मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Canara bank FD Rates : कॅनरा बँकेनं वाढवले एफडीचे व्याजदर, गुंतवणूकदारांना मिळणार अधिक नफा

Canara bank FD Rates : कॅनरा बँकेनं वाढवले एफडीचे व्याजदर, गुंतवणूकदारांना मिळणार अधिक नफा

Apr 05, 2023, 07:19 PM IST

  • Canara Bank FD Interest Rates : कॅनरा बँकेने २ कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. नवीन व्याजदर ५ मार्च २०२३ पासून लागू करण्यात आले आहेत.

fixed deposit HT

Canara Bank FD Interest Rates : कॅनरा बँकेने २ कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. नवीन व्याजदर ५ मार्च २०२३ पासून लागू करण्यात आले आहेत.

  • Canara Bank FD Interest Rates : कॅनरा बँकेने २ कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. नवीन व्याजदर ५ मार्च २०२३ पासून लागू करण्यात आले आहेत.

Canara bank : सार्वजनिक क्षेत्रातील कॅनरा बँकेने २ कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. नवीन व्याजदर ५ मार्च २०२३ पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू होतील. उद्या ६ एप्रिल रोजी होणार्‍या आरबीआयच्या पतधोरण बैठकीपूर्वी बँक व्याजदरात वाढ जाहीर करण्यात आली आहे. ६ एप्रिल रोजी आरबीआयची चलन समिती रेपो दरात वाढ करण्याची घोषणा करू शकते. असे झाल्यास बँक पुन्हा व्याजदर वाढवू शकते.

ट्रेंडिंग न्यूज

TCS CEO Salary : भारतातील सर्वात मोठी IT कंपनी TCS च्या सीईओचा दर महिन्याचा पगार माहितीय का? वाचून व्हाल थक्क!

Business Ideas : उद्योग क्षेत्रात ‘जो दिखता है वोही बिकता है...’ हेच सूत्र चालतं…

Akshaya Tritiya Investment : फक्त सोनेच नाही, अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ही गुंतवणूकही ठरते शुभ

Bank News : 'या' बँकेत तुमचं खातं असेल, पण बँक बॅलन्स नसेल तर एक महिन्यानंतर खातं थेट बंद होणार

कॅनरा बँक ७ दिवस ते १० वर्षांच्या मुदत ठेवींवर व्याज दर ४% ते ७.२५% आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ४% ते ७.७५% पर्यंत आहे. नॉन-कॉलेबल एफडीवरील ठेव रक्कम १५ लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे,ती ४४४ दिवसांच्या कालावधीसाठी असेल. यावर नियमित नागरिकांना ७.४० टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना ७.९० टक्के व्याज मिळेल. तर, बँक कॅनरा टॅक्स सेव्हर डिपॉझिट ६.७०% वार्षिक व्याज देते.

मुदतपूर्व किंवा आंशिक पैसे काढणे दंड

बँकेच्या वेबसाइटनुसार, मुदतीपूर्वी पैसे काढणे किंवा बंद करणे, १२ मार्च २०१९ रोजी किंवा त्यानंतर स्वीकारलेल्या किंवा नूतनीकरण केलेल्या २ कोटी रुपयांपेक्षा कमी एनआरओ एफडीसाठी १ टक्के दंड आकारला जाईल.

वरिष्ठ नागरिकांना अतिरिक्त व्याजदर

कॅनरा बँकेच्या संकेतस्थळानुसार, ज्येष्ठ नागरिकांना सर्वसामान्य गुंतवणूकदारांच्या तुलनेत अर्धा टक्का अतिरिक्त व्याजदर दिले जाते.

विभाग

पुढील बातम्या