवणुकीच्या निम्म्याहून कमी झाला. सप्टेंबरमध्ये जवळपास १३ हजार कोटी रुपये एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडांमध्ये आले. तथापि, निव्वळ आवक केवळ ६,४०० कोटी रुपये इतकीच होती.

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत, गुंतवणूकदारांनी एसआयपी मार्गाद्वारे म्युच्युअल फंडांमध्ये ४३,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. ही रक्कम ७४,००० कोटी रुपयांच्या एकूण एसआयपी प्रवाहाच्या ६० टक्के इतकी आहे. मागील आर्थिक वर्षात, हा निव्वळ एसआयपी प्रवाह एकूण ४० टक्क्यांच्या जवळ होता.

सप्टेंबर २०२१ पासून सकल एसआयपी प्रवाह १० हजार कोटी रुपयांच्या वर राहून गेल्या दोन वर्षांमध्ये सकल आणि निव्वळ एसआयपीचे प्रवाह वाढत आहेत.

गेल्या वर्षभरात इक्विटी आणि डेट फंड दोन्हींची खराब कामगिरी असूनही, वाढत्या एसआयपी प्रवाहाला या उद्योगासाठीचे एक चांगले चिन्ह म्हणून पाहिले जात आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीचा पर्याय म्हणून म्युच्युअल फंडांचा विचार गुंतवणूकदारांमध्ये रुजला आहे. म्हणूनच, बाजारात चढउतार असले, तरी गुंतवणूकदारांनी एसआयपी कायम ठेवावी, असे सांगण्यात येते.

"गुंतवणूकदार चांगल्या गुंतवणुकीचे नियम शिकले आहेत असे दिसते. ते एसआयपीद्वारे भांडवल निर्मिती वर्षानुवर्षे करण्यास तयार असतात आणि विशेषत: जेव्हा निव्वळ मालमत्ता मूल्य (एनएव्ही) घसरते तेव्हा टप्प्याटप्प्याने ते युनिट्स जमा करून ठेवतात. असे शिस्तबद्ध गुंतवणूकदार हेच या मासिक प्रवाहाचा मुख्य भाग बनलेले आहेत. त्यांचाच या बाजारात सर्वार्थाने लाभ होताना दिसतो, असे प्रतिपादन डीएसपी म्युच्युअल फंडाचे सीईओ कल्पेन पारेख यांनी केले.

 

 

 

 

पुढील बातम्या