मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Retirement planning : वयाच्या साठीनंतरही मिळेल निवृत्त वेतन, ही पाॅलीसी ठरेल 'अक्षय्य'

Retirement planning : वयाच्या साठीनंतरही मिळेल निवृत्त वेतन, ही पाॅलीसी ठरेल 'अक्षय्य'

Jan 09, 2023, 10:46 AM IST

    • Retirement planning : एलआयसीची जीवन अक्षय पॉलिसी खास रिटायरमेंट प्लॅन म्हणून तयार केली आहे. यामध्ये गुंतवणूक केल्यास कोणत्याही व्यक्तीला आयुष्यभर पेन्शन मिळू शकते.
senior citizen HT

Retirement planning : एलआयसीची जीवन अक्षय पॉलिसी खास रिटायरमेंट प्लॅन म्हणून तयार केली आहे. यामध्ये गुंतवणूक केल्यास कोणत्याही व्यक्तीला आयुष्यभर पेन्शन मिळू शकते.

    • Retirement planning : एलआयसीची जीवन अक्षय पॉलिसी खास रिटायरमेंट प्लॅन म्हणून तयार केली आहे. यामध्ये गुंतवणूक केल्यास कोणत्याही व्यक्तीला आयुष्यभर पेन्शन मिळू शकते.

Retirement planning : जोपर्यंत आपण अर्थाजन करतो, तोपर्यंत आपली सर्व जीवनावश्यक कामे आरामात होत असतात. पण वयाच्या साठीनंतर पैसे कमावणे अशक्य होते. तेंव्हा इतरांवर अवलंबून राहावे लागते. अनेकवेळा इतरांकडे पैसे मागणे लज्जास्पद वाटते. असे प्रश्न तुमच्यासमोर आले तर हताश होऊ नका. यासाठी तुम्ही अशा काही योजनांमध्ये गुंतवणूक करावी, ज्यातून तुम्हाला वृद्धापकाळात नियमित उत्पन्न मिळेल.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

एलआयसीची जीवन अक्षय पॉलिसी देखील या प्रकरणात एक चांगला पर्याय असू शकते. ही विशेषत: निवृत्ती योजना म्हणून तयार करण्यात आली आहे. यामध्ये गुंतवणूक केल्यास कोणत्याही व्यक्तीला आयुष्यभर पेन्शन मिळू शकते. पेन्शनची रक्कम तुमच्या गुंतवणुकीनुसार मोजली जाते. साठनंतरची आर्थिक जुळवाजूळव करायची असेल तर जाणून घ्या.

एक वेळचा हप्ता आणि आजीवन उत्पन्न

जीवन अक्षय पॉलिसी ही एक सिंगल प्रीमियम नॉन-लिंक्ड नॉन-पार्टिसिपटिंग आणि वैयक्तिक वार्षिकी योजना आहे. यामध्ये एक हप्ता देऊन तुम्ही आजीवन कमाईची व्यवस्था करू शकता. जीवन अक्षय पॉलिसीमध्ये किमान एक लाखाची गुंतवणूक केली जाऊ शकते, परंतु कमाल मर्यादा नाही. हे ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही खरेदी केले जाऊ शकते. किमान ३० वर्षे आणि कमाल ८५ वर्षे वयाचे लोक ते खरेदी करू शकतात.

१ लाख गुंतवणुकीवर किती पेन्शन ?

एलआयसीच्या या पॉलिसीमध्ये तुम्हाला पैसे कसे हवे आहेत. यासाठी १० पर्याय दिले आहेत. सर्व पर्यायांचे वेगवेगळे फायदे आहेत. तुमच्या गरजेनुसार तुम्ही पसंतीचा पर्याय निवडू शकता. तुम्हाला एलआयसीची ही पॉलिसी सिंगल किंवा जॉइंट फॉर्ममध्ये खरेदी करण्याची सुविधा देखील दिली जाते. पॉलिसी जारी केल्याच्या तीन महिन्यांनंतर तुम्हाला कर्जाची सुविधा देखील मिळते. पॉलिसी अंतर्गत, एक लाख गुंतवून तुम्हाला १२ हजार रुपयांपर्यंत वार्षिक पेन्शन मिळू शकते. तुम्हाला पेन्शनसाठी मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक पर्याय देखील दिला जातो.

वयाच्या ७५ वर्षात गुंतवणूकीतही मिळेल परतावा

समजा वयाच्या ७५ व्या वर्षी एखाद्या व्यक्तीने या पॉलिसीमध्ये एकरकमी ६१०८०० रुपये ठेवले तर त्याची विमा रक्कम ६ लाख रुपये असेल. अशाप्रकारे त्यांचे वार्षिक निवृत्ती वेतन ७६६५० रुपये, सहामाही निवृत्ती वेतन ३७०३५ रुपये, त्रैमासिक रुपये १८,२२५ आणि मासिक ६००८ रुपये असेल. हे वेतन त्यांना आयुष्यभर मिळत राहिल. गुंतवणूकदाराने निवडलेल्या पर्यायानुसार पेन्शन मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक उपलब्ध असेल. पॉलिसी अंतर्गत मृत्यू लाभाचा लाभ देखील दिला जातो.

 

विभाग

पुढील बातम्या