मराठी बातम्या  /  बिझनेस  /  EPFO : वाढीव पेन्शन योगदानासंदर्भात संभ्रम ईपीएफओने केला दूर, या कर्मचाऱ्यांना मिळणार वाढीव पेन्शन

EPFO : वाढीव पेन्शन योगदानासंदर्भात संभ्रम ईपीएफओने केला दूर, या कर्मचाऱ्यांना मिळणार वाढीव पेन्शन

May 05, 2023, 12:23 PM IST

    • EPFO : वाढीव पेन्शनसंदर्भात केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
EPFO HT

EPFO : वाढीव पेन्शनसंदर्भात केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

    • EPFO : वाढीव पेन्शनसंदर्भात केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

EPFO : वाढीव पेन्शनसंदर्भात केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. अतिरिक्त पेन्शनची रक्कम कंपनीचा अथवा कर्मचाऱ्याच्या खात्यातून वसूल केली जाईल याबाबतचा संभ्रम आता दूर झाला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Business Ideas : उद्योग क्षेत्रात ‘जो दिखता है वोही बिकता है...’ हेच सूत्र चालतं…

Akshaya Tritiya Investment : फक्त सोनेच नाही, अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ही गुंतवणूकही ठरते शुभ

Bank News : 'या' बँकेत तुमचं खातं असेल, पण बँक बॅलन्स नसेल तर एक महिन्यानंतर खातं थेट बंद होणार

Govt Savings schemes : दररोज फक्त २५० रुपये गुंतवा आणि २४ लाख मिळवा! ‘ही’ सरकारी योजना तुम्हाला बनवेल लखपती

केंद्र सरकारने नुकतेच वाढीव पेन्शनसंदर्भातील नवा नियम जाहीर केला. मात्र त्यासंदर्भात अनेक संभ्रम निर्माण झाले आहेत. ही वाढीव पेन्शन कोणताच्या खिशातून वसूल होणार याबाबत आता चित्र स्पष्ट झाले आहे.

सध्या कर्मचारी पेन्शन योजनेत १५ हजार रुपयांपर्यंतच्या मूळ वेतनातील १.६ टक्के रक्कम केंद्र सरकार सबसिडीद्वारे देते. ईपीएओच्या सामाजिक सुरक्षा योजनांमध्ये कंपनी मूळ वेतनाच्या १२ टक्के योगदान देते. कंपनीच्या योगदानातील ८.३३ टक्के रक्कम ईपीएसमध्ये जमा होते. तर उर्वरित ३.६७ टक्के रक्कम ईपीएफओमध्ये जमा केली जाते. यानुसार सध्याच्या ईपीएफओच्या सदस्यांना वाढीव पेन्शन हवे आहे, त्यांना हा पर्याय निवडता येईल. ही रक्कम कंपनीतून घेता येईल. मात्र कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनातून कोणतीही रक्कम कपात केली जाणार नाही.

नव्या निर्णयानुसार, कर्मचाऱ्याच्या मूळ वेतनातून १.१६ टक्के अतिरिक्त योगदान सामाजिक सुरक्षा योजनेसाठी कंपनी ही रक्कम देते. त्यातून या नव्या नियमाची पूर्तता करता येईल. कंपनीच्या एकूण १२ टक्के योगदानातून १.१६ टक्के अतिरिक्त अंशदान घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे श्रम मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

या नव्या वाढीव पेन्शन योजनेसाठी ज्या कर्मचाऱ्यांनी ५००० रुपये ते ६५०० रुपये या वेतन मर्यादेपेक्षा अधिक वेतनात योगदान दिले होते आणि EPS-९५ सदस्यांना सुधारीत योजनेत ईपीएसअंतर्गत पर्याय निवडला, ते या वाढीव पेन्शनसाठी पात्र असतील. पात्र सदस्यांना त्यांच्या नियोक्त्यासह, संयुक्त पद्धतीने यासंबंधीचा अर्ज आणि इतर कागदपत्रे देऊन योजनेत सहभागी होता येईल.

विभाग

पुढील बातम्या