मराठी बातम्या  /  बिझनेस  /  FD Rates : चांगली बातमी! चार प्रमुख बँकांनी वाढवले एफडीवरील व्याजदर, तुमचं खातं इथं आहे का?

FD Rates : चांगली बातमी! चार प्रमुख बँकांनी वाढवले एफडीवरील व्याजदर, तुमचं खातं इथं आहे का?

Dec 25, 2023, 03:10 PM IST

  • Fixed Deposit Interest Rate hike news : वर्ष संपता-संपता छोट्या गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी आली आहे. देशातील चार प्रमुख बँकांनी एफडवरील व्याजदरात वाढ केली आहे.

Fixed Deposits

Fixed Deposit Interest Rate hike news : वर्ष संपता-संपता छोट्या गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी आली आहे. देशातील चार प्रमुख बँकांनी एफडवरील व्याजदरात वाढ केली आहे.

  • Fixed Deposit Interest Rate hike news : वर्ष संपता-संपता छोट्या गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी आली आहे. देशातील चार प्रमुख बँकांनी एफडवरील व्याजदरात वाढ केली आहे.

Fixed Deposit Interest Rates : बँकांतील मुदत ठेवींच्या व्याजदरात वाढ होण्याचा सिलसिला सुरूच आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) सलग पाचव्यांदा रेपो दर ६.५ टक्क्यांवर कायम ठेवला असतानाही अनेक बँकांनी मुदत ठेवींवरील व्याजदर वाढवले आहेत. 

ट्रेंडिंग न्यूज

TCS CEO Salary : भारतातील सर्वात मोठी IT कंपनी TCS च्या सीईओचा दर महिन्याचा पगार माहितीय का? वाचून व्हाल थक्क!

Business Ideas : उद्योग क्षेत्रात ‘जो दिखता है वोही बिकता है...’ हेच सूत्र चालतं…

Akshaya Tritiya Investment : फक्त सोनेच नाही, अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ही गुंतवणूकही ठरते शुभ

Bank News : 'या' बँकेत तुमचं खातं असेल, पण बँक बॅलन्स नसेल तर एक महिन्यानंतर खातं थेट बंद होणार

बँक ऑफ इंडिया, कोटक महिंद्रा बँका, डीसीबी बँक आणि फेडरल बँकेचा एफडीवरील व्याजदर वाढवणाऱ्या बँकांच्या यादीत समावेश आहे. या बँकांनी डिसेंबर महिन्यात एफडीवरील व्याजदरात लक्षणीय वाढ केली आहे.

LIC HFL Recruitment 2023: एलआयसी हाउसिंग फायनान्समध्ये नोकरीची संधी; 'इतका' पगार मिळणार!

बँक ऑफ इंडिया

बँक ऑफ इंडियानं १ डिसेंबर २०२३ पासून आपल्या ग्राहकांसाठी एफडीवरील व्याजदरांत वाढ केली आहे. (२ कोटी रुपये ते १० कोटी रुपयांपर्यंत) मुदत ठेवी वाढवल्या आहेत. 

४६ दिवस ते ९० दिवसांच्या कालावधीसाठी ५.२५ टक्के, ९१ दिवस ते १७९ दिवसांच्या कालावधीसाठी ६ टक्के, १८० दिवस ते २१० दिवसांच्या कालावधीसाठी ६.२५ टक्के, २११ दिवस ते १ वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी ६.५० टक्के आणि १ वर्षाच्या कालावधीसाठी ७.५० टक्के असे हे व्याजदर असतील.

कोटक महिंद्रा बँक

कोटक महिंद्रा बँकेनं ३ ते ५ वर्षे मुदतीच्या ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. त्यानुसार, कोटक बँक सर्वसामान्य ग्राहकांना ७ दिवस ते १० वर्षांच्या मुदतीच्या ठेवींवर २.७५ ते ७.२५ टक्के व्याज देणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी हाच दर ३.३५ ते ७.८० टक्के आहे. हे दर ११ डिसेंबर २०२३ पासून लागू करण्यात आले आहेत.

IPOs This Week : शेअर बाजारासाठी वर्षाचा शेवटचा आठवडा धामधुमीचा; येतायत ६ नवे आयपीओ

डीसीबी बँक

डीसीबी बँकेनं २ कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. डीसीबी बँकेच्या वेबसाईटनुसार, नवे दर १३ डिसेंबरपासून लागू झाले आहेत. नव्या दरांनुसार, डीसीबी बँक सर्वसामान्य ग्राहकांना ७ दिवस ते १० वर्षे मुदतीच्या एफडीवर ३.७५ ते ८ टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना याच कालावधीसाठी ४.२५ ते ८.६० टक्क्यांपर्यंत व्याज देत आहे.

फेडरल बँक

फेडरल बँकेनं ५ डिसेंबर २०२३ पासून मुदत ठेवींच्या व्याजदरात बदल केले आहेत. भारतीय आणि एनआरआय अशा दोन्ही प्रकारच्या ग्राहकांच्या ५०० दिवसांच्या ठेवीवरील व्याजदर वाढवून ७.५० टक्के करण्यात आला आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी फेडरल बँक आता ५०० दिवसांच्या मुदतीसाठी जास्तीत जास्त ८.१५ टक्के आणि २१ महिने ते तीन वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी ७.८० टक्के व्याज देत आहे.

पुढील बातम्या