मराठी बातम्या  /  बिझनेस  /  EPFO Adani : ईपीएफओचा अदानी समूहावर विश्वास कायम, ईटीएफद्वारे वाढवली गुंतवणूक

EPFO Adani : ईपीएफओचा अदानी समूहावर विश्वास कायम, ईटीएफद्वारे वाढवली गुंतवणूक

Mar 28, 2023, 08:00 AM IST

  • EPFO Adani : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ट्रस्टच्या बैठकीत यासंदर्भातील निर्णय अपेक्षित आहे. त्यामुळे अंतिम निर्णय होईपर्यंत अदानी समूहाच्या या दोन समभागांमध्ये ईपीएफओ गुंतवणूक करणे सुरू ठेवेल.

EPFO ADANI investment HT

EPFO Adani : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ट्रस्टच्या बैठकीत यासंदर्भातील निर्णय अपेक्षित आहे. त्यामुळे अंतिम निर्णय होईपर्यंत अदानी समूहाच्या या दोन समभागांमध्ये ईपीएफओ गुंतवणूक करणे सुरू ठेवेल.

  • EPFO Adani : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ट्रस्टच्या बैठकीत यासंदर्भातील निर्णय अपेक्षित आहे. त्यामुळे अंतिम निर्णय होईपर्यंत अदानी समूहाच्या या दोन समभागांमध्ये ईपीएफओ गुंतवणूक करणे सुरू ठेवेल.

EPFO Adani : हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या समभागात मोठी उलथापालथ झाल्याने लाखो गुंतवणूकदारांना मोठे नुकसान सहन करावे लागले. यामध्ये एलआयसीसारख्या संस्थात्मक गुंतवणूकदारांपासून किरकोळ गुंतवणूकदारांचाही समावेश आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच ईपीएफओ​​ने अदानी समूहाच्या शेअर्समध्ये नुकत्याच झालेल्या घसरणीनंतरही गुंतवणूक सुरूच ठेवली आहे. अदानी एंटरप्रायझेस आणि अदानी पोर्ट्समध्ये ईपीएफओची गुंतवणूक कायम आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Stocks to buy : पुढच्या महिनाभरात १५ टक्क्यांपर्यंत वाढू शकतात हे १० शेअर, तुमच्याकडं आहेत का?

TCS CEO Salary : भारतातील सर्वात मोठी IT कंपनी TCS च्या सीईओचा दर महिन्याचा पगार माहितीय का? वाचून व्हाल थक्क!

Business Ideas : उद्योग क्षेत्रात ‘जो दिखता है वोही बिकता है...’ हेच सूत्र चालतं…

Akshaya Tritiya Investment : फक्त सोनेच नाही, अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ही गुंतवणूकही ठरते शुभ

कॅप्टिव्ह गुंतवणूकदार

ईपीएफओ हे अदानी समूहाच्या या दोन्ही समभागांमध्ये कॅप्टिव्ह गुंतवणूकदार आहेत. कारण दोन्ही समभाग सेन्सेक्स आणि निफ्टीचे भाग आहेत. जे ईपीएफओ व्यवस्थापित फंडाद्वारे ट्रॅक केले जातात. अमेरिकन शॉर्ट सेलर फर्म हिंडेनबर्गचा अहवाल जानेवारीमध्ये समोर आल्यानंतर गेल्या २ महिन्यांत अदानी समूहाच्या शेअर्सला जोरदार फटका बसला होता.

ईपीएफओेने २०२३ मध्ये गुंतवणूक वाढवली.

ईपीएफओ आपल्या जमा झालेल्या निधीपैकी १५ टक्के एक्सचेंज ट्रेडेड फंड्समध्ये गुंतवते. मार्च २०२२ पर्यंत, ईपीएफओ​​ने ईटीएफमध्ये १.५७ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. त्याचबरोबर आर्थिक वर्ष २०२३ मध्ये ८००० कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) ट्रस्टच्या बैठकीत याविरोधात निर्णय होईपर्यंत या दोन्ही समभागांमध्ये गुंतवणूक करणे सुरूच ठेवणार असल्याचे अहवालात म्हटले आहे.

ईपीएफओच्या बैठकीचा आजचा दुसरा दिवस

ईपीएफओच्या ट्रस्टींच्या बैठकीचा आजचा दुसरा दिवस आहे. आज यासंदर्भात निर्णय अपेक्षित आहे.

ईपीएफओचा पैसा अदानींकडे कसा जातो असा सवाल राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना विचारला आहे. अदानी आणि मोदी यांच्यातील नातेसंबंधांबाबत राहुल गांधी ट्विटरवर ताशेरे ओढले आहेत. राहुल गांधींना सूरतमधील कोर्टानं हेट स्पीच प्रकरणात राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर त्यांनी हा पवित्रा घेतला आहे.

पुढील बातम्या