मराठी बातम्या  /  बिझनेस  /  IndianOil Kotak Credit Card : पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतींचा भार, कोटक क्रेडिट कार्ड ठरेल वरदान

IndianOil Kotak Credit Card : पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतींचा भार, कोटक क्रेडिट कार्ड ठरेल वरदान

Mar 13, 2023, 02:09 PM IST

    • IndianOil Kotak Credit Card: आज पेट्रोल डिझेलचे दर वाढलेत का ही बातमी प्रत्येकाच्याच जिव्हाळ्याची. पण या वाढत्या दरवाढीचं टेन्शन कमी करण्यासाठी कोटक बँकेने अनोखी योजना राबववली आहे. तुम्ही इंडियन ऑइल कोटक क्रेडिट कार्डद्वारे तुम्ही मोठी बचत करू शकता. हे को-ब्रँडेड रुपे कॉन्टॅक्टलेस क्रेडिट कार्ड आहे.
petrol pump HT

IndianOil Kotak Credit Card: आज पेट्रोल डिझेलचे दर वाढलेत का ही बातमी प्रत्येकाच्याच जिव्हाळ्याची. पण या वाढत्या दरवाढीचं टेन्शन कमी करण्यासाठी कोटक बँकेने अनोखी योजना राबववली आहे. तुम्ही इंडियन ऑइल कोटक क्रेडिट कार्डद्वारे तुम्ही मोठी बचत करू शकता. हे को-ब्रँडेड रुपे कॉन्टॅक्टलेस क्रेडिट कार्ड आहे.

    • IndianOil Kotak Credit Card: आज पेट्रोल डिझेलचे दर वाढलेत का ही बातमी प्रत्येकाच्याच जिव्हाळ्याची. पण या वाढत्या दरवाढीचं टेन्शन कमी करण्यासाठी कोटक बँकेने अनोखी योजना राबववली आहे. तुम्ही इंडियन ऑइल कोटक क्रेडिट कार्डद्वारे तुम्ही मोठी बचत करू शकता. हे को-ब्रँडेड रुपे कॉन्टॅक्टलेस क्रेडिट कार्ड आहे.

IndianOil Kotak Credit Card: वाढत्या पेट्रोल डिेझेलच्या किंमतींच आता नो टेन्शन. कारण प्रत्येकवेळी गाडीच्या इंधनाची टाकी फूल्ल करताना तुम्हाला आकर्षक रिवाॅर्ड पाॅईंट्स मिळतील. खाजगी क्षेत्रातील कोटक महिंद्रा बँक आणि इंडियन आॅईल यांनी संयुक्तपणे को ब्रँडेड रुपे काॅन्टॅक्टलेस क्रेडिट कार्ड दाखल केले आहे. ग्राहकांना इंधनाच्या बचतीसोबतच इतर फायदेही मिळतील.

ट्रेंडिंग न्यूज

TCS CEO Salary : भारतातील सर्वात मोठी IT कंपनी TCS च्या सीईओचा दर महिन्याचा पगार माहितीय का? वाचून व्हाल थक्क!

Business Ideas : उद्योग क्षेत्रात ‘जो दिखता है वोही बिकता है...’ हेच सूत्र चालतं…

Akshaya Tritiya Investment : फक्त सोनेच नाही, अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ही गुंतवणूकही ठरते शुभ

Bank News : 'या' बँकेत तुमचं खातं असेल, पण बँक बॅलन्स नसेल तर एक महिन्यानंतर खातं थेट बंद होणार

हे इंधन क्रेडिट कार्ड एनपीसीआयच्या रुपे नेटवर्कवर आधारित असेल. हे कार्ड रुपे कार्ड रुपे कार्ड स्वीकारणाऱ्या सर्व ऑनलाइन वेबसाइट आणि व्यापारी आउटलेटवर वापरले जाऊ शकते.

या क्रेडिट कार्डाची वैशिष्ट्ये

तुम्ही कार्ड जारी केल्याच्या ३० दिवसांच्या आत ५०० रुपये खर्च केल्यास, तुम्हाला वेलकम बेनिफिट्स म्हणून १००० रिवॉर्ड पॉइंट्स मिळतील.

इंडियन ऑइल पंपांवर खर्च केलेल्या प्रत्येक रु. १५० वर २४ रिवॉर्ड पॉइंट (४% रिवाॅर्ड्स) मिळवण्याची संधी. या श्रेणीमध्ये एका महिन्यात १२०० रिवॉर्ड पॉइंट्सची कमाल मर्यादा.

किराणा आणि जेवणासाठी खर्च केलेल्या प्रत्येक रु. १५० वर १२ रिवॉर्ड पॉइंट्स (२% रिवाॅर्ड्स) मिळवण्याची संधी. या श्रेणीमध्ये एका महिन्यात कमाल ८०० रिवॉर्ड पॉइंट्सची मर्यादा.

इतर सर्व श्रेणींमध्ये खर्च केलेल्या प्रत्येक १५० रुपयांवर ३ रिवॉर्ड पॉइंट्स (०.५०% रिवॉर्ड) मिळवण्याची संधी.

या कार्डद्वारे पेट्रोल पंपांवर १०० ते ५,००० रुपयांपर्यंतच्या इंधन खरेदीवर १% इंधन अधिभार भरावा लागणार नाही. बिलिंग सायकलमध्ये जास्तीत जास्त रु १०० इंधन अधिभार माफ केला जाऊ शकतो.

तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या या कार्डामध्ये टॅप अँड पे ची सुविधा देण्यात आली आहे. याचाच अर्थ ग्राहकांना कार्ड स्वाईप न करता फक्त पीओएस मशीनवर टॅप करुन पेमेंट करता येईल.

विभाग

पुढील बातम्या