मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Bill gates : रतन टाटा, सचिन आणि बिल गेट्स जेव्हा एकत्र येतात…

Bill gates : रतन टाटा, सचिन आणि बिल गेट्स जेव्हा एकत्र येतात…

Mar 02, 2023, 04:59 PM IST

  • Bill gates : मायक्रोसाॅफ्टचे सहसंचालक बिल गेट्स भारताच्या दौऱ्यावर आहेत. नुकतीच त्यांनी टाटा सन्सचे मानद अध्यक्ष रतन टाटा, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास आणि महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांची भेट घेतली.

Mr. Ratan Tata, Mr. Bill gates and Mr. N chandrashekaran HT

Bill gates : मायक्रोसाॅफ्टचे सहसंचालक बिल गेट्स भारताच्या दौऱ्यावर आहेत. नुकतीच त्यांनी टाटा सन्सचे मानद अध्यक्ष रतन टाटा, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास आणि महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांची भेट घेतली.

  • Bill gates : मायक्रोसाॅफ्टचे सहसंचालक बिल गेट्स भारताच्या दौऱ्यावर आहेत. नुकतीच त्यांनी टाटा सन्सचे मानद अध्यक्ष रतन टाटा, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास आणि महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांची भेट घेतली.

Bill gates : मायक्रोसाॅफ्टचे सहसंचालक बिल गेट्स भारताच्या दौऱ्यावर आहेत. नुकतीच त्यांनी टाटा सन्सचे मानद अध्यक्ष रतन टाटा, सध्याचे अध्यक्ष एन.चंद्रशेखरन यांची भेट घेतली. त्याआधी ते मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, आरबीआरय गव्हर्नर शक्तिकांत दास आणि महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांची भेट घेतली.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

रतन टाटा आणि बिल गेट्स दोघेही व्यावसायिक क्षेत्रात सर्वोच्च पदावर आहेत. पण त्याचबरोबर जगभरात परोपकार करण्यातही ते आघाडीवर असतात. दोघांच्या भेटीदरम्यान आरोग्य, निदान आणि न्यूट्रीशियन क्षेत्रातील आपल्या संयुक्त प्रयत्नांना अधिक मजबूत करण्यासंदर्भात त्यांच्या चर्चा झाली. गेट्स फाऊंडेशन इंडियाने यासंदर्भात ट्विट केले आहे. ट्विटमध्ये फाऊंडेशनने सांगितले की, आम्ही एकत्र काम करण्यास तत्पर आहोत.

भारतरत्न सचिन तेंडूलकरशी भेट

याआधी मंगळवारी बिल गेट्सने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची भेट घेतली. सचिनने ट्विटवर गेट्स यांच्यासोबतच्या भेटीचे फोटो शेअर केले आहेत. या भेटीदरम्यान सचिनची बायको अंजलीही दिसत आहे. सचिनने ट्विट केले आहे की, आपण सर्वच जीवनात विद्यार्थी आहोत. लहान मुलांच्या आरोग्य सेवेसह ज्या योजनेसाठी आमचे फाऊंडेशन काम करते त्यासंदर्भात नवा दृष्टीकोन शिकण्याची संधी बिल गेट्स यांच्या भेटीलून मिळाला.

Bill gates, Sachin Tendulkar and Anjali Tendulkar HT

गेट्स म्हणाले, वर्गमित्राला भेटून 'आनंद' झाला

आनंद महिंद्रा यांनी बिल गेट्ससोबतचा एक फोटो शेअर केला आणि त्यांच्या भेटीबद्दलही सांगितले. पोस्टमध्ये बिल गेट्स आनंद महिंद्रा यांना त्यांची काही पुस्तके भेट देताना दिसत आहेत. बिल गेट्स यांनी पुस्तकात एक सुंदर संदेशही शेअर केला आहे. बिल गेट्सने लिहिले, 'आनंद, वर्गमित्रासाठी शुभेच्छा.' बिल गेट्स आणि आनंद महिंद्रा हार्वर्ड विद्यापीठात एकत्र शिकायचे.

Bill Gates and Anand Mahindra HT
पुढील बातम्या