मराठी बातम्या  /  बिझनेस  /  ICICI FD Rates: आयसीआयसीआय बँकेच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात मोठी वाढ; पाहा नवे व्याजदर

ICICI FD Rates: आयसीआयसीआय बँकेच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात मोठी वाढ; पाहा नवे व्याजदर

Oct 05, 2022, 06:22 PM IST

  • ICICI FD Interest Rates: देशातील खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँकेने मोठ्या प्रमाणात मुदत ठेवींवरील (एफडी) व्याजदर २ कोटी रुपयांवरून ५ कोटी रुपयांपर्यंत वाढवले ​​आहेत.

bank deposit HT

ICICI FD Interest Rates: देशातील खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँकेने मोठ्या प्रमाणात मुदत ठेवींवरील (एफडी) व्याजदर २ कोटी रुपयांवरून ५ कोटी रुपयांपर्यंत वाढवले ​​आहेत.

  • ICICI FD Interest Rates: देशातील खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँकेने मोठ्या प्रमाणात मुदत ठेवींवरील (एफडी) व्याजदर २ कोटी रुपयांवरून ५ कोटी रुपयांपर्यंत वाढवले ​​आहेत.

ICICI FD Interest Rates: देशातील खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँकेने २ कोटींपासून ते ५ कोटींपर्यंतच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. आयसीआयसीआय बॅकेने व्याजदरातील ही वाढ अंदाजे ६१ ते ९० दिवसांपर्यंच्या बल्क डिपाँझीट एफडीवर केले आहे. व्याजदरातील वाढीनंतर या मुदत कालावधीवर २५ बेसिस पाँईंट्स म्हणजेच ५.५ टक्के व्याजदर मिळणार आहेत. दुसरीकडे आयसीआयसीआय बॅकेने ५ कोटी ते ५०० कोटी किंवा त्यापेक्षा अधिक मुदत ठेवींवरील व्याजदरातही बदल केला आहे. यासंदर्भात बॅकेच्या संकेतस्थळावर मिळालेल्या माहितीनुसार सुधारित दर ४ आँक्टोबरपासून लागू करण्यात आले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

बॅकेचे सध्याचे एफडी दर

आयसीआयसीआय बँकेने आपल्या ग्राहकांच्या ७ दिवस ते २९ दिवसांच्या एफडीवर ३.७५ टक्के,,३० ते ४५ दिवसांच्या एफडीवर ३.९ टक्के,४६ ते ६० दिवसांच्या एफडीवर ४.२५ टक्के, ९१ ते १८४ दिवसांच्या एफडीवर ५.५% आणि 185 ते 270 दिवसांच्या एफडीवर ५.७५ टक्के व्याज देत आहे. दुसरीकडे, आयसीआयसीआयबँक २७१ दिवस ते १ वर्षापेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर ६ टक्के आणि १ वर्ष ते १० वर्षांच्या एफडीवर सर्वाधिक ६.२५ टक्के व्याज देत आहे. याशिवाय जर एखाद्या ग्राहकाने एफडीचे सर्व पैसे जमा केल्यापासून ७ दिवसांच्या आत काढले तर त्याला कोणताही व्याजदर मिळणार नाही.

या मुदत ठेवींवर सर्वाधिक ६.९ टक्के व्याज

आयसीआयसीआयबँकेने बल्क फिक्स्ड डिपॉझिटवरील व्याजदर ५ कोटींवरून ५०० कोटी आणि त्याहून मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. बँक आता ५ कोटी ते ५.१० कोटींपेक्षा कमी आणि 24.90 कोटी ते रु. 25 कोटींपेक्षा कमी रकमेच्या बल्क एफडीवर ३.७५ टक्के ते ४.३५% व्याज देणार आहे. याशिवाय,उर्वरित बल्क मुदत ठेवीवर ३.७५ टक्के ते ६.२५ टक्के व्याज देईल. या कालावधीतील बल्क डिपॉझिट एफडीमध्ये मुदतपूर्व पैसे काढण्याची सुविधा देखील समाविष्ट आहे. तर ३.७५ टक्के ते ६.९ टक्क्यांपर्यंत सर्वाधिक व्याज हे २ कोटी ते ५०० कोटींवरील एफ़डीवर देण्यात आले आहे.

विभाग

पुढील बातम्या