मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Business Ideas: ग्राहकांच्या भाषेत बोला. उद्योगात यशस्वी होण्यासाठी 'उद्योगमंत्र'

Business Ideas: ग्राहकांच्या भाषेत बोला. उद्योगात यशस्वी होण्यासाठी 'उद्योगमंत्र'

HT Marathi Desk HT Marathi

Apr 05, 2024, 11:25 AM IST

  • business ideas : परमुलखात व्यवसाय करत असाल तर तेथील स्थानिक भाषा लवकरात लवकर आत्मसात करणे महत्त्वाचे ठरते. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मानसभाषातज्ज्ञ फ्रँक स्मिथ म्हणतात, ‘एक भाषा तुमचा जीवनाच्या मार्गावर प्रवास सुरु करुन देते, पण दोन भाषा त्या मार्गावरील प्रत्येक दार तुमच्यासाठी उघडतात.’

How to communicate with customers in simple language

business ideas : परमुलखात व्यवसाय करत असाल तर तेथील स्थानिक भाषा लवकरात लवकर आत्मसात करणे महत्त्वाचे ठरते. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मानसभाषातज्ज्ञ फ्रँक स्मिथ म्हणतात, ‘एक भाषा तुमचा जीवनाच्या मार्गावर प्रवास सुरु करुन देते, पण दोन भाषा त्या मार्गावरील प्रत्येक दार तुमच्यासाठी उघडतात.’

  • business ideas : परमुलखात व्यवसाय करत असाल तर तेथील स्थानिक भाषा लवकरात लवकर आत्मसात करणे महत्त्वाचे ठरते. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मानसभाषातज्ज्ञ फ्रँक स्मिथ म्हणतात, ‘एक भाषा तुमचा जीवनाच्या मार्गावर प्रवास सुरु करुन देते, पण दोन भाषा त्या मार्गावरील प्रत्येक दार तुमच्यासाठी उघडतात.’

 

ट्रेंडिंग न्यूज

Penny stock turns multibagger : दीड रुपयाचा शेअर ५५ रुपयांवर पोहोचला! गुंतवणूकदारांनी किती कमावले माहित्येय?

Multibagger Stock : शेअर असावा तर असा! दोन वर्षांत तब्बल १६० टक्क्यांनी वाढला, तुमच्याकडं आहे का?

SEBI on KYC : म्युच्युअल फंडातील गुंतवणूकदारांसाठी खूशखबर, सेबीनं शिथील केले 'हे' नियम

EPFO news : भविष्य निर्वाह निधी खात्यातून पैसे काढणे आता आणखी सोपे! फक्त ३ दिवसांत तुमच्या हातात येणार

धनंजय दातार

दुबईत गेल्यावर सुरवातीच्या काळात माझ्यापुढे तेथील ग्राहकांशी बोलण्याची अडचण उभी राहिली. दुबईची स्थानिक भाषा अरबी असून आंतरराष्ट्रीय व्यवहाराची भाषा इंग्रजी आहे. मला इंग्रजी कामचलाऊ येत होती आणि अरबी भाषेचा तर गंधही नव्हता. मुंबईत राहताना शेजारी अन्य राज्यांतील लोकांचा सहवास असल्यामुळे मराठीबरोबरच हिंदी बोलत होतो. पण इथे दुबईत मराठीचा उपयोग नव्हता आणि हिंदी बोलण्याची संधीही कुणी भारतीय दुकानात आला तरच थोडावेळ मिळे. मला अरबी येत नसल्याने दुकानाबाहेर पडल्यास कुणाशी बोलायचीही पंचाईत होई. काही उच्चभ्रू ग्राहक माझी मजा करत. ते माझ्याशी अस्खलित इंग्रजीतून बोलू लागताच उत्तरादाखल मी ‘येस’, ‘नो’, ‘थँक्यू’ यापलिकडे फार काही बोलायचो नाही. मग आपला रुबाब दाखवण्यासाठी ते लोक मुद्दाम फाडफाड इंग्रजीत बोलत राहात. माझी तारांबळ बघून त्यांना मनातून गंमत वाटत असे.

भीती आणि चालढकल यामुळे मी बरेच महिने अरबी न शिकता केवळ त्यातील अभिवादनाचे व शिष्टाचाराचे शब्द बोलून काम चालवून न्यायचो. एक दिवस एक स्थानिक ग्राहक दुकानात आला. मी सवयीप्रमाणे ‘सबाल खैर’ (शुभ प्रभात) म्हणून त्याचे स्वागत केले. मला अरबी अवगत असल्याचा समज झाल्याने तो माझ्याशी अरबीतून बोलू लागला. मी मात्र मख्खपणे त्याच्याकडे बघत नुसती मान हलवू लागलो. शेवटी त्याला उमगले, की मला अरबी येत नाही. तो बोलायचा थांबला आणि त्याने हवी असलेली वस्तू मला खुणेने दाखवली. मग त्याने आपल्या मनगटाच्या मध्यावर डाव्या हाताने थाप मारली. त्यासरशी माझ्या डोक्यात एकदम प्रकाश पडला. त्याला ती वस्तू अर्ध्या किलोमध्ये हवी होती. मी ती काढून देताच तो हसून ‘शुक्रान’ (धन्यवाद) म्हणत निघून गेला. त्यानंतर माझी भीती कमी झाली आणि मी स्थानिक ग्राहकांशी निदान खाणाखुणांच्या भाषेत बोलू लागलो.

मात्र नंतर घडलेल्या एका प्रसंगामुळे व्यावसायिकाने परमुलखात तेथील स्थानिक भाषा शिकण्याचे महत्त्व मला उमगले. दुबईत परदेशातून कामगार आणायचे असतील तर त्यासाठी व्यवसायात एक जनसंपर्क अधिकारी (पीआर) लागतो. दुसरी तरतूद अशी आहे, की व्यवसायाचा चालक पीआर म्हणून काम करु शकतो, पण त्यासाठी परवाना लागतो आणि अरबी व इंग्रजी भाषा याव्या लागतात. मीसुद्धा त्या परवान्यासाठी अर्ज केला, पण अरबी येत नसल्याच्या कारणाने दोन वेळा परवाना नाकारुन मला परत पाठवले गेले. अखेर एका केरळी माणसाने मला सल्ला दिला, “अरे, आपल्याला अरबी येत नसल्याचे मुद्दामहून कशाला सांगायचे? तेथे अरबीतून केवळ तीन प्रश्न विचारतात १) दुकान कुठे आहे? २) तुझे वय काय? ३) दुकानात किती माणसे आहेत? तू या तीन प्रश्नांची उत्तरे पाठ करुन क्रमवार बोलून दाखव.’ मी तसे केले. त्या अधिकाऱ्याने संमतीदर्शक मान हलवली आणि निरोप देताना अरबीत काही तरी विचारले. ते मात्र काही मला समजले नाही. मी त्याच्या तोंडाकडे मख्खपणे बघत बसलो.

शेवटी माझ्या मागे उभ्या असलेल्या आणि अरबी जाणणाऱ्या भारतीय माणसाने मला सांगितले, “अरेऽ तो विचारतोय, की तीन दिवसांनी परवाना घेऊन जायला तुला जमेल का?” मी मान हलवूनच होकार दिला, पण माझे नाटक तिथेच उघड झाले. परवाना देणाऱ्या अधिकाऱ्याच्या कपाळावर रागाने आठी उमटली. तो काही बोलला नाही, पण ‘हे लोक परदेशातून दुबईत धंदा करायला येतात आणि स्थानिक भाषा मात्र शिकत नाहीत,’ ही नापसंती त्याच्या नजरेत स्पष्ट दिसत होती. मी लाज वाटून त्याक्षणी निश्चय केला, की मनातील भाषेचा न्यूनगंड आता काढूनच टाकायचा. लहान मूल आपल्या आई-बाबांचे ऐकून शब्द बोलायला शिकते तीच पद्धत मी अवलंबली आणि प्रयत्नपूर्वक अरबी व इंग्रजी भाषा बोलायला शिकलो.

मित्रांनोऽ व्यवसायात यशस्वी होण्यासाठी एकाहून अधिक भाषा अवगत असणे फार महत्त्वाचे असते. परदेशात एक चांगली गोष्ट म्हणजे ते लोक आपल्या बोलण्याच्या चुकांना कधीही हसत नाहीत. उलट त्यांच्या सहवासात बोलण्यातील चुका सुधारुन आपण स्थानिक भाषा लवकर शिकू शकतो.’

दक्षिण आफ्रिकेचे आदरणीय नेते नेल्सन मंडेला यांचे एक छान वाक्य आहे.

‘जेव्हा तुम्ही एखाद्याला समजेल अशा भाषेत त्याच्याशी बोलता तेव्हा ते त्याच्या डोक्यात शिरते, पण तुम्ही एखाद्याशी त्याच्या मातृभाषेत बोलता तेव्हा ते त्याच्या हृदयात शिरते.’

(लेखक धनंजय दातार हे दुबईस्थित अदिल उद्योगसमुहाचे व्यवस्थापकीय संचालक आहेत)

पुढील बातम्या