मराठी बातम्या  /  बिझनेस  /  early age retirement : वयाच्या ४५ वर्षी व्हा सेवानिवृत्त, त्यासाठी उपयोगी पडेल ही ‘फायर स्ट्रॅटेजी’

early age retirement : वयाच्या ४५ वर्षी व्हा सेवानिवृत्त, त्यासाठी उपयोगी पडेल ही ‘फायर स्ट्रॅटेजी’

Apr 02, 2023, 10:51 AM IST

    • early age retirement : लवकर निवृत्ती घेऊन तुम्ही तुमचे उर्वरित आयुष्य आनंदाने जगू शकतात. पण त्यासाठी वयाच्या ४५ नंतर जगण्यासाठी लागणारा पैसा कुठून येणार असा प्रश्न तुम्हाला पडत असेल? तर त्यासाठी सुरुवातीपासूनच नियोजन हवं.
retirement HT

early age retirement : लवकर निवृत्ती घेऊन तुम्ही तुमचे उर्वरित आयुष्य आनंदाने जगू शकतात. पण त्यासाठी वयाच्या ४५ नंतर जगण्यासाठी लागणारा पैसा कुठून येणार असा प्रश्न तुम्हाला पडत असेल? तर त्यासाठी सुरुवातीपासूनच नियोजन हवं.

    • early age retirement : लवकर निवृत्ती घेऊन तुम्ही तुमचे उर्वरित आयुष्य आनंदाने जगू शकतात. पण त्यासाठी वयाच्या ४५ नंतर जगण्यासाठी लागणारा पैसा कुठून येणार असा प्रश्न तुम्हाला पडत असेल? तर त्यासाठी सुरुवातीपासूनच नियोजन हवं.

early age retirement : तुम्हाला नोकरी करावीशी वाटत नाही का? तुम्ही रोज घर ते ऑफिस आणि ऑफिस ते घर असा प्रवास करुन कंटाळला आहात का? तुम्‍ही तुमच्‍या नोकरीवर समाधानी नसल्‍यास लवकरच निवृत्त होण्‍याची योजना करू शकतात.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

लवकर निवृत्ती घेऊन तुम्ही तुमचे उर्वरित आयुष्यही आनंदाने जगू शकतात. जर तुम्ही विचार करत असाल की वयाच्या ४५ नंतर जगण्यासाठी लागणारा पैसा कुठून येणार? उत्तर आहे फायर स्ट्रॅटेजी.आजच्या युगात फायर स्ट्रॅटेजी जगात खूप लोकप्रिय होत आहे. फायर स्ट्रॅटेजीद्वारे तुम्ही वयाच्या ४५ व्या वर्षी निवृत्त होऊ शकतात.

फायर स्ट्रॅटेजीचा फायदा

फायर स्ट्रॅटेजीचे तीन मूलभूत तत्त्वे आहेत. सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या उत्पन्नातील ५० ते ७०% बचत करावी लागेल. यानंतर, तुम्हाला तुमचे खर्च कमी करून आर्थिक शिस्त लावावी लागेल. यानंतर, तुम्हाला तुमची बचत कमी किमतीच्या इंडेक्स फंडाच्या पसंतीच्या साधनामध्ये गुंतवावी लागेल. याचाच अर्थ, अधिक बचत, खर्चात कपात आणि पैशाची योग्य प्रकारे गुंतवणूक ही त्रीसुत्री फायद्याची ठरेल.

किती पैशाची कराल बचत

तुमच्या लवकर सेवानिवृत्तीच्या खर्चासाठी तुम्हाला किती उत्पन्नाची आवश्यकता आहे? म्हणजेच तुमचा मासिक खर्च किती आहे? तुम्हाला किती लवकर निवृत्त व्हायचे आहे? याचे आराखडे आधीच बांधा. यातील पहिल्या प्रश्नाचे उत्तर 4% नियम असे आहे. जर तुम्ही १ कोटी रुपये घेऊन निवृत्त झालात, तर ४% नियमानुसार, तुम्ही दरवर्षी १ कोटी रुपयांपैकी ४% वापरू शकतात. म्हणजेज ४ लाख रुपये. असे करण्याचा दुसरा मार्ग म्हणजे या नियमाकडे उलटे पाहणे. म्हणूनच ४% उलट करणे २५ पट आहे. याचा अर्थ असा की तुमचा सेवानिवृत्ती निधी तुम्ही पहिल्या वर्षी खर्च करत असलेल्या रकमेच्या २५ पट असावा.

समजा तुम्हाला निवृत्तीच्या पहिल्या वर्षात ५ लाख रुपये खर्चाची गरज आहे, तर २५ पट म्हणजे १.२५ कोटी रुपये. एवढी रक्कम तुमच्याकडे निवृत्तीच्या वेळी असायला हवी.

उत्पन्न वाढवा आणि पैसे वाचवा

लवकर सेवानिवृत्तीची तयारी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या उत्पन्नाचा मोठा भाग वाचवावा लागेल. तुम्हाला दर महिन्याला तुमच्या पगारातील ५० ते ७०% बचत करावी लागेल. या महागाईच्या युगात निम्म्या उत्पन्नाची बचत करणे अशक्य आहे. अशावेळी योग्य गुंतवणूक सल्लागाराची मदत घेणे फायद्याचे ठरते. किंवा दुसरा मार्ग म्हणजे आपल्यातील कौशल्य वाढवून अर्धवेळ नोकरी करु शकतात. दुसऱ्या उत्पन्नाचा किमान स्त्रोत चालू ठेवणेही फायद्याचे ठरते.

खर्च कमी करण्याच्या टिप्स

खर्च कमी करण्यासाठी तुम्ही अनेक टिप्स वापरू शकता. जुनी कार चालवणे किंवा सार्वजनिक वाहतूक वापरणे. घर घेण्याऐवजी भाड्याने घ्या. रेस्टाॅरंट्सच्या खर्चात कपात करुन घरीच जेवण बनवा. क्रेडिट कार्डाचा खर्च टाळा.

पॅसिव्ह इन्कम

फायर स्ट्रॅटेजीचा पर्याय निवडताना पॅसिव्ह इन्कमवरही लक्ष केंद्रित करु शकतात. तुमच्या शेअर्समधून लाभांश, एफडीचे व्याज, ब्लाॅगचे उत्पन्न , यूट्यूब चॅनलची कमाई, प्राॅपर्टीचे भाडे इत्यादी असू शकते.

विभाग

पुढील बातम्या